Tuesday, October 6, 2026
Home Blog Page 28

इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते यांच्यावर जीवघेणा हल्ला

0

भिगवण वार्ता.13

इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते यांच्यावर काही अज्ञात इसमाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवे वरील असणारे आबासाहेब देवकाते यांचे घराशेजारील हॉटेलवर हा प्रकार घडला रात्री उशिरा जेवणासाठी आलेल्या या सहा अज्ञात इसमानी काही कारणावरून हॉटेलचे मालक संतोष देवकाते यांच्याशी वाद करीत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते

यावेळी हॉटेलमधील असणाऱ्या कामगारांनी याची माहिती आबासाहेब देवकाते यांना दिली यावेळी आबासाहेब देवकाते यांनी नक्की झालेला प्रकार काय आहे याची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी गेले असता अज्ञात इसमांनी त्यांच्यावर लाकडी दांडके घेऊन हल्ला केला यातील एक हल्ला आबासाहेब देवकते यांच्यावर मी झाले ते गंभीर जखमी झाले.

चॉकलेट कलरच्या चे एम जी हेक्टर वाहनातून आलेले सदर अज्ञात इसम सोलापूरच्या बाजूने येऊन पुन्हा त्याच दिशेने निघून गेले. जखमी अवस्थेत देवकाते यांना भिगवण येथील भिगवन आयसीयू सेंटर प्राथमिक उपचार करून पुणे येथील रुबी हॉल येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

वर्मी घाव बसल्यामुळे जखमी झालेले देवकाते यांचेवर पुणे येथील रूबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत माहिती मिळताच भिगवण पोलिस स्टेशनचे एक पथक घटनास्थळी जाऊन हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला तसेच या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली.

भिगवण बारामती राज्यमार्गावरील वाहतुकीस होणारा अडथळा दूर करून अनधिकृत पार्किंग बंद करण्याची मागणी

0

भिगवण वार्ताहर.दि.२२


भिगवण बारामती राज्यमार्गावरील वाहतुकीस होणारा अडथळा दूर करून अनधिकृत पार्किंग बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच पुणे जिल्हाआधीकारी यांच्याकडे केली असल्याची माहिती राज्य ग्राहक संरक्षण समिती सदस्य तुषार झेंडेपाटील यांनी दिली.

तसेच या अडथळ्यामुळे अपघात घडून जीवित हानी झाल्यास सबंधित प्रशासनावर जबाबदारी निश्चित करून या निवेदनाचा न्यायालयीन प्रक्रियेत पुरावा म्हणून सादर करणार असल्याचे निवेदनात सूचित करण्यात आले आहे.

एकाच बाजूने सुरू असणाऱ्या वाहतुकीमुळे जीव धोक्यात घालून वाहने चालविता दुचाकीस्वार

भिगवण बारामती राज्य मार्गावरील पिंपळे आणि शेटफळ गावाच्या हद्दीत जवळ पास २ ते ३ किलोमीटर उस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रांग लागल्याचे चित्र महिनाभरा पासून पहावयास मिळत आहे.याठिकाणी वाहने तासंतास आपल्या नंबरची वाट पाहत थांबलेली असतात त्यामुळे राज्य मार्गाची एक बाजू प्रवासासाठी बंद ठेवली जाते.तर काही वाहन चालक आडमुठे स्वभावाचे आणि आपला नंबर यावा यासाठी दुसऱ्या बाजूच्या वाहनाचा विचार न करता वाहने घुसवीत असतात त्यामुळे हा पूर्ण रस्ताच बंद होतो.तसेच इतर वाहन धारकांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो.तसेच यातून अनेक वेळा अपघात घडत असल्याचे दिसून आल्याने झेंडेपाटील यांनी आर.टी.ओ आणि जिल्हाआधीकारी यांना याबाबत निवेदन देले असल्याचे सांगितले.

तर कारखाना परिसरात जागाच उपलब्ध नसल्याने नाईलाजाने वाहने मुख्य रस्त्यावर उभी करावी लागत असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.

कारखान्याची वाहने रस्त्यावर तासनतास उभी राहत असल्याने बारामती भिगवण रस्ता बंद राहत असताना यावर भिगवण पोलीस तसेच बारामती आर टी ओ राजकीय दबावाखाली कोणतीही कारवाई करीत नसल्याची प्रवासी नागरिकांची तक्रार आहे.याबाबत जिल्हाधिकारी आणि आर टी ओ यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बारामती भिगवण राज्य मार्गावर पार्कींग करण्यात आलेली उसाची वाहने

भिगवण बारामती राज्य मार्गावरील मदनवाडी घाटात उस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रोज होणारी सर्कस व्हिडिओ माध्यमातून सोशल मिडीयावर फिरत आहे.तर या वेळी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचा गोळा आल्याशिवाय राहत नाही.

