Tuesday, October 6, 2026
Home Blog Page 30

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकास कामांचा धडाका भिगवण शेटफळ रस्त्यासाठी तब्बल 11 कोटींचा निधी मंजूर

0

भिगवण वार्ताहर.दि.१०

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा विकास कामांचा धडाका भिगवण  शेटफळ रस्त्यासाठी तब्बल 11 कोटींचा निधी मंजूर

भिगवण बारामती  हा नेहमीच जादा वर्दळीचा रस्ता म्हणून ओळखला जाणारा राज्यमार्ग . मात्र  भिगवण ते शेटफळगढे दरम्यान च्या  परिसरामध्ये मदनवाडी ओढ्यावरती असणारा  जीर्ण झालेला ब्रिटिशकालीन पुल   आणि मदनवाडी घाटातील झेड आकाराचा वळणरस्ता अपघात प्रणव समजला जातो . याठिकाणी अनेकवेळा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व मिळाले आहे .परंतु आता त्या रस्त्याने प्रवास करणाऱ्यांना या त्रासातून लवकरच मुक्ती मिळणार आहे.

सामान्य प्रशासन  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पुढाकाराने या रस्त्यासाठी अकरा कोटी साठ लाख  रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 

 बारामती एमआयडीसी तसेच परिसरातील सर्व सहकारी व खासगी साखर कारखाने यामुळे सातत्यानं या रस्त्याने अवजड वाहतूक सुरू असते .अशातच कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यानंतर मदनवाडी घाटातून वर चढणाऱ्या ट्रॅक्टर चालकांची “सर्कस” पाहिल्यानंतर पाहणाऱ्याला ही दरदरून घाम फुटावा अशीच परिस्थिती असते. त्यामुळे कारखाने सुरू असताना या परिसरात सातत्याने छोटे मोठे अपघात होतच असतात. 

मध्यंतरीच्या काळामध्ये मदनवाडी घाटातील वळणावर इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती रमेश बापू जाधव यांचे अपघाती निधन झाले होते.त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी  त्यांच्या घरी आले होते तेव्हा या घाट रस्त्यावरील वळणे काढून टाकण्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने हा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा प्रश्न चांगलाच मनावर घेतला.

त्यांच्या पाठपुराव्यामुळे  रस्त्याच्या कामाच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. त्यानंतर तांत्रिक मान्यता मिळेल. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण होईल.व कोरोनाचा  हा संकटकाळ सरल्यानंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल. त्यानुसार या निधीतून जुन्या भिगवण पुलाजवळ नवीन पुलाची निर्मिती होणार असून त्यासाठी 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.त्यातून 47 मीटर लांबीचा व 12 मीटर रुंदीचा पुल या ठिकाणी बांधला जाणार आहे. तेथील झेड आकाराची वळणे काढून टाकली जाणार आहेत. तसेच मदनवाडी हद्दीतील ओढ्यावरील  ब्रिटिशकालीन पुल पाडून तिथे चार कोटी रुपये खर्चून नवीन पूल बांधला जाणार आहे.

32 मीटर लांब व 12 मीटर रुंद आकाराचा हा पूल असणार आहे. तेथीलही झेड आकाराची वळणे काढून रस्ता सरळ केला जाणार आहे.तसेच मदनवाडी घाटातील 7 मीटर रुंदीचा रस्ता 10 मिटर रुंदीचा केला जाणार असून वळणे काढून रस्ता  सरळ केला जाणार आहे.  त्यामुळे या रस्त्याचा प्रवास लवकरच सुखकर झालेला पाहावयास मिळणार असून वाहनचालकांनाही दररोजच्या कराव्या लागणाऱ्या कसरतीतून  मुक्तता मिळणार आहे.

अपघाती वळणे काढून टाकण्यासाठी ११ कोटींचा निधी मंजूर करीत इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती कै .रमेशबापू जाधव यांना राष्ट्रवादी पक्षाकडून एक प्रकारची श्रद्धांजली अर्पित करण्यात आली .

“माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियानात इंदापुर तालुक्याने आघाडी घेतली असुन डाळज नं १ येथे सर्वेक्षण

0

डाळज वार्ता .१७ 

“माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियानात इंदापुर तालुक्याने आघाडी घेतली असुन डाळज नं १  येथे सर्वेक्षण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी सर्वेक्षणात सहभाग घेत स्वतः नागरिकांची तपासणी केली आणि लक्षण असणाऱ्या नागरिकांनी रॅपीड ॲंटिजन टेस्टसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. 

आज डाळज गावात २४५ कुटुंबातील नागरिकांचे सर्वेक्षण पल्स ऑक्सिमिटर, टेम्प्रेचर गणच्या सहाय्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र डाळज व प्राथमिक शिक्षक यांच्या ६ पथकाने केली यामध्ये गावातील नागरिकांनी सहकार्य केले गावात आजपर्यंत ३१ पेशन्ट कोरोना पोजिटीव्ही होते त्यातील ६ जण उपचार घेत आहेत व बाकीचे रुग्ण बरे झाले आहेत तर एकाची मयत झाली आहे.

“माझे कुटुंब माझी जबाबदारी” अंतर्गत डाळज येथे सर्वेक्षण करताना जिल्हा परिषद सदस्य श्री. हनुमंत बंडगर

सर्वेक्षण मध्ये ४७ जण संशयित आढळ्याने त्यांची रॅपिड अँटिजेंन चाचणी करण्यात आली यामध्ये २ जण पोजिटीव्ह आले.

अभियानात जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, पोलीस उपनिरीक्षक रियाझ शेख ,विस्तार अधिकारी दिलीप जगताप, सरपंच विकास कुंभार उपसरपंच हनुमंत मेटे, कुमार परकाळे, तलाठी गायकवाड, ग्रामसेवक जहांगीर मुलाणी, आरोग्य विभागाचे डॉक्टर व्यवहारे, समुदाय आरोग्य अधिकारी , मृदुला जगताप भगत, किर्ती व्यवहारे, टेस्टिंग लॅबचे पाळंदे, अशोक मोरे  उपस्थित होत.

विना मास्क आणि दुचाकीवर सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी २०० रुपयाचा दंड वसूल करून त्याचा वापर भिगवण येथील कोरोना सेंटर वर केला जावा

0
विना मास्क आणि दुचाकीवर सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी २०० रुपयाचा दंड वसूल करून त्याचा वापर भिगवण येथील कोरोना सेंटर वर केला जावा
विना मास्क आणि दुचाकीवर सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी २०० रुपयाचा दंड वसूल करून त्याचा वापर भिगवण येथील कोरोना सेंटर वर केला जावा

भिगवण वार्ताहर.दि.१०

लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शासनाने ग्रामपंचायतीला विना मास्क आणि दुचाकीवर सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी २०० रुपयाचा दंड वसूल करण्यासाठी परवानगी दिली होती.

या दंडातून भिगवण आणि परिसरातील ग्रामपंचायत कडे लाखो रुपयाचा दंड वसूल करण्यात आला हि रक्कम ग्रामपंचायत खात्यावर पडून असून या निधीचा वापर भिगवण येथील कोरोना सेंटर वर केला जावा अशी मागणी इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

भिगवण कोरोना सेंटर मध्ये भिगवण रोटरी क्लब तसेच दत्तकाला स्कूल आणि भिगवण ग्रामपंचायत सदस्य तुषार क्षीरसागर यांच्या माध्यमातून बेड आणि गाद्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तर रोजच्या खर्चाची जबाबदारी महसूल विभाग आणि भिगवण ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे.

तरीही अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत.त्यामुळे नागरिकांकडून विना मास्क साठी केलेला दंडाची रक्कम भिगवण कोविड सेंटर साठी वापरण्यात यावा अशी मागणी देहाडे यांनी केली आहे.तसेच भिगवण कोविड सेंटर मध्ये आयसी यु बेडची संख्या वाढविण्यात यावी आणि अम्बुलंस सेवा उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे.

