लहान मुलाला अभ्यास करताना आईने हाताने केली होती मारहाण म्हणून नवरा रागावल्याच्या कारणातून दिला जीव
भिगवण वार्ताहर.दि.१३
मुलाचा अभ्यास घेत असताना पती रागावल्याच्या कारणातून विवाहितेने गळफास लावीत जीव दिल्याची घटना भिगवण येथे घडली.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रोहिणी राकेश थोरात वय २५ असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.याबाबत राकेश थोरात यांनी तक्रार दिली असून यामध्ये नमूद केल्या प्रमाणे शुक्रवारी सकाळी राकेश थोरात कामावरून घरी आलेले असताना पत्नी रोहिणी हि मुलाचा अभ्यास घेत होती .तर मुलगा राघव हा अभ्यास करत नसल्यामुळे रोहिणी त्याला हाताने मारहाण करत असल्याचे दिसून आले.यावेळी राकेश याने रोहिणीला तु अभ्यासासाठी मुलाला का मारते त्याचा अभ्यास तो करेल असे म्हणत तिच्या हातातून सोडवत हाताला झटका देत आपल्या जवळ घेतले.यावेळी चिडलेल्या रोहिणी हिने आता याचा अभ्यास तुम्हीच घ्या असे रागाने म्हणत घरात जावून दरवाजा बंद केला. बराच वेळ होवूनही दरवाजा न उघडल्याने मनात शंका निर्माण झाल्यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रोहिणी हिने घराच्या छताच्या हुकाला ओढणीने गळफास घेतल्याचे दिसून आले.यावेळी राकेश याने रोहिणीला खाली घेत शेजार्याच्या मदतीने दवाखान्यात नेले असता तिचा जीव गेला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
याची तक्रार पती राकेश थोरात यांनी भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे .