Tuesday, October 6, 2026
Home Blog Page 2

​भिगवणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या अवमानावरून तीव्र संताप; अमर बौद्ध संघटनेचे आमरण उपोषण, भिगवण बंदला शंभर टक्के प्रतिसाद

0

​भिगवण वार्ताहर | दि. 3

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे तसेच दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल विभागाने आयोजित केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व कार्यक्रमात’ संविधानाचे जनक व कायदेपंडित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार व निष्काळजी भूमिकेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेत तीव्र संतापाची लाट पसरली असून, या निषेधार्थ अमर बौद्ध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला भिगवण, तक्रारवाडी आणि मदनवाडी येथील व्यापाऱ्यांनी १०० टक्के पाठिंबा देत आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले.

​तालुक्याचे तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने या शासकीय शिबिराचे आयोजन केले होते. कोणत्याही शासकीय कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करणे बंधनकारक असल्याचा स्पष्ट शासन आदेश असतानाही, महसूल विभागाने प्रतिमा न ठेवून डॉ. बाबासाहेबांचा एकप्रकारे अवमानच केला आहे, असा आरोप उपोषणकर्ते शरद चितारे व अनिकेत भिसे यांनी केला. तसेच या हलगर्जीपणाबद्दल जबाबदार आयोजकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

​आंदोलक अमोल कांबळे व रोहित शेलार यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “तहसीलदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा प्रामुख्याने लावणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने यात अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला असून यामुळे संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.”

​दरम्यान, प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध नोंदवण्यासाठी अमर बौद्ध संघटनेच्याअमोल कांबळे,रोहित शेलार,अनिकेत भिसे, किरण कांबळे, संदीप वाघमारे,प्रेम लोंढे,रोहन निकाळजे,अभी लोंढे या आठ भीमसैनिक पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टीचे विक्रमभाऊ शेलार, हिंदू खाटीक समाज अध्यक्ष सचिन खडके, देवानंद शेलार, संजय देहाडे, सचिन आढाव,बाळासाहेब शेलार व सनी शेलार,गणेश शेलार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी उपसभापती पराग जाधव, सचिन बोगावत,अजिंक्य माडगे, प्रदीप वाकसे,तुषार क्षीरसागर, महेश शेंडगे, दत्तात्रय पाचांगणे, गणेश वायदंडे यांनी उपस्थिती लावली.यावेळी बहुसंख्येने तालुक्यातील उपस्थित आंबेडकरवादी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला.

​मच्छी मार्केटसह दैनंदिन व्यवहार ठप्प; लाखोंची उलाढाल थांबली

​आंदोलनाला पाठिंबा म्हणून भिगवण, तक्रारवाडी आणि मदनवाडी परिसरातील सर्व दुकानदारांनी व व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय कडकडीत बंद ठेवले. दररोज लाखोंची उलाढाल होणाऱ्या प्रसिद्ध भिगवण मच्छी मार्केटमध्ये आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. सर्वपक्षीय व सर्वसमाजाच्या पाठिंब्यामुळे भिगवण परिसरातील बंद यशस्वी झाला.

यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी आंदोलकांची भेट घेत भूमिका समजून घेतली. तर दिवसभर पोलिसांनी आंदोलन स्थळी चोख बंदोबस्त लावल्याचे पाहवयास मिळाले.

​लज्जास्पद! स्वतःच्याच अल्पवयीन नातीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आजोबाविरुद्ध ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल

0

भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील गावात घडला मनाला सुन्न करणारा प्रकार ! भिगवण पोलिसांनी घटनेतील गांभीर्य ओळखुन तातडीने आवळल्या नराधमाच्या मुसक्या

भिगवण वार्ताहर. दि. 31
भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात गतिमंद असलेल्या अल्पवयीन निर्भयावर नात्यातील आजोबाने अत्याचार केल्याची घटना घडली.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात निर्भयाच्या आईने तक्रार देत गुन्हा दाखल केला आहे. भिगवण पोलिसांनी तातडीने कारवाई करीत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार सदर प्रकार भिगवण पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून यातील आरोपी हा निर्भयाचा आजोबा असून सुद्धा नात्याला काळिमा फासल्यांचा प्रकार घडला आहे.याबाबत प्रेस नोट मध्ये नमूद केल्या नुसार आरोपी ने आपली नातं अल्पवयीन असून ती गतिमंद आहे याची माहिती असताना सुद्धा राहत्या घरात निर्भया कडून हात पाय दाबून घेत तिच्या मनाविरुद्ध तिची छाती दाबून जबरदस्तीने अत्याचार केला. याची माहिती निर्भयाच्या आईला मिळाल्याने तिने तातडीने भिगवण पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली.

भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेत तातडीने 67 वर्षीय आरोपीला अटक करीत तपास सुरु केला आहे..

मदनवाडी गावच्या हद्दीत पिकअप वाहनाने ठोकरल्याने जेष्ठ नागरिकांचा मृत्यू

0

भिगवण वार्ताहर. दि. 31
भिगवण बारामती राज्यमार्गांवर मदनवाडी गावच्या हद्दीत मालवाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाने ठोकरल्याने मदनवाडी गावातील जेष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यावर पिकअप ड्रायव्हर याने वाहणासह पळ काढला मात्र पोलिसांच्या तातडीच्या तपासामुळे वाहन आणि ड्रायवर याचा शोध घेण्यात आला.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित प्रभारी पोलीस अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी दिलेल्या माहिती नुसार गुरुवारी 30 तारखेच्या सकाळी हा अपघात घडला. या अपघातात गणपत नारायण नरुटे वय. 81 रा. मदनवाडी यांचा जागीच मृत्यू झाला.
भिगवण बारामती रोडवर ढवळे वस्ती जवळ हा अपघात घडला. यावेळी अपघात करून वाहन चालकाने पळ काढला होता. प्रत्यक्ष दर्शी आणि पोलिसांच्या तातडीने केलेल्या तपासात हे वाहन पिकअप एम. एच. 12 जी . टी.3116 यावरील चालक अशोक बाळू राऊत वय. 35 भांडेवाडी कर्जत याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहतूक नियमाचे पालन न करता हालगर्जी पणाने वाहन चालवून निष्पाप नागरिकाचा जीव घेतल्याचा तसेच अपघाताची माहिती अथवा मदत न करता पळ काढल्याचा गुन्हा वाहन चालकावर लावला आहे. याची खबर मृत नरुटे यांचे पुतणे मगन विठ्ठल नरुटे यांनी दिली आहे.
सदर अपघाताचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश उगले करीत आहेत.

पुणे सोलापूर महामार्गांवर अज्ञात वाहनाने दुचाकी स्वारास चिरडले ; भादलवाडी हद्दीतील अपघात

0

पुणे सोलापूर महामार्ग ठरतोय जीवघेणा ; अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करताना महामार्ग प्रशासन ठरतोय अपयशी

भिगवण वार्ताहर. दि. 12
पुणे सोलापूर महामार्ग जीवघेणा ठरत असताना स्थानिक नागरिकांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी निर्माण करण्यात आलेला सेवा मार्गही अपघाती ठरत असल्याचे दिसून येत आहे. कारण याच भिगवण ते भादलवाडी सर्व्हिस रोडवर अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिगवण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास मौजे भादलवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) हद्दीत बिल्ट कंपनीच्या बी कॉलनी गेटजवळ, आयडीबीआय एटीएमसमोर भिगवण–भादलवाडी सर्व्हिस रोडवर हा अपघात घडला.

या अपघातात अजित दगडु वाळके (वय ५४, रा. माऊली अपार्टमेंट, फ्लॅट क्र. ९, भिगवण) यांचा मृत्यू झाला. ते आपल्या होंडा स्प्लेंडर (MH-४५-L-५९८०) या दुचाकीवरून भिगवणकडे जात असताना भादलवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.

या धडकेत अजित वाळके यांना गंभीर दुखापत झाली. अपघातात त्यांचे पोट फाटून गंभीर जखम झाली तसेच हात-पायांना दुखापत झाली. या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळी न थांबता वाहनासह फरार झाला.

या प्रकरणी अनिकेत अजित वाळके (वय २३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिगवण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ५६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(A), १२५(B), २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४/१७७ अंतर्गत अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या गुन्ह्याची नोंद दि. १२ मार्च २०२६ रोजी पहाटे १.०४ वाजता करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय अमित पाटील हे करीत असल्याची माहिती देण्यात आली.

पुणे सोलापूर महामार्गांवर उभ्या गाडीला धडकून झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू. तीन जण गंभीर जखमी

0

भिगवण वार्ताहर. दि. 26

पुणे सोलापूर महामार्गांवर डाळज गावाच्या हद्दीत पुणे कडे जाणाऱ्या लेन वर पंक्चर झालेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून इको गाडीने दिलेल्या धडकी मुळे झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एका दोन वर्ष्याच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला तर 10 महिन्याची चिमुकली जखमी झाली इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना 5 वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातात आदिती अमर हातेकर वय 25 वर्षे राहणार सांगोला, सोलापूर, सखुबाई ईश्वर गेजगे, वय 60 वर्ष, राहणार सांगोला, सोलापूर,जय अमर हातेकर वय दोन वर्ष. राहणार सांगोला सोलापूर.(मयत) असे एकूण तीन जण मयत झालेले आहेत.तर इको गाडी वरील चालक कबीरदास ईश्वर गेजगे वय 50 वर्षे राहणार पाटस हे गंभीर जखमी झालेले आहेत.स्वाती कबीरदास गेजगे वय 34 वर्ष राहणार पाटस व समृद्धी कबीरदास गेजगे वय दहा महिने राहणार पाटस हे किरकोळ जखमी झाले आहेत.
सदर अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.
सदर अपघात धोकेदायक पद्धतीने उभा असलेल्या आयषर गाडी नंबर MH13 CU 5163 मुळे घडला असल्याची माहिती मिळत आहे. सदर आयषर पंचर झाल्यामुळे धोकेदायक पद्धतीने उभा होता त्याला पाठीमागून येणारी मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी नंबर MH12 XE 8816 या गाडीची जोरदार धडक बसली यामुळे हा भयंकर अपघात घडला. या अपघातात इको गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
महाराष्ट्र राज्यात रस्ते अपघातात होत असलेल्या मृत्यूवर अधिवेशनात चर्चा सुरु असतानाच हा गंभीर अपघात घडल्यामुळे नागरिकांच्या जीवाचे महामार्ग प्रशासनाला गांभीर्य आहे काय ? असा सवाल उपस्थित होतो.
या अपघातात एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला तर त्याच्या साठी घेतलेली खेळण्यातली सायकल अपघाती आयषर समोर पडल्याचे हृदय पिळवटून टाकणारे चित्र पाहवयास मिळाले.
पुणे सोलापूर महामार्गांवर धोकेदायक पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनाने अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात असून याकडे हायवे प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसून येत नाही. मुख्य महामार्गांवर अवैध पार्किंग, सेवा रस्त्यावरील व्यावसायिक अतिक्रमन प्रवासी नागरिकांना धोक्याचे ठरत असून प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे असे गंभीर अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे.

भिशी व्यापारी वर्गासाठी संजीवनी कि मारक ; व्यापारी चर्चेतील काही मुद्दे.

0

भिशीचे समर्थन नक्कीच नाही मात्र वाईट प्रवृती ठेचण्याची गरज…

भिगवण वार्ताहर. दि. 30
भिगवण बाजारपेठेत चालू असणाऱ्या भिशी (सार्वजनिक फंड ) बाबत काही समाज माध्यमातून होत असलेल्या बदनामी बाबत व्यापारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत असून भिशी हा सर्वसामान्य व्यापारी वर्गाचा श्वास असून भिशी बंद पडल्यास व्यापारी पुन्हा सावकारी पाश आणि पतसंस्था च्या जाळ्यात अडकला जाणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर काही लुटारू चालकांमुळे आणि धन दांडग्या बुडव्या सदस्यामुळे सर्वासामान्य व्यापारी वर्गासाठी असणारी संजीवनी बंद होने अन्याय कारक ठरणार आहे.


