भिगवण वार्ताहर.दि.२२
तक्रारवाडी गावातील तरुणावर जीवघेणा हल्ला करीत वर्षभरापासून फरार असणाऱ्या अट्टल गुंडाच्या मुसक्या आवळण्यात भिगवण पोलिसांना यश मिळाले.मात्र अजूनही त्याचा एक साथीदार पोलिसांच्या हाती लागलेला नाही.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस अंकुश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार राजेंद्र उर्फ राजू भगवान बदर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.१२ मार्च २०२२ रोजी तक्रारवाडी गावातील वैष्णव राहुल अनपट या तरुणाला जयपाल रसिक खरात ,विक्रम माडगे ,रवींद्र उर्फ राजू भगवान बदर ,विशाल घोलप या आरोपींनी पाठीमागील भांडणाचा राग मनात धरून कट रचून लोखंडी रॉड लाकडी बॅट याचा वापर करून जीवघेणा हल्ला केला होता.या जीवघेण्या हल्ल्यात वैष्णव गंभीर जखमी होवून अत्यंत वाईट अवस्थेत पोहोचला होता.भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी तातडीने २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर २ आरोपी पोलिसांना चकमा देत फरार झाले होते. यातील बदर नावाचा आरोपी पडवी ता.दौंड येथे लपूनछपून राहत असल्याची गोपनीय माहिती भिगवण पोलिसांना मिळताच गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम ,सचिन पवार रणजीत मुळीक ,महेश उगले ,अंकुश माने ,हसीम मुलाणी यांच्या टीमने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
भिगवण पोलिसांनी आरोपी विरोधात घेतलेल्या कठोर परिश्रमामुळे आणि कायदेशीर तपासी कारवाई मुळे गेली १३ महिने यातील आरोपी जेलबंद आहेत.तर अजूनही १ आरोपी फरार असल्यामुळे त्यांचा जेल मधील प्रवास लांबणार आहे.तर या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी वैष्णव अनपट यांच्या आई वडिलाने केली आहे.