भिगवण वार्ताहर.दि.८
शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतविण्यासाठी आपल्याकडे द्या आणि गुंतविलेल्या पैशाची जबाबदारी आम्ही घेतो असे म्हणत ९ लाख २१ हजार रुपयांना गंडा घालण्याच्या प्रकार भिगवण पोलीस ठाणे हद्दीत घडला.याबाबत तीन आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात आरोपी सुभाष पवार रा.आसू पवारवाडी ता.फलटण जि.सातारा त्याची पत्नी माधुरी सुभाष पवार तसेच दादा महादेव माने रा.बारामती यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बिल्ट कंपनीत कामगार असणाऱ्या शंकर फकीरा मोहंती रा.बिल्ट कॉलनी यांना त्यांच्या सोबत काम करणाऱ्या दिगांबर हगारे यांनी मध्यस्थी करीत २०१९ ला आरोपी आणि मोहंती याची ओळख करून दिली यावेळी आरोपींनी मोहती यांना आम्हाला शेअर मार्केट मध्ये चांगल्या पैसे कसे वाढवायचे याबाबत माहिती असल्याचे सांगितले.तसेच तुम्हाला जास्तीचा नफा मिळेल आणि तुमचा पैसा बुडणार नाही याची हमी घेत मोहंती यांच्या कडून ९ लाख २१ रुपये वेगवेगळ्या बँक खात्यातून घेतले.मात्र पैसे घेतल्यावर कोरोना आहे असे सांगून पैसे परत करण्यात अडचणी येत असल्याचे सांगू लागले.तसेच भेटीसाठी गेल्यावर घरी न थांबता पसार झाले.तसेच घरी पैसे आणावयास का आला म्हणून शिवीगाळ आणि खोट्या तक्रार करण्याची धमकी दिली. या मुळे आपले पैसे मिळणार नाहीत म्हणून मोहंती यांनी भिगवण पोलीस ठाण्याची धाव घेत आरोपी विरोधात फसवणुकीची तक्रार दिली.याबाबत भिगवण पोलीस तपास करीत आहेत.