भिगवण शहरातील दोन निष्पाप नागरिकांनी कर्जाचा बोजा आणि भिशी सदस्यांनी पैसे बुडाविल्याने आपल्या जीवाची आहुती दिली. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबाची आणि समाजाची कधीही न भरून येणारी हानी झाली. या आहुती पाठीमागे भिशी आणि सावकारी करणारी काही प्रवृत्ती असल्याचा कुटुंब आणि नातेवाईकांचा आरोप आहे आणि तो खराही आहे. मात्र भिगवण बाजारपेठेत चालणाऱ्या सर्वच भिशी या सावकारी पद्धतीच्या आहेत आणि यातून प्रत्येक व्यापारी कचाट्यात अडकला असल्याची बतावणी काही अंशी चुकीची ठरत आहे. कारण भिशी हि मुळातच काही विश्वासातील व्यापारी एकत्र येत आपल्या जवळील शिलकीतून भिशी चालवीत असतात. निव्वळ नफा कमाविणे अथवा व्यवसाय वाढी अतिशय मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होने हा उद्देश यातून साधला जात नाही. तर सम विचारी व्यवसायिकाला मदत आणि त्यातून अल्पशे अर्थाजन असा भिशीचा मूळ उद्देश असतो.लाख भर रुपयाच्या कर्जासाठी सर्वसामान्य व्यापाऱ्याला बँकाचे उंबरे झिझवावे लागतात तर इतकंच नाही तर आपली संपत्ती तारण ठेवावी लागते. तारण ठेवुनही लाख रुपयातील 80 हजार रुपयेच ताब्यात मिळतात आणि लाखाचे व्याज चालू होते. काही बँका पतसंस्था याला अपवाद हि ठरत असतील मात्र सर्वसामान्य व्यापारी यांची जा चकरातून सुटका होण्यासाठी सर्वांनी एकत्र येत केलेला करार असतो. याला संपत्ती तारण लागत नाही. कोणाचा जामीनदार लागत नाही अथवा वेगळी टक्केवारी लागत नाही. एकमेकांना विश्वासात घेऊन चालविलेला अर्थ बाजार म्हणजेच हि भिशी.


मात्र याला काही संधीसाधू भिशी चालक यांनी मोठ्या नफ्याचे आणि कोटीच्या कोटी आकड्याचे स्वरूप देत घातकी भिशी सुरु केल्या. तर काही धनं दांडग्या बुडव्या व्यवसायिकानी आपली संपत्ती वाढविन्याचे साधन समजून भिशी चालकांना जीव देण्यास प्रवृत्त केले. आणि काहींनी भिशी हाच व्यवसाय समजून महिना, पंधरवडा, आठवडी इतकंच काय रोजच्या भिशी सुरु करून कमाई करण्यास सुरवात केली. यामुळे सर्व व्यापारी पेठेला संजीवनी ठरणारी भिशी बदनामीची शिकार होऊ लागली. अप प्रवृती कोणात्याही क्षेत्रात आल्यास त्या नुकसान कारक ठरतात त्याच प्रमाणे भिशीत घुसलेल्या या अजगारांचा आकार दिवसेंदिवस वाढत गेला आणि भिगवणची बाजारपेठ बदनामीची शिकार ठरली.
या बदनामी मागे ठरत मैलाचे दगड खालील प्रमाणे..
1) ज्यांची ऐपत नाही त्यांनी घेतलेल्या कोटीच्या कोटीची उड्डाने.
2) कोणताही वजा बेरीज न करता भिशी उचलून आपल्या संपत्तीत वाढ करून चालकाला दोरी घेण्याची वेळ आणणारी धनं दांडगी कुटुंब.
3) विश्वास संपादन करून आपली स्थिती मजबूत असल्याचा गवगवा करणारी मंडळी.
4) कोटीच्या उड्डानातं चालकांनी आपलेच परिवारातील नंबर घेत फसवणूक करणारे लबाड चालक.
वाचकांना सूचित करण्यात येते कि या माहितीतून भिशीचे कोणत्याही प्रकारचे समर्थन अथवा त्या कायदेशीर मार्गाने चालत असतात असं सांगण्याचा कोणातही उद्देश नसून सर्वसामान्य व्यापारी वर्गातील चर्चा दरम्यान समोर आलेले वास्तव मांडण्यात आले आहे. काही सूचना अथवा माहिती आल्यास त्यांचे स्वागत आहे.