या अनाधिकृत पार्किंग मुळे अनेक अपघात घडत असताना प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे .यामुळेच या अपघातात जीवित हानी झाल्यास याची जबाबदारी सबंधित विभागावर निश्चित करून गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असल्याची माहिती तुषार झेंडेपाटील यांनी दिली.

बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील अकोले येथील दोन आरोपींना अटक

0

भिगवण वार्ताहर. दि. २१

भिगवन पोलिसांनी (दि.२०) रोजी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील अकोले येथील दोन आरोपींना अटक केली. याप्रकरणी एक पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांच्या पथकाला यश आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दादासो रामचंद्र दराडे व महादेव चंद्रकांत दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर जि. पुणे) या दोन आरोपींना अटक केली आहे.

भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, (दि.२० रोजी) भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना खबऱ्या मार्फत मिळालेल्या बातमीनुसार अकोले येथील गणपती मंदिरासमोरील रोडवर सदर आरोपी आपल्या ताबेतील मारुती सुझुकी कार नं  एम एच ४२ ए एस ०००८ हिचे मधून एक अग्नीशस्त्र ( गावठी पिस्टल), ४ जिवंत काडतुसे जवळ बाळगून फिरत असल्याची खबर मिळाली होती. यावरून भिगवण पोलिसांनी सापळा रचून सदर आरोपी व त्यांच्या कडील एक गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे किं.रु. ५,५०,८०० / – चा मुद्देमाल हस्तगत केला‌. तसेच सदर गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीला देखील सापळा रचून अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.

सदरची कामगिरी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस हवालदार नाना वीर, पोलीस नाईक गोरख पवार, इन्कलाब पठाण यांनी केली.

पुणे जिल्ह्यात आज पर्यंत भिगवण पोलिसांनी केलेली अग्निशस्त्र कारवाई मोठी आहे. आतापर्यंत भिगवन पोलिसांनी सतरा च्या वर अग्निशस्त्र जप्त केलेली आहेत .

भिगवण परिसरात  वसुली करिता अग्निशस्त्र जात असल्याची आज पर्यंत दबक्या आवाजात चर्चा होती. तसेच वाळू माफिया आपली दहशत नागरिकात पसरावी यासाठी कमरेला घोडे लावून फिरत असल्याची चर्चा होती मात्र भिगवन पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे आत्ता या वसुली करणारे आणि वाळू माफिया यांच्यात कमालीची घबराहट पसरली असल्याचे पाहायला मिळत आहेत तर पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आतापर्यंत किती जणांनी अशी अग्निशस्त्र घेतले आहेत. त्यांच्या नावाची यादी बाहेर काढणे गरजेचे झाले आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भिगवण आणि परिसरातील महिलांसाठी निम्म्या किमतीत पीठ गिरणी

0

भिगवन वार्ता दि. ९


महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून भिगवण आणि परिसरातील महिलांसाठी निम्म्या किमतीत पीठ गिरणी चे वाटप केले जाणार असल्याची माहिती इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी दिली आहे.

इंदापूर पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे 

रोजच्या स्वयंपाकाचे दळण हा महिलांचा जिव्हाळ्याचा विषय त्यातच सध्या होत असलेली गिरणीची दरवाढ आणि वेळेचा अपंग आहे यामुळे महिलांचा बराचवेळ दळण करण्याचा असतो . राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या विशेष प्रयत्नातून इंदापूर तालुक्यातील आणि भिगवण परिसरातील महिलांसाठी निम्म्या किमतीत गिरणीचे वाटप करण्यात करण्याचे काम हाती घेतले आहे असे माहिती इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय भाऊ देहाडे यांनी दिली आहे उपसभापती देहाडे यांच्या सहकार्याने अनेक महिलांना अनेक महिलांना शिलाई मशीन तसेच अनेक पंचायत समिती योजनांचा लाभ मिळालेला आहे त्यातच आता महिलांना मिळत असलेल्या गिरणी मुळे महिलांनी याचा फायदा होणार असून रोजच्या कटकटी त्यांची सुटका होणार आहे.