भिगवण कोविड सेन्टरमध्ये उपचार घेण्यासाठी डिकसळ ,कुंभारगाव ,अकोले ,पोंधवडी ,तक्रारवाडी ,पिंपळे मदनवाडी ,मसोबावाडी ,शेटफळ येथील रुग्ण येत असतात तर या ग्रामपंचायती कडे लाखो रुपयाचा खात्यावर पडून आहे.

तर १५ वा वित्त आयोगातील रक्कम हि ग्रामपंचायत खात्यावर वर्ग करण्याची तयारी शासनाकडून चालू आहे.त्यामुळे कोरोना काळात जमा झालेली दंडाची रक्कम कोरोना सेंटर वर वापरण्यात यावा अशी मागणी देहाडे यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे केली आहे.

निसर्गातील ‘इंजिनिअर’ साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची ‘कारागिरी’ मनावर भुरळ घालणारी!

0
निसर्गातील 'इंजिनिअर' साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची 'कारागिरी' मनावर भुरळ घालणारी!

खेड:विजय सोनवणे

‘अरे खोप्यामधी खोपा

 सुगरणीचा चांगला

 देखा पिलासाठी तिनं

 झोका झाडाले टांगला’

निसर्गकन्या,कवयित्री बहिणाबाई यांनी सुगरणीच्या कौशल्याचे वर्णन या कवितेतून केलेले आहे.

इवलीशी चोच आणि पायाची दोन बोटं…इंजिनियरलाही लाजवेल एवढं टॅलेंट मोठं… खरोखरच मनाला अचंबा वाटावा अशी गोष्ट आहे सुगरण पक्ष्यांच्या घरट्यांची. निसर्गातील अनेक चमत्कार आपण पाहतो त्यात सुगरणीचा खोपा देखील निसर्गातील उत्कृष्ट कारागिरीचा नमुनाच आहे.

निसर्गातील ‘इंजिनिअर’ साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची ‘कारागिरी’ मनावर भुरळ घालणारी!

खेड शिवारातील एका उसाच्या बांधावर असणाऱ्या नारळाच्या झाडाच्या फांदीला लटकलेली सुगरणीच्या खोप्याची घरटी मनाला सुखद धक्का देणारी आहे.गळा आणि पोटावर पिवळ्या रंगाची उधळण केलेला सुगरण पक्षी बहुतांशी देशी बाभळीच्या झाडावर दिसून आल्याशिवाय राहत नाही.त्यांच्याकडुन बांधण्यात येत असलेली अतिशय नाजूक विणकाम असलेली ही सुंदर घरटी प्रत्येकाच्या मनावर भुरळ घालणारी आहेत.

साधारणत: पावसाआधी जुन महिन्यात नर पक्षांकडून घरटी बांधण्याची लगबग सुरू होते.

निसर्गातील ‘इंजिनिअर’ साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची ‘कारागिरी’ मनावर भुरळ घालणारी!

जून ते ऑगस्ट हा त्यांचा विणीचा हंगाम असतो.गवताच्या काडीने झाडाच्या फांद्यावर घरट्याची पहिली गाठ बांधताना त्यांचे खरे टॅलेंट आपल्याला दिसून येते. गवत व शिंदीच्या काड्यापासून नर काही दिवसातच आपले घरटे तयार करतो आणि हे घर तयार झाल्यानंतर सुगरण या घराची न्याहाळणी करते.घर आवडले तरच ती तिथे थांबते.मात्र घरटे न आवडल्यास नर पक्षाकडून ते घरचे मोडले जाते व पुन्हा नवीन घरटे तयार केले जाते.

शत्रुपक्षी व सापांपासून संरक्षण व्हावे यासाठीच ही घरटी उंच फांद्यांवर आणि फांद्यांच्या टोकाला बांधण्यात येत असावीत.त्यांच्या विचारसरणीचा अभ्यास माणसाने करावा आणि आपले निसर्गातील धोक्यांपासुन संरक्षण करावे हा संदेश जणु हे सुगरण पक्षी देताना दिसतात.सुबक आणि आकर्षक घरटी जेंव्हा वाऱ्यावर झुलतात तेंव्हा झोका झुलावा असाच भास आपल्याला होऊ लागतो.

खेडची नैसर्गिक संपन्नता पक्षांची संख्या वाढवणारी! खेड येथे चहुबाजूंनी हिरवाई असुन या परिसराला वरदायिनी म्हणून लाभलेली भीमा नदी यामुळे हा भाग कायम संपन्न वाटतो. अनेक देशी झाडे,विविध जातींचे पक्षी यामुळे या परिसरात पक्षांची किलबिल नेहमी कानी पडते. देशी झाडांवर सुगरणीची घरटी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात ही बाब खेडच्या सौंदर्यात भर घालणारी आहे.

छाया: खेड शिवारात उसाच्या शेताच्या बांधावर असलेल्या नारळाच्या झाडाच्या फांद्यांवर साकारलेली ही मनमोहक घरटी (छाया:विजय सोनवणे)

वैश्विक महामारीच्या संकटाला संधी समजून काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने लाखो रुपयांचे केळीचे उत्पन्न

0

भिगवण वार्ताहर .दि .18

संधी समजून काम केलं पाहिजे  नेहमी म्हटल जात मात्र कोरोणा सारख्या वैश्विक महामारीच्या संकटाला संधी समजून काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने लाखो रुपयांचे केळीचे उत्पन्न घेऊन प्रत्यक्षात आणले आणि इतर शेतकऱ्यांच्या समोर देखील एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

इंदापुर तालुक्यातील मदनवाडी गावच्या तुकाराम बंडगर यांनी आपल्या शेतात केळीचे पीक घेत लाखो रुपये कमावले .

याबाबत बंडगर यांनी माहिती सांगताना केळी सारखे जास्त पाण्याचे पीक घेण्याअगोदर सर्व समस्यांचा अभ्यास केला केळीला सुरुवातीलाच होणारी हुमनी केळी मध्ये निर्माण होणारे गवत आणि फळांच्यावर बसणारे मच्छर यापासून बचाव व्हावा यासाठी सुरुवातीलाच पूर्ण नियोजन केले . सात बाय पाच या अंतरावरती  जैनची j९ जातीच्या केळीच्या रोपांची लागवड केली असून साधारण साडे बाराशे रूपे एकरामध्ये लागवड केली आहे पंधरा रुपये प्रमाणे रोपे विकत घेतली आहेत पाणांना हिरवी आळी लागु नये आणि मुळ कुज होउ नये यासाठी औषध फवारणी केली औषध खर्च कमीत कमी केला आहे मात्र फुटवे काढण्यासाठी मजुरांना वेळच्यावेळी खर्च केला आहे .    

खतांचे व्यवस्थापन केल्याने केळी जोमदार आली आहे बारामती एग्रोचे जैविक खत वापरले आहे याच बरोबर ०:५२:३४ या खतांचा वापर विन चालू होत असताना केला १३:०:४५ वापरले आहे यानंतर शेवटच्या टप्प्यात पॉटॅश या रासायनिक खतांचाही वापर केला असल्याची माहिती दिली .

केळी पिकाला सुरुवातीपासून साधारण दीड लाख रुपये एकरी खर्च अपेक्षित आहे यामुळे किलोला चार ते पाच रुपये खर्च बसतो केळीच्या लागवडीपासून रुपये मशागत खत बियाणे कामगार यावरती वेळच्या वेळी खर्च केल्यानंतर केळीला चांगला बाजार मिळाला तर केळीतून साधारण साडेतीन ते साडेचार लाख रुपये नफा मिळू शकतो याचे उत्तम उदाहरण तुकाराम बंडगर यांचे आहे दोन वर्षापुर्वी साडे पाच एकर लागन केली होती  यातुन बाविस लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले तर यावर्षी सतरा एकर केळीची लागवड केली आहे  निर्यातक्षम केळी असुनही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व्यापाऱ्यांना विक्री केली आहे.