भिगवण बारामती रोडवर उस वाहतूकीचा 6 वा बळी ; उपाय योजना करूनही जाताहेत जीव.

0

भिगवण पोलीस आणि महामार्ग पोलीस करत आहेत अपघात कमी होण्यासाठी रोज प्रयत्न आणि जनजागृती; परिवहन विभाग आणि कारखाना प्रशासन हि ऍक्शन मोड वर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना सुरु.

भिगवण वार्ताहर. दि. 13

भिगवण बारामती मार्गांवर निरगुडे पाटीजवळ उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटर ट्रॉलीचा आणि दुचाकी स्वाराचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उस वाहतूकीच हा 6 वा बळी असून अजून किती बळी गेल्यावर अपघात थांबणार हे न उलघडणार कोडे आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार संतोष नारायण हिरवे वय 51 रा. तांदूळवाडी बारामती यांचा या अपघातात मृत्यू झाला. हिरवे हे कल्याणी कंपनीचे कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.भिगवण बाजूने बारामती बाजूला जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि दुचाकी यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या खांद्याच्या उजवी बाजूमध्ये उस अथवा लोखंडी रॉड घुसल्याने गंभीर जखमा झाल्याचे दिसून आले. यात त्यांची बरगडी तुटल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे . यावेळी भिगवण येथील आपुलकीची सेवा ऍम्ब्युलन्सचे संचालक केतन वाघ यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी तक्रारवाडी येथील लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये दाखल केले मात्र उपचाराअगोदरच त्यांनी आपले प्राण गमावले होते. अपघात घडल्यावर ट्रॅक्टर ड्रायव्हर हा अपघात स्थळापासून पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उस वाहतूकीचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत असून कारखाना प्रशासन तसेच परिवहन विभाग अनेक उपाय योजना राबवीत असताना आणि भिगवण पोलीस तसेच महामार्ग पोलीस रोज कारवाया तसेच जनजागृती करत असताना अपघाताचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही.
अपघाताची खबर घेण्याचे काम भिगवण पोलीस रात्री उशिरा पर्यंत करत होते.शववीच्छेदन करण्यासाठी मृतदेह भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास भिगवण पोलीस करणार आहेत.

क्षीरसागर विद्यालयात आंतरराष्ट्रीय मानवअधिकार जनजागृती ; ऍड. तुषार झेंडेपाटील यांचे मिळाले मार्गदर्शन

0

भिगवण वार्ताहर.दि.११

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे ओचीत्य साधून भिगवण येथील क्षीरसागर विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध कायदे तसेच ग्राहक जागृती बाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी एडव्होकेट तुषार झेंडेपाटील अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार याविषयी ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाला माहिती व्हावी राष्ट्रीय आयोग त्यातील विविध कायदे सर्वसामान्यांना माहिती व्हावेत या उद्देशाने हा कार्यक्रम क्षीरसागर विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.यावेळी मानवाचे हक्क आणि अधिकार तसेच मुलभूत कर्तव्य याबाबत झेंडेपाटील यांनी विवेचन करीत विद्यार्थांना उदाहरणासह महत्व पटवून दिले.यावेळी रायरेश्वर ते कुंभारगाव ३७ दिवस पायी प्रवास करणाऱ्या घनशाम केळकर यांच्या जनजागृती यात्रेचे स्वागत करण्यात आले.यावेळी दिलावर तांबोळी उपाध्यक्ष अ.भा.ग्रा.प .पुणे ,गणेश गुप्ते सचिव इंदापूर ,अर्चना गोरे पर्यावरण विभाग प्रमुख इंदापूर ,नाझिया सय्यद सदस्य पुणे जिल्हा यांच्या उपस्थितीत हा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सर्व विद्यार्थी वर्गाने चौकस बुद्धीने कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.यावेळी झेंडेपाटील यांनी बोलताना विद्यार्थी हीच देशाची खरी ताकद असून त्यांना मानवाधिकार आयोग त्याचे कार्य आणि त्याची सार्वजनिक जीवनात असणारी आवश्यकता हि विद्यार्थ्यावर बिंबवणे गरजेचे असल्याचे सांगितले.

