डम्परखाली चिरडून मृत्यू झालेल्या तरूणाच्या पत्नीने गळफास लावत दिला जीव ; भिगवण येथील दुर्दैवी घटना

0
3327

भिगवण वार्ताहर.दि.१४

डंपरखाली चिरडून जीव गेलेल्या तरुणाच्या पत्नीने नवऱ्याच्या अंत्यविधीच्या दुसर्या दिवशीच गळफास घेत आपला जीव दिल्याची मनाला सुन्न करणारी घटना भिगवण येथे घडली.या दुर्दैवी घटनेने भिगवण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साक्षी उर्फ पियुषा ज्ञानेश्वर बिबे वय २० रा.विवेकानंद नगर भिगवण असे गळफास लावून जीव दिलेल्या विवाहितेचे नाव आहे.वीटभट्टीसाठी माती आणली जात असताना आलेल्या गाडींचा हिशोब ठेवणाऱ्या वीटभट्टी मालकाचा गुरुवारी पहाटे डंपरखाली चिरडून मृत्यू झाला होता. साक्षी हि मयत ज्ञानेश्वर राजेंद्र बिबे याची पत्नी होती.साक्षी आणि ज्ञानेश्वर यांच्या लग्नाला ६ महिने सुधा पूर्ण झाले नसल्याची माहिती मिळत आहे .त्यातच नवऱ्याचा मृत्यू झाल्याच्या दुखातून तिने आपला जीव दिला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवऱ्याचा अंत्यसंस्कार होताच शुक्रवारी रात्री घरातील लोखंडी अंगलला साक्षी हिने गळफास घेतला होता. दुर्दैवी साक्षी ऊर्फ पियूशा बिबे

याबाबत भिगवण पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चौकट……दिवसा माती वाहतूक केली तर महसूल विभागाला याची माहिती मिळेल आणि रॉयल्टी आणि दंडाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल म्हणून रात्रभर उजनीतून चोरून माती उपसा केला जातो.आणि हि माती व्यावसायिक उत्पादकांना विकली जाते.यातून वाहतूक करणारे बक्कळ पैसा कमवीत असतात.परंतु असा दुर्दैवी प्रकार घडल्यावर कुटुंब संपून जावू शकते याची फिकीर या माती माफियांना नक्कीच नसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here