Wednesday, October 7, 2026
Home Blog Page 25

राशीन येथील डॉक्टरची पत्नी आणि दोन मुलासह आत्महत्या ;मुलाच्या व्यंगामुळे उचलले टोकाचे पाऊल

0

भिगवन वार्ताहर दि.२०

सामाजिक बांधिलकीची नाळ जोडलेल्या राशीन गावच्या प्रसिद्ध डॉक्टरने मुलाला ऐकू येत नसल्याच्या भावनेतून सहकुटुंब आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली. दोन मुले आणि पत्नीसह डॉक्टर ने केलेल्या आत्महत्येमुळे राशिन गावावर शोककळा पसरली असल्याचे दिसून आले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राशीन येथील डॉक्टर महेंद्र थोरात ,वर्षा थोरात ,कृष्णा थोरात आणि कैवल्य थोरात अशी आत्महत्या केलेल्या डॉक्टर कुटुंब यांची नावे आहेत गरिबांचा डॉक्टर म्हणून ओळख असणारे डॉ.महेंद्र थोरात हे मूळ दगडी बारडगाव तालुका कर्जत येथील शेतकरी कुटुंबातील असल्याची माहिती मिळत आहे त्यांचा राशीन येथे श्रीराम हॉस्पिटल नावाने वैद्यकीय व्यवसाय चालू होता. डॉक्टर थोरात यांना दोन मुले आहेत त्यातील कृष्णा नावाचा मुलगा लहानपणापासून कमी ऐकू येत असल्याचे आणि अनेक वेळा वैद्यकीय उपचार करूनही सुधारणा होत नसल्यामुळे डॉक्टर कुटुंबाची अपराधीपणाची भावना होत असल्याची सुसाईड नोट लिहून ठेवत त्यांनी आपला जीवन प्रवास संपवला. पत्नी आणि दोन मुले यांना सलाईनद्वारे इंजेक्शन देवून डॉकटर महेंद्र यांनी गळफास लावून जीव दिला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शनिवारी सकाळी रुग्ण तपासणीला आल्यावर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.

अत्यंत संवेनशील आणि सामाजिक उपक्रमात अग्रक्रमाने भाग नोंदविणाऱ्या डॉकटर ने असे टोकाचे पाऊल उचलल्याचे राशीन कर हळहळ व्यक्त करीत आहेत.तर पत्नीशी चर्चा आणि विचार विनिमय करूनच आपण हा निर्णय घेतल्याचे मिळालेल्या सुसाइड नोट मध्ये लिहण्यात आले आहे.

भिगवण ग्रामपंचायती वर भाजपाचा झेंडा ; दिवंगत नेते रमेश जाधव यांची स्वप्न पूर्ती

0

भिगवण वार्ताहर . दि. ०९

भिगवण ग्रामपंचायत सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्व राजकीय जाणकारांचे अंदाज चुकवत हर्षवर्धन पाटील समर्थक तानाजी अनिल वायसे व उपसरपंचपदी शितल बाबासाहेब शिंदे यांची सर्वांनुमते बिनविरोध निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एस.पी महानवर यांनी जाहीर केले.

भिगवण ग्रामपंचायतीची निवडणूक ही अत्यंत चुरशीने लढवली गेली. यामध्ये हर्षवर्धन पाटील समर्थक दिवंगत नेते रमेश जाधव प्रेरीत श्रीनाथ ग्रामविकास पॅनलने राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत श्री भैरवनाथ पॅनलला धूळ चारत सतरा पैकी सोळा जागांवर विजय मिळवत, भिगवण ग्रामपंचायतीवर एकहाती वर्चस्व स्थापन केले. (दि ०९) रोजी झालेल्या सरपंच-उपसरपंचपदाच्या निवडणुकीत सर्वसामान्य व शेतकरी कुटुंबातील तानाजी वायसे व शितल शिंदे यांच्या निवडीमुळे भिगवणकरांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी पॅनल प्रमुख पराग जाधव, उपसभापती संजय देहाडे, गटनेते संपत बंडगर, तुकाराम भरणे, अशोक शिंदे, , अशोक रायसोनी, अजित क्षीरसागर, अभिमन्यू खटके, गुलामभाई शेख, जावेद शेख, खंडेराव गाडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.पी महानवर, सहाय्यक निवडणूक अधिकारी डि.ए गाडेकर व ग्रामविस्तार अधिकारी डि.बी. परदेशी यांनी काम पाहिले.

हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व दिवंगत नेते रमेश जाधव यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, सर्व पॅनेल प्रमुख व सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन, भिगवण गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार आहे. पाणी, स्वच्छता व आरोग्य या गोष्टीना येणाऱ्या काळात प्राधान्य देण्यात येणार असून, भिगवणचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच तानाजी वायसे यांनी सांगितले.

पुणे सोलापूर महामार्गावर भीषण अपघात ;एकाच कुटुंबातील ३ जणांचा जागीच मृत्यू

0

भिगवण वार्ताहर. दि.८
पुणे सोलापूर महामार्गावरील डाळज गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात ३ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.अपघात इतका भयानक होता की यात वाहनाचा चक्काचूर झाला आहे.एकाच घरातील आई वडील आणि मुलगा यांनी या अपघातात जीव गमावला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गीता अरुण माने वय ३६ मुकंद अरुण माने वय २५ अरूण बाबुराव माने वय ४५ असे अपघातातील मृतांची नावे आहेत.तर साक्षी अरुण माने वय १८ ड्रायव्हर महादेव रकमाजी नेटके वय ५६ अशी जखमीची नावे आहेत.

मुलीच्या लग्नाच्य खरेदी जात असताना हा अपघात घडला.दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे मृत अरुण माने व्यावसायिक भागीदार असल्याची माहिती मिळाली आहे.अपघात इतका भीषण होता की मृतदेह काढण्यासाठी क्रेन चां वापर करण्यात आला.

ऊस वाहतूक करणाऱ्या गाडीला अपघात ग्रस्त गाडी ने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला.वेगात असणाऱ्या या गाडीच्या ड्रायव्हर ला ऊस वाहतूक करणारे वाहन न दिसल्यामुळे अपघात झाला.तर या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाला कोणताही रीपलेत्रर नसल्यामुळे अपघात घडल्याचे स्थानिक सांगत आहेत.

पुणे सोलापूर महामार्गावरून होणारी ऊस वाहतूक हा गंभीर प्रश्न असून याकडे पोलीस प्रशासन हायवे प्रशासन आणि आर टी ओ विभाग गांभीर्याने पाहताना दिसून येत नाही.त्यामुळे निष्पाप नागरिकांना अपघातात आपले जीव गमवावे लागत आहेत.या ऊस वाहतूक ड्रायव्हरने केलेल्या चुकीमुळे अनेक संसार उघडे पडत आहेत. कर्णकर्कश आवाजात चालणारे टेप , दोन ऊस वाहतूक करणाऱ्या वाहणामधील लागलेली शर्यत ,तसेच रेल्वे सारख्या जोडलेल्या मोकळ्या ट्रेलर , विना रीपलेकटर केली जात असणारी ऊस तसेच मळी आणि भुसा वाहतूक आर टी ओ विभाग आणि पोलीस प्रशासनाला दिसूनही कोणतीही कारवाई केली जात नाही.

त्यामुळेच असे भीषण अपघात घडतात आणि एकाच घरातील तीन जणांचा जागीच मृत्यू होतो.सदर अपघाताची खबर भीगवन पोलीस ठाण्यात देण्यात आली असून याचा तपास प्रभारी पोलीस अधिकारी जीवन माने यांच्या मार्गदर्शन खाली पो.स. ई रुपणवर करीत आहेत.

ग्रामपंचायत सदस्यांना अतिक्रमण करणे पडणार महागात ; ग्रामविकास विभागाचा आदेश

0

भिगवपण प्रतिनिधि .. दि..७

ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच व त्यांचे कुटूंबातील इतर सदस्य यांचं एक इंचसुद्धा अतिक्रमण असल्यास त्यांचेवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच पद रिक्त करण्याच्या सूचना ग्रामविकास विभाग यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.

सध्या राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यात बऱ्याच जिह्यात ग्रामपंचायत अस्तित्वात आल्या आहेत त्यामध्ये निवडून आलेले सदस्य हे जबाबदार नागरिक असून त्यांचा जनतेने आदर्श घ्यावा ह्या हेतूने त्यांचे वर्तन व राहणीमान याच समाजमनावर प्रतिबिंब पडते हाच उद्देश समोर ठेऊन न्यायालयाने तात्काळ असा आदेश काढला की यापुढे कोणत्याही ग्रामपंचायत सदस्य व त्याचे कुटुंबातील भाऊ,वडील यांचे इंचभर सुद्धा अतिक्रमण असल्यास त्यांना तात्काळ पदावरून काढून टाकून त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.

सदरच्या निर्णयामुळे जनतेत जरी आनंद असला तरी बऱ्याच ग्रामपंचायत सदस्य यांना डोकेदुखी ठरणार आहे,कारण बरेच सदस्य यांचे घर,खोल्या, घरासमोर असणारे ओटे, गावात इतरत्र असणारे अतिक्रमण तात्काळ काढावे लागणार आहे.काही सदस्यांची घरे मुख्य रस्त्यावर असून त्यांनी गाव नकाशात असणाऱ्या रस्त्यावर बांधकाम केल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे,अश्या सदस्यांनी मुख्य रस्ता सोडून असलेले अतिक्रमण ,घरे,खोल्या, ओटे तात्काळ स्वखर्चाने पाडले नाहीत तर शासन त्यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करून पदावरून खारीज करणार आहे.

सदस्यांनी उमेदवारी दाखल करतांना दिलेले संपत्ती चे विवरण,शौचालय, अतिक्रमण नसल्याचे हमीपत्र या सर्वांच्या प्रति जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात पाठवण्यात आल्या असून त्यावरही संबंधित विभागाचे अधिकारी लक्ष ठेऊन असल्याचे समजते.

कमळ फुलणार की घड्याळाची टिक.टिक ..सुरू होणार ; सर्वपक्षीय पॅनल मध्ये धुसपुस

0

भिगवण वार्ताहर . दि. ७

गावचा विकास करण्याच्या आणाभाका घेत सर्वपक्षीय युती करीत निवडून आलेल्या ७ सदस्या पैकी ४ सदस्यांनी १ सदस्यांच्या नातेवाईकसह सरपंच पदासाठी खेळी करीत गावातून देवदर्शनाचया नावाखाली सहलीला गेल्याची चर्चा तक्रारवाडी गावात सुरू झाली आहे.
इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गाव हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराचे मानले जाते.मात्र मागील काही वर्षांपासून या गावात राष्ट्रवादी पक्षाने आपले कट्टर कार्यकर्ते यांना ताकद देत गावातील मतदानात आमूलाग्र बदल घडवून आणला असल्याचे दिसून आले आहे.राज्यमंत्री दतात्रय भरणे ,जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने ,हनुमंत बंडगर यांच्या माध्यमातून काही विकास कामे केल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या मतदानात वाढ झाल्याचे दिसून आले.तरीही तक्रारवाडी हे गाव माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विचाराचे मानले जात असल्याने दोन्ही पार्टीच्या सदस्यांनी आपले पक्ष बाजूला ठेवून एकत्र येत निवडणुक लढवीत ९ पैकी ७ जागांवर आपले बहुमत सिद्ध केले.मात्र सरपंच पदाची अपेक्षा आणि आपल्या नेत्याला दिलेला शब्द मोडला जावू नये यासाठी काही सदस्यांनी तडजोडीची बैठक घेण्याची तयारी करीत सदस्य फोडण्याची खेळी केली गेली.तर मतदारांनी विश्वासाने दिलेल्या मत दानाशी प्रतारणा करीत ४ सदस्यांना आणि १ नातेवाईकाला सोबत घेत देव दर्शनाच्या नावाखाली सहलीला गेेले
तक्रारवाडी गावातील इतिहासात ७ सदस्य निवडून येत ४ सदस्य बाहेर गावी गेल्याची घटना पहिल्यांदाच घडली असल्याचे ज्येष्ठ मंडळी बोलत आहेत.
४ सदस्यांनी देव दर्शनाला जाणे हे राष्ट्रवादी पक्षाला सरपंच पद मिळवून देण्यात महत्वाचे असले तरी मतदारांशी ही प्रतारणा ठरू नये .आणि गावातील एकीची बेकी ठरू नये अशीच अपेक्षा केली जात आहे.
आता राज्यमंत्री दतामामा भरणे तक्रारवाडी गावावर राष्ट्रवादी चां सरपंच बसविणार की माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे गावावर आपली कमांड ठेवण्यासाठी काही हातखंडा अवलंबतात हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरेल.
असे असले तरी निवडून येताना विकासासाठी घेतलेल्या आणाभाका आणि ५ वर्ष साथ न सोडण्याचा शब्दाला सरपंच पदासाठी ८ दिवसात तिलांजली दिली जात असेल तर असे राजकारण समाजासाठी नक्कीच घातक ठरू शकते हे मात्र निश्चित..
मात्र सरपंच पदासाठी काय पण ही म्हण गावात चर्चिली जात आहे हे ही कमी नसे …….

सरपंच नक्की कोणाचा राष्ट्रवादीचा की भाजपचा ? तक्रारवाडी जनतेच्या मनातील प्रश्न !

0

भिगवन वार्ताहर…५
तक्रारवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय एकी करत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये सरपंच पदांमुळे बेकि निर्माण झाले चित्र दिसून येत आहे. निवडून येत असताना बाजूला ठेवलेले पक्षाचे जोडे आता निवडीसाठी हातात घेण्यात येतात काय असा सवाल मतदारांना पडला आहे .
नुकत्याच पार पडलेल्या तक्रारवाडी गावच्या निवडणुकीत १५ वर्षापासून सत्तेत असलेल्या पार्टीला हरविण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येत मोठ बांधली होती.यात सताधरी पार्टीकडून पद उपभोगणाऱ्या काही सदस्यांचा सुधा यात सहभाग होता.विकास कामे करताना जाणीव पूर्वक आपणाला बाजूला ठेवले जात असल्याचा आरोप करीत विरोधकांना एकत्र करीत सत्ताधारी मंडळीच्या विरोधात ही निवडणुक लढवली गेली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या भाजपचे तसेच विद्यमान राज्यमंत्री दतात्रय भरणे यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे काही कार्यकर्ते गावचा विकास करण्याचा मानस ठेवत एकत्र येत जीवा भावाने ही निवडणूक लढले होते आणि अशक्य प्राय विजय प्राप्त केला.निवडणुकीच्या अगोदर झालेल्या आरक्षणात इतर मागास वर्गीय आरक्षण मिळाले असल्यामुळे सरपंच पदाचे चेहरे समोर करून ही निवडणुक लढली गेली.मात्र शासनाच्या दुसऱ्या आदेशाने हे आरक्षण रद्द करीत नव्याने आरक्षण काढण्यात आले आणि याचमुळे गावच्या विकासासाठी एकत्र आलेल्या सदस्यांमध्ये एकी ची बेकी झाल्याचे पहावयास मिळाले.चार दिवसा पूर्वी एकत्र राहण्याच्या आणा भाका घेणारे सदस्य आपणाला पहिले वर्ष सरपंच पद मिळाले पाहिजे यासाठी आग्रही राहिले.तर या वेळी चर्चेसाठी बोलावलेल्या बैठकीत हमरी तुमरी होण्याची वेळ आली.यावेळी आपल्याच सदस्याला सरपंच पद मिळाले पाहिजे यासाठी प्रत्येक जण आग्रह करीत होता.यावेळी काही तर या निवडणुकीत कोणतीही भूमिका स्पष्ट न मांडणाऱ्या काही कार्यकर्त्यांनी यावेळी मात्र चर्चा कशी मोडली जाईल याची काळजी घेतली.त्यामुळे एका दिलाने निवडून आलेल्या सर्वपक्षीय सदस्यांनी आपले पक्ष उघड दाखविण्यास सुरवात केली.त्यामुळे आता सरपंच कोणाचा होणार राष्ट्रवादी चां की भाजपचा एवढेच पाहणे बाकी उरले आहे.गावच्या विकासासाठी मतदारांनी आपणाला मत दिले आहे हे सर्व सदस्य विसरून पदासाठी एकमेकाच्या विरोधात कट रचण्यासाठी इतर सदस्यांना आमिष दाखविण्यासाठी रात्र घालवू लागल्याचे दिसून येत आहे.तर विरोधक मात्र एका जागेवर बसून चाललेला बिन पैशाचा निवड तमाशा पाहत आहेत .
गावचे सरपंच पद निवडून आलेल्या चारही सदस्यांना मिळत असताना आपणाला पहिले पद मिळाले पाहिजे यातून होणाऱ्या कुरघोडी टाळण्यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसून आले नाही.तर सर्वपक्षीय गटात राहून गट फोडण्याचा मानस असणारे आनंदी होत असल्याचे दिसून आले.आता ९ तारखेला किती अर्ज दाखल होतात,विरोधक कोणती भूमिका घेतात याकडे सर्वसामान्य मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे.

पोंधवडी येथे दोन प्रकरणात ८ आरोपी विरोधात ऐट्रासिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल ; ग्रामपंचायत निवडणुकीचे उमटू लागले पडसाद

0

भिगवण वार्ताहर.दि.१

पोंधवडी बंडगरवाडी येथील निवडणूक पार पडताच भिगवण पोलीस ठाण्यात लागोपाठ दोन दिवसात दोन अॅट्रासिटी आणि अपहरणासह लोकप्रतिनिधी अधिनियम कलमानुसार गुन्हा नोंद झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.दोन वेगवेगळ्या दाखल झालेल्या या गुन्ह्यात एकात ५ आरोपी असून दुसऱ्या गुन्ह्यात ३ आरोपी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर दोन्ही गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

याबाबतची सविस्तर माहिती अशी कि फिर्यादी विनोद बाजीराव भोसले यास तु माझे पॅनलला मतदान करायचे ,तु जर मतदान केले नाही तर तुला माझ्या गावात राहू देणार नाही.तसेच तुझे अपहरण करून तुला जीवे मारून उजनी मध्ये टाकून देईन .अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ करीत सोबत आणलेल्या चारचाकी वाहनात बळजबरीने बसवीत वरवड येथे नेवून पुन्हा मदनवाडी येथील गुरांच्या गोठ्यात बांधून ठेवल्यामुळे आरोपी विराज वसंत बंडगर वय २८ रा.मदनवाडी ,गणेश दतात्रय पवार वय ३५ रा.पवारवस्ती पोन्धवडी ,नारायण महादेव बंडगर वय.३५ ,अभिषेक ज्ञानदेव बंडगर वय.२७ प्रदीप मधुकर बंडगर वय ३२ रा.बंडगरवाडी पोंधवडी यांच्या विरोधात अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या प्रकरणात फिर्यादी सुनील आप्पा पवार पोंधवडी यांनी माजी सरपंच नाना अर्जुन बंडगर ,नवनाथ बंडगर ,प्रेमकुमार बंडगर यांच्या विरोधात पोंधवडी येथील जमीन गट १०६ मध्ये शेतीची मशागत करीत असताना आरोपी यांनी आपली इन्होव्हा गाडी नंबर एम.एच.४२ ए एकस १००० मधून येत फिर्यादी याला या अगोदर हि शेतजमीन आम्ही विकत घेतली आहे.या जमिनी मध्ये पाय ठेवायचा नाही असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करीत आपल्या सोबत आणलेली तलवार फिर्यादीच्या मानेवर ठेवीत लाथाबुक्यांनी मारहाण केली.तसेच आरोपी यांनी फिर्यादीच्या बोटात असलेली अंगठी बळजबरीने काढून घेतल्याची तक्रार देण्यात आली आहे.याप्रकरणी भिगवण पोलिसांनी अॅट्रासिटी तसेच आर्म एकट नुसार गुन्हा नोंद केला आहे.सदर दोन्ही गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर तपास करीत आहे .

सदर प्रकरणी एकमेव नाना अर्जुन बंडगर यांना अटक झाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली असून अटक केलेल्या बंडगर यांना न्यायालयाने ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

स्मशानभूमीच्या स्वच्छतेपासून गाव कारभाराला सुरुवात; नवनिर्वाचित सदस्यांचा आदर्श उपक्रम

0

भिगवण वार्ताहर.दि.२५

इंदापूर तालुक्या मध्ये लक्षवेधी ठरलेल्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांनी स्मशानभूमीच्या स्वच्छते पासून कामकाजाला सुरवात करत अनेक गावांसाठी आदर्श निर्माण करण्याचे काम केले.यावेळी सर्व निर्वाचित सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवीत भिगवण गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.

इंदापूर तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत वर राष्ट्रवादीची सत्ता ५ वर्षापासून होती.तत्कालीन निवडून आलेल्या पदाधिकारी यांनी निवडून येताच हातात झाडू घेत भिगवण गाव कचर्यापासून मुक्त करण्यासाठी चंग बांधला होता.मात्र काही काळात पदाच्या अपेक्षेमुळे ऐकित बेकी होत चांगल्या आणि महत्वाकांक्षा असणाऱ्या कामांना ब्रेक लागला .राष्ट्रवादी पक्षाला खो देत विरोधकांनी एकत्र येत भिगवणची सत्ता पुन्हा मिळविण्यात यश मिळविले.दिवंगत नेते रमेश जाधव यांच्या प्रेरणेतून उभ्या केलेल्या पार्टीला नागरिकांनी १ नंबरची पसंती देत १७ पैकी १६ जागेवर उमेदवारांना निवडून दिले.याच नागरिकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि भिगवण गाव स्वच्छ आणि सुंदर बनविण्यासाठी निवडून आलेल्या सदस्यांनी एकत्र येत स्मशानभूमीत स्वच्छता करीत आपल्या कामकाजाला सुरवात करीत दिवंगत नेत्याला श्रद्धांजली अर्पित केली.यावेळी पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे ,पार्टी प्रमुख अशोक शिंदे , पराग जाधव ,तुषार क्षीरसागर ,सत्यवान भोसले,जयदीप जाधव ,दत्ता धवडे ,हरिश्चंद्र पांढरे ,तानाजी वायसे ,गुरापा पवार उपस्थित होते.

यावेळी अशोक शिंदे तसेच पराग जाधव यांनी संपूर्ण स्मशानभूमीचा कायापालट करण्यात येणार असल्याचे सांगितले.शासकीय निधी आणि लोकवर्गणीतून वॉलकंपाउंड ,पेव्हर ब्लॉक ,पाण्याची व्यवस्था आणि झाडांची लागवड केली जाणार असल्याचे सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने गर्भवती महिलांसाठी डोहाळे जेवण ;कुपोषित बालकांना बोर नहान

0

भिगवण वार्ताहर.दि.२२

भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उप केंद्र तक्रारवाडी येथे गर्भवती महिलांसाठी डोहाळेजेवण तसेच कुपोषित बालकांसाठी बोरनहाने सारखा आगळावेगळा कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी तक्रारवाडी ,भिगवण आणि पोंधवडी गावच्या महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला.प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्र तक्रारवाडी येथील आरोग्य कार्यालयाच्या पटांगणात हा कार्यक्रम घेण्यात आला.सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांच्या कल्पकतेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात आलेल्या सर्व महिलांचे हिमोग्लोबिन तसेच इतर आरोग्याच्या तपासण्या करण्यात आल्या..यावेळी आर्थिक बाबतीत गरीब असलेल्या एका गर्भवती महिलेला डोहाळेजेवण देण्यात आले.तसेच उपस्थित बालकांचे बोरनहान करण्यात आले.तर उपस्थित गर्भवती मातांना बालकांना पोषक आहार ,फळे आणि मल्टी विटामिन गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी रोटरी क्लब भिगवणच्या अध्यक्षा मीनाताई बंडगर ,मदनवाडी गावच्या सरपंच आम्रपाली बंडगर ,तक्रारवाडी गावच्या नवनिर्वाचित सदस्या मनीषा वाघ ,प्राजक्ता वाघ ,गौरी पिसाळ ,स्मिता वाघ ,सुरेखा पिसाळदेशमुख तसेच अनेक किशोरवयीन मुली कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.यावेळी उपकेद्राच्या वतीने उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून स्वागत करण्यात आले.१५० च्या वर महिलांनी या कार्यक्रमात भाग घेतला.यावेळी किशोरवयीन मुलीना सेनेटरी नेफकीन तसेच मल्टीविटामिन गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

अल्पवयीन मुलीला त्रास देणाऱ्या विरोधात पास्को तसेच विनयभंग गुन्हा दाखल ;

0

भिगवण वार्ताहर.दि.२१

अल्पवयीन मुलीला पल्सर मोटार सायकल ने अडवीत आपल्या मित्रांना हे माझ सामान आहे.तिच्याकडे कोणी पाहू नका आणि तु माझ्या गाडीवर बस तुला घेवून जातो असे म्हणून मुलीच्या मनात लज्जा उत्पन होईल असे वर्तन केल्यामुळे दोन आरोपी विरोधात भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.या प्रकरणी उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

याबाबत भिगवण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी याबाबत तक्रार दिली आहे.संचित उर्फ बंटी संजय सलगर ,शुभम संजय देवकाते दोन्ही रा.मदनवाडी ता.इंदापूर यांनी फिर्यादी यांच्या मुलीला पल्सर गाडीवरअडवून तिच्याकडे पाहत आपल्या मित्रांना हे माझ सामान आहे.हिच्याकडे कोणी पाहू नका.तसेच तिच्या नावाचा उल्लेख करीत चल बस मी तुला गाडीवर घेवून जातो असे मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले.तसेच मुलीने याला प्रतिसाद दिला नाही म्हणून पल्सर गाडी घेवून मुलीच्या घरासमोर जावून होर्न वाजविला.वेळोवेळी होत असलेल्या या त्रासामुळे मुलीच्या वडिलांनी भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.याप्रकरणी संध्याकाळी उशिरा पर्यंत कोणालाही अटक केली नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक दडसपाटील करीत आहेत.

भिगवण शहर हे महिला मुलीच्या बाबतीत नेहमीच संवेदनशील म्हणून ओळखले गेले आहे. पोलीस अधिकारी यांच्या सिंघम कारवाया मुळे अनेक रोड रोमिओ ची धुलाई केल्या नंतर काही दिवस असे प्रकार थांबतात आणि विसर पडताच पहिले पाढे पंचावन अशी अवस्था निर्माण होते.नेहमीच्या त्रासाला कंटाळून अनेक मुलींचे शिक्षण थांबल्याचे प्रकार हि उघडकीस आलेले आहेत.त्यामुळे भिगवण पोलिसांनी अशा प्रकरणी तिसरा डोळा उघडण्याची आणि नागरिकांनी यात कोणतीही राजकीय तडजोड न करण्याची गरज निर्माण झाली आहे.नाहीतर मुली वाचवा मुली शिकवा हि बाब फक्त म्हणी पुरतीच वापरली जाईल याचा विचार होणे गरजेचे आहे .