भिगवण पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आवळल्या नराधमाच्या मुसक्या
भिगवण वार्ताहर.दि.१२
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका नराधमाने आईसमान असणाऱ्या चुलतीवर बलात्कार केल्याची घटना घडली.नात्याला काळिमा फासणारी घटना असूनही नात्याचा विचार आणि आरोपीच्या दहशतीखाली पीडितेनी ८ दिवसानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार भिगवण पोलीस हद्दीतील गावात हा माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली.केतन कांतीलाल पवार असे आरोपीचे नाव आहे.केतन याने पिडीतेच्या घरात अनाधिकाराने घुसत जबरदस्ती करीत पिडीतेशी शारीरिक दुष्कृत्य केले .तसेच वेळोवेळी पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.मात्र आरोपी हा पिडीतेचा पुतण्या असल्यामुळे पीडिता नात्याचा विचार करून गप्प राहिली .मात्र चार दिवस उलटताच या नराधमाने परत जबरदस्तीने शारीरिक दुष्कृत्य केले.तसेच याबाबत कोणालाही माहिती दिल्यास पूर्ण कुटुंब कापून टाकण्याची तसेच तिलाही मारून टाकण्याची धमकी दिली.
अखेर पिडीतेने भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत याची माहिती पोलिसांना दिली.नात्याला काळिमा फासणाऱ्या या आरोपी विरोधात भिगवण पोलिसांनी गुन्हा नोंद करींत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.