गरजू महिलांना याबाबत उपसभापती संजय दराडे यांच्या कार्यालयात याबाबतची माहिती दिली जाणार आहे तर संपर्कासाठी सचिन खडके कपिल भाकरे आकाश देहाडे जावेदभाई शेख ,प्रताप भोसले यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे गरजू महिलांनी आपले आधार कार्ड जवळ बाळगणेस सांगण्यात आले आहे.

शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव सुखदेव कन्हेरकर(वय.८२) यांचे अल्पशा आजाराने निधन

0

भिगवण वार्ताहर .7
भादलवाडी येथील शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस गुलाबराव सुखदेव कन्हेरकर(वय.८२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. इंदापूर तालुक्यातील बहुतेक गावात आणि परिसरात त्यांना साहेब या उपाधीने ओळखले जात होते .

गुलाबराव कन्हेरकर यांनी खडकवासला कालव्याचे पाणी, ऊसाला एफ.आर.पी., शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट आदींसाठी मोठा संघर्ष केला होता. गुलाबराव कन्हेरकर यांच्या निधनानेशेतकरी संघटनेचा अभ्यासू व लढवय्या नेता हरपला अशी भावना शेतकऱ्यांमधुन व्यक्त होत आहे.

भादलवाडी(ता.इंदापुर) येथील शेतकरी कुटुंबातील गुलाबराव कन्हेरकर यांनी सहकार खात्यांमध्ये प्रथम श्रेणी सहकार अधिकारी म्हणुन ३६ वर्षे सेवा
केली होती. १९९७ साली सहकार खात्यातुन सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सहकार खात्यातील अनुभवाचा उपयोग करुन इंदापुर तालुक्यामध्ये अनेक सहकारी
दुधसंस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटया, सहकारी पाणी वापर संस्था, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था निर्माण करण्यात महत्वपुर्ण भुमिका
निभावली. २०१० मध्ये शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांचे विनंतीवरुन शेतकरी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस म्हणुन त्यांनी धुरा सांभाळली.

पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात शेतकरी संघटना वाढीसाठी त्यांनी महत्वपुर्ण योगदान दिले. ऊसासाठी एफ.आर.पी., शेतीमालास आधारभुत किंमत, शेतकऱ्यांना कार्बन
क्रेडिट यासाठी त्यांनी संघर्ष केला. इंदापुर तालुक्यातील शेतकऱ्यांना खडकवासला धरणातील पाण्यासाठी त्यांनी रस्त्यावर व कोर्टाच्या माध्यमातून लढा दिला.
सहकारातील अनुभवाच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवन समृध्द करणारा व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अभ्यासपुर्ण पध्दतीने लढा उभारणारा लढवय्या नेता हरपला अशी भावना शेतकऱ्यांमधुन व्यक्त होत आहे. सत्यवार्ता न्युज परिवाराच्या वतीने लढवय्या नेत्याला भावपुर्ण आदांजली

भिगवण ग्रामपंचायत समोरील अपघातग्रस्त यू टर्न तातडीने बंद करण्याची मागणी…….

0

भिगवण वार्ताहर. दि.५


पुणे-सोलापूर महामार्गावरील भिगवण ग्रामपंचायत समोरील बंद केलेली यु टर्न पुन्हा सुरू केल्याने याठिकाणी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रविवारी याचा प्रत्यय आला असून मराठा क्रांती मोर्चा रास्ता रोको साठी मोठा पोलिस बंदोबस्त याठिकाणी असतानासुद्धा एका दुचाकीस्वाराला भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती व्हॅन ने जोराची ठोस दिली.

या अपघाताचा आवाज इतका जोरात होता की नक्की हा मोठा अपघात असण्याची शक्यता वर्तवली जात होती बंदोबस्त असणारे पोलीस अधिकारी रियाज शेख यांनी क्षणाचीही उसंत न लावता या ठिकाणी धाव घेतली .आणि अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला उचलण्यासाठी मदत केली .या अपघातग्रस्त दुचाकीस्वाराचे नशीब बलवत्तर आहे म्हणूनच की काय त्याला त्याला कोणत्याही प्रकारचे गंभीर प्रकारच्या जखमा न होता किरकोळ जखमा झाल्याचे दिसून आले .

अपघात घडला त्या ठिकाणी अशी वर्दळ होत असते यातूनच जीवित हानी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघ तसेच पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख यांनी यात अपघातग्रस्ताला तातडीने मदत मिळवून देत उपचारासाठी दवाखान्यात पाठवले.

