भिगवण वार्ताहर .दि.२
भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील गावात महिला आणि शाळकरी मुली यांना सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणार असल्याची ग्वाही सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. गुन्हेशोध पथकाच्या विशेष कामगिरी निम्मित आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी हि माहिती दिली.
“आली रे ! आली आता तुझी बारी आली !!” या चित्रपटातील डॉयलॉगची आठवण लवकरच भिगवण आणि परिसरातील रोडरोमिओ आणि धूम स्टंट रायडींग करणाऱ्या दुचाकीस्वार तरुणांना येणार आहे.कारण आता भिगवण पोलीस ठाण्याच्या सिंघम अधिकारी दिलीप पवार यांनी भिगवण आणि परिसरात महिला आणि मुलीसाठी सुरक्षित वाटेल असे वातावरण निर्माण करणार असल्याची ग्वाही पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांना दिली. त्यामुळे काही वर्षापासून महिला आणि मुलीसाठी या रोड रोमिओ आणि धूमस्टाईल बायकर्सचा त्रास होत होता.त्यातून नक्कीच सुटका होणार आहे .तर महिला आणि मुली विषयक गुन्ह्यात आरोपीना कठोरात कठोर कलमे लावण्यात येणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.
पोलीस अधिकारी दिलीप पवार यांच्या या संकल्पनेच पत्रकार संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले असून अशा गुन्ह्यात सहभाग असणारांची नावे माध्यमातून प्रसिद्ध करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
चौकट …..वेगाने दुचाकी चालविणे तसेच शाळा परिसरात विना कामाच्या घिरट्या घालणाऱ्या विरोधात कारवाई करण्यासाठी निर्भया पथकाची निर्मिती करण्यात आली असून महिला आणि मुलींच्या रक्षणासाठी त्यांच्याकडून केली जाणर असल्याचे दिलीप पवार यांनी यावेळी सांगितले.