भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा गळा चिरून खून ; भादलवाडी अकोले शिवे वर आढळून आला मृतदेह

0
2691

भिगवण वार्ताहर.दि.२४

भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील भादलवाडी येथे ३४ वर्षीय इसमाचा गळा चिरून खून झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.याबाबत भिगवण पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करीत तपासासाठी पथकाची नेमणूक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार महेश दत्तात्रय चव्हाण वय ३४ रा.रावणगाव इरीगेशन कॉलनी असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.मयत महेश याची अकोले या ठिकाणी सासरवाडी असून रक्षाबंधना साठी तो पत्नीसह अकोले गावी आला होता.सोमवारी रात्री देवदर्शनाला जातो असे निघालेला महेश संध्याकाळी घरी परतला नाही. दुसऱ्या दिवशी अकोले भादलवाडी गावाच्या शिवेवर असणाऱ्या नीरा भीमा नदी जोड प्रकल्पाच्या डम्पिंग दगडामध्ये कामगारांना त्याचा मृतदेह आढळून आला.मयत महेशचा गळा धारदार शस्त्राने चिरून त्याचा खून करण्यात आल्याचे घटना स्थळी दिसून आले आहे.याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात मयताचा भाऊ नितीन दत्तात्रय चव्हाण याने दिलेल्या फिर्यादीवर गुन्ह्याची नोंद करीत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत तपास सुरु केला आहे.

भिगवण पोलीस हद्दीत झालेल्या या खुनाच्या तपासासाठी बारामती विभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी भेट देत माहिती घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here