या अपघाताची कोणी तक्रार केली नसल्याचे गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. मात्र भविष्यात या ठिकाणी मोठा अपघात कोण जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गेली चार वर्ष अपघातामुळे बंद केलेला हा यू-टर्न महामार्ग प्रशासनाने दुरुस्तीच्या नावाखाली चालू केला आहे . हा यू-टर्न चालू असताना अनेक अपघात घडले आहेत यात अनेकांचे जीव गेलेले आहेत याची जाणीव असताना महामार्ग प्रशासन सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळत आहे असा सवाल उपस्थित होत आहे.

अपघातग्रस्त ठिकाणचा हा यू-टर्न हटवल्यामुळे अपघात होऊन कोणाचा जीव गेला तरी याची जबाबदारी सर्वस्वी रस्ते दुरुस्त करणाऱ्या कंपनी वर टाकण्यात यावी. अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी केली आहे.

तर महामार्ग महामार्ग प्रशासनाने याठिकाणी अंडरपास ब्रीज ची निर्मिती केली तर भविष्यात होणारे अपघात कमी होण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिगवण ग्रामपंचायत आणि रोहित पवार मित्रमंडळाचे कार्यकर्ते महेश शेंडगे यांच्यावतीने गरजू नागरिकांना वाफेच्या मशीनचे वाटप

0

भिगवन वार्ता. दिनांक ,४
कर्जत तालुक्याचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिगवण ग्रामपंचायत आणि रोहित पवार मित्रमंडळाचे कार्यकर्ते महेश शेंडगे यांच्यावतीने गरजू नागरिकांना वाफेच्या मशीनचे वाटप विनामोबदला करण्यात आले.

सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. या आजाराला थांबवण्यासाठी अनेक प्रकारची उपाययोजना केली जात आहे त्यातीलच एक उपाय म्हणून वाफ यचे मशीन अर्थात विपोराईझर याचा वापर सर्रास केला जात आहे .मात्र ज्यांची ही वाफेच्या मशीन घ्यायची इच्छा आहे परंतु आर्थिक अडचण होत असल्यामुळे ती मशीन घेतली जात नाही याच कारणाने भिगवण ग्रामपंचायत पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते महेश शेंडगे यांनी गरजू नागरिकांना विनामोबदला पन्नास मशीनचे वाटप केले.

यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शंकराव गायकवाड ,संतोष धवडे सचिन बोगावत, अजिंक्य माडगे प्रशांत शेलार , रामहरी चोपडे , दादासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी बोलताना महेश शेंडगे यांनी सांगितले की वाफ घेण्याचे मशीन चा वापर करून कोरोनाला दूर ठेवता येणार आहे काही अडचणीमुळे ज्यांना कोणाला हे मशीन घेणे शक्य झाले नाही अशा गरजवंतानी भिगवन ग्रामपंचायत येऊन मशीन घेऊन जावे.

इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने भिगवण येथे रस्ता रोको

0

भिगवण वार्ता .४

इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने भिगवण येथे शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळेस मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीच्या वतीने शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व मंडलाधिकारी मकरंद तांबडे यांना देण्यात आले.

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग अतिशय शांततेत अर्धातासाहून अधिक काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, मराठा समाजबांधव सहभागी झाले होते.

“एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतंय देणार नाय घेतल्या शिवाय राहणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे” या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत, राज्य सरकारवर रोष व्यक्त केला व राज्य सरकारने केंद्र सरकारवर दबाव टाकून आरक्षणाला दिलेली स्थगिती उठवावी. नोकर भरतीला स्थगिती द्यावी. अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासकीय नोकरीतील बाबू बाबतीत नाराजी व्यक्त केली .

तर शैक्षणिक मंत्र्याने तातडीने घेतलेले निर्णय बाबत तसेच गृहमंत्र्यांनी पोलीस भरती बाबत काढलेल्या भरती विषयी नाराजी व्यक्त केली. सदर मागण्यांचा सरकारने जर सकारात्मक विचार केला नाही तर, भविष्यात उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी आंदोलकांनी दिला.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा तयार ठेवला होता. रस्ता रोको आंदोलन समारोप झाल्यानंतर भिगवन पोलिसांनी २८ कार्यकर्त्यांना अटक करीत पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमदार खासदार आणि मंत्री यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन

0

भिगवण वार्ता.दि.२


मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आमदार खासदार आणि मंत्री यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे.आज राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी हे आंदोलन करण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपन प्रयत्न शील असल्याची ग्वाही देताना राज्यमंत्री भरणे

यावेळी समाजाचे निवेदन स्वीकारीत स्वतः राज्यमंत्री भरणे हेच आंदोलन कर्त्या सोबत बसल्याचे दिसून आले.तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हे सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती भरणे यांनी यावेळी आंदोलनकर्त्यांना दिली.


