भिगवण वार्ताहर.दि.१९
भिगवण रेल्वे स्टेशन येथे क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या भांडणात परस्परविरोधी तक्रारी भिगवण पोलीस स्टेशन येथे करण्यात आल्या .यात एका गटाच्या ५ जणांवर तर दुसऱ्या गटाच्या ६ असे ११ जणांवर एट्रासिटी मारामारी आणि दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तर क्रिकेट सारख्या शुल्लक कारणासाठी दोन समाज समोरासमोर उभे ठाकल्याचे दिसून येत आहे.
याबाबत भिगवण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादी सचिन प्रवीण कांबळे यांनी खौजा हसन कुरेशी ,तय्यब कुरेशी ,सोहेल कुरेशी ,जुनेत कुरेशी यांच्या विरोधात गर्दी जमविणे ,दंगा करणे ,जातीवाचक शिवीगाळ करणे अशी तक्रार दिली आहे.तर प्रतिस्पर्धी गटाच्या वतीने अझहर खाजा कुरेशी यांनी राजेंद्र कांबळे ,सचिन कांबळे ,अक्षय कांबळे ,प्रेमचंद कांबळे ,गणेश खडके यांच्या विरोधात दमदाटी ,लाकडी दांड्याने मारहाण तसेच जबरदस्तीने पैसे काढून नेल्याची तक्रार केली आहे.दोनही गुन्ह्याची पोलिसांनी नोंद करीत तपास सुरु केला आहे.मात्र क्रिकेट सारख्या शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणामुळे दोन समाजात दरी निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.तर तक्रार दाखल करण्यासाठी भिगवण पोलीस ठाण्यावर मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
दोन्ही गुन्ह्यातील कोणत्याही आरोपीची अटक बातमीच्या वेळेपर्यंत झाली नसल्याची माहिती ठाणे अमलदार रामदास जाधव यांनी दिली.