तक्रारवाडी गावच्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरानी केला जीवघेणा हल्ला ; जखमी तरुणांची प्रकृती नाजूक

0
3859

भिगवण वार्ताहर .दि .१२
भिगवण येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या सर्विस रस्त्यावर तक्रारवाडी गावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली.लोखंडी रॉड आणि लाकडी बॅट ने केलेल्या हल्ल्यात तरुणांची प्रकृती अत्यंत नाजूक झाली आहे .

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार वैष्णव राहुल अनपट वय २१ असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणांचे नाव आहे. वैष्णव हा आपल्या दुकानाच्या मालाच्या खरेदी साठी भिगवण येथील पुणे सोलापूर महामार्गाच्या सर्व्हिस रस्त्यावरील आला असता दबा धरून बसलेल्या ५ ते ८ हल्लेखोर तरूणांनी हा जीवघेणा हल्ला केला.लोखंडी रॉड आणि बॅट तसेच फरशी कडापा याने त्याच्यावर हल्ला करण्यात आला .हल्ला होत असताना काही कळायच्या आतच डोक्यात वार झाल्यामुळे वैष्णव जमिनीवर पडला .वैष्णव जमिनीवर पडला असता यातील एका हल्लेखोर मोट्या आकाराची फरशी डोक्यात टाकण्याचा प्रयत्न करीत होता .
.मात्र आसपासच्या नागरिकांनी त्या हल्लेखोर तरुणाला पकडल्यामुळे त्याने पळ काढला .अगदी २ मिनिटाच्या आत हा प्रकार करून हल्लेखोरांनी हल्ला करणाऱ्या टोळीने पळ काढला .
यावेळी या ठिकाणच्या नागरिकांनी जखमी वैष्णवला भिगवण येथील खासगी आय सी यु मध्ये उपचारासाठी दाखल केले.डोक्यात झालेल्या अतिशय गंभीर जखमा मुळे वैष्णवची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टर यांनी दिली.भिगवण पोलीस ठाण्याचे अधिकारी दिलीप पवार यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देत प्रकरणाची माहिती घेतली .तसेच संशयित आरोपींना शोधण्यासाठी पथक नियुक्त करीत शोध सुरू केला.
मात्र या प्रकरणामुळे भिगवण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसून आले . या अज्ञात हल्लेखोराना पकडण्याची मागणी तक्रारवाडी गावातून होत आहे .

घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी हॉस्पिटलमध्ये येत माहिती घेतली .तसेच आरोपींच्या नावाची माहिती घेत आरोपींना शोधण्यासाठी पथकाची नियुक्ती केली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here