मराठा समाजाला त्यांचे हक्काचे आरक्षण मिळावे म्हणून मराठा क्रांती मोर्चा आक्रोश मोर्चाचे आयोजन करीत राज्यातील आमदार खासदार आणि मंत्र्याच्या घरासमोर ढोल बजाव तसेच ठिया आंदोलन करीत आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ,राज्याचे उपमुख्यमंत्री मंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आली आहेत.

मराठा समाजाच्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घेत ठिय्या आंदोलन करताना राज्यमंत्री भरणे

आज राज्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या घरासमोर हे आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी भरणे यांनी स्वतः या आंदोलनात सहभाग घेत मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे ,मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा पाठींबा असून मराठा समाजाची भूमिका आपण सरकार दरबारी ठामपणे मांडणार असल्याचे सांगितले.

तर महाविकास आघाडी सरकार आरक्षणासाठी प्रयत्नशील असून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्याचे मंत्री उद्धव ठाकरे ,आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आरक्षणासाठी पाठपुरावा असल्याचे सांगितले.अशोक चव्हाण आरक्षणाचा विषय हाताळत असून न्यायालयात भूमिका मांडण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.
यावेळी मंत्री भरणे यांनी स्वतः आंदोलनात सहभाग नोंदवीत निवेदनाचा स्वीकार केला आणि समाजाच्या भावना सरकार दरबारी पोहोचविणार असल्याचे सांगितले.

मराठा समाजाचे निवेदन स्वीकारीत असताना भरणे आणि मराठा समाज बांधव


आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी भरणे यांच्या निवासस्थानी जाणाऱ्या सर्वच मार्गावर पोलीस प्रशासनाने अत्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता.बारामती उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर ,इंदापूर पोलीस ठाण्याचे पी .आय नारायण सारंगकर ,वालचंदनगर ए.पी.आय दिलीप पवार ,भिगवण पोलीस स्टेशनचे ए.पी.आय जीवन माने जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा

0

भिगवण वार्ता .दि.३०
भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा करण्यात आला.अगदीसर्वसामान्य नागरीका पासून ज्यांचे सारथ्य म्हणून काम केले अशा वरिष्ठ अधिकार्याने सलामी देत हा सेंड ऑफ चा कार्यक्रम पार पडल्याने पोलिसांत सुद्धा माणुसकी खचून भरलेली असल्याची जाण दिसून आली.

सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने सेवानिवृत्त ए एस आई शेख यांचा सपत्नीक सन्मान करीत असताना
सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने सेवानिवृत्त ए एस आई शेख यांचा सपत्नीक सन्मान करीत असताना


भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महमदअली याशिन भाई शेख यांचा भिगवण पोलीस ठाण्यातील आजचा शेवटचा दिवस .गेली ३८ वर्ष विना अपघात गाडी चालवीत आपल्या बरोबरच आपल्या सोबत असणाऱ्या वरिष्ठ अधिकारी यांच्या जीवाची काळजी घेत त्यांनी पोलीस गाडी चालवली.शेख मामू या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या पोलिसाचा आज सेंड ऑफ म्हणजे निरोप समारंभ ,त्यांचे सहकारी आणि भिगवण पोलिसांनी हा निरोप समारंभ मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा केला.

शेख दाम्पत्यावर पुष्पवृष्टी करताना त्यांचे सहकारी अधिकारी
शेख दाम्पत्यावर पुष्पवृष्टी करताना त्यांचे सहकारी अधिकारी

डोक्यावर ऐटबाज फेटा बांधून शेख या दाम्पत्यावर दोन्ही बाजूने पोलीस पुष्पाची बरसात करीत होते.तर ज्या सारथ्याने आपले सारथ्य केले या साठी स्वतः प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी गाडीचा दरवाजा उघडून बसण्याची विनंती केली.अगदी भावपूर्ण आणि डोळ्यात पाणी आणतील अशा पद्धतीने निरोप समारंभ करण्यात आला.

यावेळी पोलिसांत सुद्धा माणुसकी आणि जिव्हाळा किती भरलेला असतो याची जाणीव उपस्थित नागरिकांना झाली.यावेळी पोलीस हवालदार वीर नाना ,संजय काळभोर ,विलास मोरे ,रमेश भोसले,केशव चौधर ,रतीलाल चौधर ,केशव जगताप, महिला पोलीस शिपाई भारती खंडागळे यांनी आपल्या सहकारी सोबत्याला पुढील जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.