केळीचे पीक चांगलं येण्यासाठी शेणखताचा वापर केला आहे साधारण एकरी सहा ट्रेलर शेणखत वापरले आहे याबरोबरच ड्रिप मधून रासायनिक खतांचा वापर केला आहे शेणखताला पन्नास हजार रुपये खर्च केला आहे तर ड्रीप मधील खातांना वीस ते बावीस हजार रुपये खर्च केला आहे त्यामुळेच केळीला चांगला जोम बसतो असं देखील यावेळी तुकाराम बंडगर यांनी सांगितले. 

पीक व्यवस्थापनामध्ये शेतकऱ्यांनी सर्वाधिक खर्च खातांच्यावरती केला पाहिजे यानंतर गवत नष्ट करण्यासाठी सर्व अधिक प्रयत्न केले पाहिजे आणि केळी पिकामध्ये केळीचे फुटवे वेळच्यावेळी काढले तर नक्कीच उत्पादन वाढायला मदत होते असे देखील बंडगर यांनी सांगितले .पाण्याच्या व्यवस्थापनासाठी ड्रिपची सोय केली आहे रोपांच्या दोन्ही बाजूला ड्रिप टाकली असून यामधून खते देखील दिली जातात केळी पिकाला आवश्‍यक पाणी मिळावे यासाठी २० डिस्चार्ज असलेली पाईप वापरायला हवी शासनाच्या अनुदानाची वाट न पाहता शेतकऱ्यांनी पिकाचे पाणी व्यवस्थापन केले पाहिजे शासन अनुदान देत असताना अनेक त्रुटी ठेवत असते यामुळे शासकीय अनुदानाची वाट न पाहता पीक व्यवस्थापन करावे आणि शेतकर्‍याने आपल्या सोयीने पाण्याची व्यवस्था करावी असे देखील बंडगर पाणी व्यवस्थेबद्दल बोलताना सांगितले. 

एक एकरामध्ये साडेबाराशे रोपांची लागवड केली आहे एका रोपाला ४० ते ५५ किलो पर्यंत केळी लागत आहे एकरात सरासरी ४५ किलो प्रमाणे साडेबाराशे रोपांना सरासरी ४० टन  केळीचे उत्पादन काढण्यात यशस्वी झाले आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केळीला बाजार मिळत नसल्याने व्यापारी मनमानी भावाने खरेदी करत आहेत तरीही बंडगर यांना ७ ते ९ रुपये दर मिळाल्याने एकरी ४ लाख रुपये मिळाले असल्याची माहिती दिली .

पुण्याच्या बाजूकडे जाणारा मालवाहतूक कंटेनर ताब्यात घेत यातील अवैध गुटखा जप्त

0

भिगवण वार्ताहर.दि.५

भिगवण पोलिसांच्या पथकाने पुणे सोलापूर महामार्गावर भादलवाडी गावच्या हद्दीत सोलापूर हून पुण्याच्या बाजूकडे जाणारा मालवाहतूक कंटेनर ताब्यात घेत यातील अवैध गुटखा जप्त केला.  

हायवे पेट्रोलिंग दरम्यान केलेल्या या कारवाईत जवळपास वाहनासह ७६ लाख २४ हजार रुपयाचा ऐवज ताब्यात घेतला.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख यांनी दिलेल्या माहिती नुसार भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक इन्कलाब पठान हे पुणे सोलापूर महामर्गावर गस्त घालीत असताना त्यांना हा संशयित कंटेनर आढळून आला.यावेळी पठान यांनी सदर कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने गाडी सुसाट वेगात पुणे बाजूकडे नेण्यास सुरवात केली.यावेळी पठाण यांनी सदर वाहनाचा पाठलाग करीत याची माहिती वरिष्ठ अधिकारी जीवन माने यांना दिली.
घटनेतील गांभीर्य ओळखत माने यांनी भिगवण पोलीस पथकाची दुसरी टीम करीत भिगवण येथे नाकाबंदी करीत संशयित वाहन ताब्यात घेतले.यावेळी वाहन चालकाला गाडीतील मालाविषयी विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.

