टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी मित्र अथवा नातेवाईक यांच्याजवळ मन मोकळे करणे गरजेचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांकडून मत व्यक्त
भिगवण वार्ताहर.दि.३०
भिगवण परिसरात तरूणांच्या आत्महत्या वाढत असून यामागचे खरे कारण मात्र गोपनीय राहत असल्यामुळे कारणांचा शोध देहाबरोबरच अनंतात विलीन होत आहे.पैसा संपती प्रेम विरह या कारणाबरोबरच सोशल मीडियातील सेक्स्कोरटन ( हनीत्र्याप ) ची फसवणूक हे हि मुख्य कारण असेल काय ? अशी कुजबुज मृत्यूनंतर केली जात आहे. मात्र याकडे पोलीस प्रशासन गंभीरतेने पाहताना दिसून येत नसल्यामुळे फक्त हळहळ व्यक्त करण्यापलीकडे समाज काहीही करताना दिसून येत आहे.
आपणच आपले जीवन मुद्दामहून संपविणे याला आत्महत्या म्हणतात .युद्धात बंदुकीच्या गोळ्या खावून अथवा शत्रूच्या समोर निधड्या छातीने उभे ठाकणे हि सकारात्मक आत्महत्या प्रकारात मोडते तर घराच्या छताला दोरी अडकवून गळफास घेणे ,विहिरीत उडी मारून अथवा विषारी ओषध प्रासून दिलेला जीव हा नकारात्मक प्रकारात मोडतो.हाच नकारात्मक आत्महत्या प्रकार भिगवण परिसरात वाढत असल्याचे मागील काही दिवसापासून दिसून यात आहे.अगदी जवानीच्या उंबरठ्यावर उभा असणारे तरुण अचानक प्राणाची आहुती देत असून यामागचे कारनांचा शोध घेतला जात नाही.आत्महत्या केलेल्या तरुणाच्या घरातील नातेवाइकांची परिस्थिती अतिशय वाईट असल्यामुळे याची पाळेमुळे शोधली जात नाहीत.तर पोलीस प्रशासन हि कोणतीच तक्रार नसल्यामुळे खऱ्याखुऱ्या कारणांचा शोध घेताना दिसून येत नाही.आणि जर अशा कारणाचा शोध लागला तर याचा इतर तरुणाची जागृती करण्यासाठी नक्कीच उपयोग होणार आहे आणि एकाचा जीव यातून वाचण्याची शक्यता निर्माण होवू शकते.
सेक्शोरटन म्हणजेच हनीत्र्याप नावाचे सोशल मिडियाचे भूत हे हि या तरुणाच्या आत्महत्या पाठीमागील कारण असेल काय याचा शोध लागण्याची कुजबुज मोठ्या प्रमाणात होत असून ग्रामीण भागातील अनेक तरुण यात गुरफटले जात आहेत.या आभासी भूतामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत असून अगदी जीव देण्यासारखी परिस्थिती निर्माण केली जात असल्याचे काही प्रकारात उघड झाले आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने अशा आत्महत्या झालेल्या तरुणांचे मोबाईल ताब्यात घेत तांत्रिकदृष्ट्या विश्लेषण केल्यास नक्कीच मूळ कारणापर्यंत पोहोचता येईल अशी कुजबुज भिगवण परिसरात होताना ऐकावयास मिळत आहे.