भिगवण वार्ताहर. दि. 31
भिगवण बारामती राज्यमार्गांवर मदनवाडी गावच्या हद्दीत मालवाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाने ठोकरल्याने मदनवाडी गावातील जेष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यावर पिकअप ड्रायव्हर याने वाहणासह पळ काढला मात्र पोलिसांच्या तातडीच्या तपासामुळे वाहन आणि ड्रायवर याचा शोध घेण्यात आला.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित प्रभारी पोलीस अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी दिलेल्या माहिती नुसार गुरुवारी 30 तारखेच्या सकाळी हा अपघात घडला. या अपघातात गणपत नारायण नरुटे वय. 81 रा. मदनवाडी यांचा जागीच मृत्यू झाला.
भिगवण बारामती रोडवर ढवळे वस्ती जवळ हा अपघात घडला. यावेळी अपघात करून वाहन चालकाने पळ काढला होता. प्रत्यक्ष दर्शी आणि पोलिसांच्या तातडीने केलेल्या तपासात हे वाहन पिकअप एम. एच. 12 जी . टी.3116 यावरील चालक अशोक बाळू राऊत वय. 35 भांडेवाडी कर्जत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक नियमाचे पालन न करता हालगर्जी पणाने वाहन चालवून निष्पाप नागरिकाचा जीव घेतल्याचा तसेच अपघाताची माहिती अथवा मदत न करता पळ काढल्याचा गुन्हा वाहन चालकावर लावला आहे. याची खबर मृत नरुटे यांचे पुतणे मगन विठ्ठल नरुटे यांनी दिली आहे.
सदर अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश उगले करीत आहेत.


