तसेच गाडीतील मालाविषयी कोणत्याही प्रकारचे कागदपत्राची पूर्तता केली नाही.या कारणामुळे अखेर भिगवण पोलिसांनी पंच बोलावून चित्रीकरण करीत गाडीचे दरवाजाचे सील तोडले यावेळी गाडीतील माल पाहून पोलीस सुद्धा चक्रावून गेले.

यात जवळपास ५६ लाख रुपयाचा गुटखा आढळून आला.महाराष्ट्र राज्यात गुटखा आणि सुगंधी सुपारीला बंदी असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटखा वाहतूक केल्याबाबत वाहनचालक करमहुसेन हसनराजा चौधरी  वय ३३ रा.मुडीला ता.मेह्दावल उत्तरप्रदेश याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली.तसेच अज्ञात पुरवठादार व हिरा पानमसाला उत्पादक याच्या विरोधात भा.द.वी अन्न सुरक्षा अधिनियम २००६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख ,इन्कलाब पठान यांनी केली.

कोरोना काळात फटाक्याची आतिषबाजी करणे पडले महागात

0

भिगवण वार्ताहर.दि.१०

कोरोना काळात फटाक्याची आतिषबाजी करणे पडले महागात, कोरोना सारख्या महामारीमुळे सर्वसामान्य जनता त्रासून गेली असताना स्वताचा वाढदिवस फटाक्यांची आतिषबाजी करीत साजरा करणाऱ्या महाभागाला भिगवण पोलिसांनी चाप लावण्याचे काम केले.

वाढदिवस असणाऱ्या बर्थडे बॉय आणि हॉटेल चालकाच्या विरोधात भा.द.वि कलम १८८ प्रमाणे गुन्हा नोंद करीत याबाबत भिगवण पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहिती नुसार नितीन दिलीप कदम तसेच हॉटेल मालक भूषण रामराजे शिंदे याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

कोरोना सारख्या महामारी चा काळ सुरु असताना आपल्या वाढदिवसाचे आयोजन करीत मोठ्या प्रमाणावर तरुणांची गर्दी जमवीत सोशल डीस्टन्सिंग चे नियम धाब्यावर बसवीत फटाक्यांची आतिषबाजी करीत वाढदिवस साजरा केला जात होता.

तर हॉटेल मालकाने या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी कोणतीही परवानगी न घेता जागा उपलब्ध करून दिली होती.त्यामुळे भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी सदर प्रकरणी सहा.फौजदार जगदीश पोमणे यांच्या तक्रारी वरून गुन्ह्याची नोंद केली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वच स्तरातील नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.याबाबत बोलताना प्रभारी पोलीस अधिकारी यांनी नागरिकांना सामाजिक स्थितीचे भान ठेवण्याचे आवाहन केले आहे.

कोरोना सारखी महाभयानक परिस्थिती असताना आरोग्य यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा जीवाचे रान करून समाजाचे रक्षण करीत असताना वाढदिवसाला फटाक्यांची आतिषबाजी असो अथवा लग्नसमारंभ डीजे लावून जोमात करणे योग्य नसल्याचे सांगितले.तर अशा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

राफेल कराराची कागदपत्रे चोरीला, महाधिवक्त्यांची सुप्रीम कोर्टात खळबळजनक माहिती

0

नवी दिल्ली, 6 मार्च : संरक्षण मंत्रालयातून राफेल कराराबाबतची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत किंवा अनधिकृतपणे हाताळण्यात आली आहेत, अशी धक्कादायक माहिती महाधिवक्ता के.के वेणूगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात दिली आहे. महाधिवक्त्यांच्या या माहितीने मोठी खळबळ उडाली आहे.

‘संरक्षणाबाबतची अशी गुप्त कागदपत्र समोर आणणं हा गुन्हा आहे. त्यामुळे याबाबतचा तपास सुरू आहे. हे एक संवेदनशील प्रकरण आहे,’ असं के.के वेणूगोपाल यांनी सुप्रीम कोर्टात म्हटलं आहे. 

दरम्यान, राफेल मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याप्रकरणी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.