भिगवण परिसरातील अनेक शेतकऱ्यांची जवळपास ५० ,लाख रुपयांची फसवणूक
अनेकांना टोपी घालणाऱ्या मुकादम याने आपली पत्नी पाठवून करार करण्याच्या प्रयत्नात करताच पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
भिगवण वार्ताहर.१३
ऊस तोडणी साठी कामगार देतो म्हणून अनेकांना टोप्या घालणाऱ्या टोळी मालकाच्या (मुकादम ) विरोधात भिगवण पोलिसांत दोन उस वाहतुकदार ट्रॅक्टर मालकांकडून गुन्हा नोंद करण्यात आला. एकाच मुकादमाने भिगवण परिसरात अनेकांना गंडा घातल्याने आणखीन काही गुन्हे नोंद होणार असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणी सिताराम सोमा मोरे, दिलिप भाऊसाहेब सोनवणे, कमल सिताराम मोरे सर्व रा. धाडणे, ता. साक्री, जि. धुळे यांच्यावर भिगवण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत भास्कर बाबुराव काळे, रा. डिकसळ यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत हकिकत अशी की काळे यांचे कडून तीन लाख छपन्न हजार व विश्वास रंगनाथ देवकाते रा. मदनवाडी यांच्याकडून दोन लाख पंचविस हजार असे एकूण पाच लाख एक्याएंशी हजार एवढी रक्कम रोख स्वरुपात घेऊन उस तोडणी मजूर पुरविण्याची हमी दिली होती. मात्र उस तोडणी मजूर न पुरवता विश्वासघात केला.
या प्रकरणाचा तपास भिगवण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली विनायक दडस पाटील हे पुढील तपास करीत आहेत .
….फसवणूक झालेल्या शेतकर्यांनी संपर्क साधावा : जीवन माने
याबाबत बोलताना भिगवण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी आवाहन केले की, अशा प्रकारे भिगवण आणि परिसरातील अनेक शेतकर्यांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असून संबंधितांनी तात्काळ संपर्क साधावा त्यांना न्याय देण्याचा पोलिस प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करेल.
….उसतोड मुकादमांच्याद्वारे फसवणुक हा उस उत्पादन क्षेत्रातील वाहतुकदारांचा महत्त्वाचा प्रश्न आहे. उस पट्ट्यातील शेतकरी वाहतुकदारांची अनेकदा फसवणूक होत असते अशा चर्चा नेहमीच पुढे येत असतात. उस वाहतुकदार पुढे येत नाहीत त्यामुळे कारखाण्याकडून घेतलेली उच्चल स्वरुप रक्कम उस वाहतुकदारांना भरपाई करावी लागते. विशेषत: उस तोडणी हंगाम सुरु होण्याच्या काळात तोडणी कामगारांच्याकडून फसवणूकीचे प्रकार चर्चेला येत असतात.
