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अपघात ; अपघातात वाहनांनी पेट घेतल्याने चालकाचा होरपळून मृत्यू

0

ऊस हंगामातील चौथा बळी. परिवहन विभाग आणि कारखाना प्रशासन यांनी चालकांना प्रशिक्षण देण्याची मागणी.

भिगवण वार्ताहर.दि.७

भिगवण बारामती रोडवरील पिंपळे गावच्या हद्दीत उस वाहतूक करणारा ट्रक आणि ट्रॅकटर यांच्यात अपघात होवून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनाने पेट घेतल्यामुळे ट्रॅकटर ड्रायव्हरचा जागीच जळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली .ऊस हंगाम सुरु झाल्यापासून परिसरातील हा चौथा बळी असून अपघातानंतर मृत ड्रायव्हरचा जळून अगदी कोळसा झाल्याचे पहावयाला मिळाले .त्यामुळे आतातरी कारखाना प्रशासन आणि परिवहन विभागाने मोकाट उस वाहतुकीवर अंकुश लावून निष्पाप नागरिकांच्या जीवाचा विचार करावा अशी मागणी समोर येत आहे.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात अमोल राजू कुराडे रा.नातेपुते असे मृत ड्रायव्हरचे नाव आहे.हा अपघात रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला असून उसाने भरलेला ट्रक भिगवण बाजूने बारामती बाजूकडे जात असताना भिगवण बाजूला मोकळा असणारा ट्रॅकटर आणि ट्रोली यांच्यात जोराची धडक झाली.यात ट्रॅकटरची डीझेल टाकी फुटल्याने आग लागली असावी .यामुळे दोन्ही वाहनाने जोरदार पेट घेतला यात ट्रॅकटर ड्रायव्हर अडकल्यामुळे त्याला बाहेर पडणे शक्य झाले नाही.दोन्ही वाहनाने पेट घेतल्यामुळे कोणालाही मदत करणे शक्य झाले नाही त्यामुळे जवळपास दोन तास वाहतूक थांबली होती.भिगवण पोलिसांनी तातडीने घटना स्थळी भेट घेवून मदत कार्याला सुरवात केली.आग विझविण्यासाठी बिल्ट पेपर कारखान्याची एक आणि शेटफळ अग्रो कारखान्याच्या दोन अग्निशमन वाहने पाचारण करण्यात आली.अग्निशमन यंत्रणा पोलीस जवान आणि नागरिकांच्या मदतीने हि आग आटोक्यात आणली गेली.यावेळी वाहतूक पूर्णपणे थांबली होती.पोलिसांनी मदत करीत वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले.आगीमुळे ट्रॅकटर ड्रायव्हरचा जळून कोळसा झाल्याचे तर दोन्ही वाहनाचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे दिसून आले.

या अपघातामुळे उस वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला असून अजून किती नागरिकांचा जीव गेल्यावर कारखाना प्रशासन आणि परिवहन विभाग जागा होणार असा सवाल नागरिक करीत आहेत .तर अपघातात जीव गेल्यास याची जबाबदारी सबंधित कारखाना प्रशासनावर निश्चित झाल्यावर निष्पाप नागरिकांचे जीव वाचतील अशी मागणी नागरिक करीत आहेत.

…..उस वाहतूक करणारी ट्रॅकटर यंत्रणा धोकेदायक आणि अगदी बेफिकीर वागत असून या मार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेवून रस्त्यावर यावे लागत असल्याचे तसेच कारखाना प्रशासन आणि परिवहन विभागाने तातडीने लक्ष देवून ट्रॅकटर चालकांना योग्य प्रशिक्षण देण्याची मागणी नागरिक प्रामुख्याने करीत आहेत.दारू पिवून वाहने चालविणे ,परवाना नसणे ,कर्णकर्कश आवाजात गाणी लावणे ,प्रमाणापेक्षा जास्तीचा लोड वाहने ,मदनवाडी घाटात भरलेली वाहने यांची लागलेली शर्यत सर्वसामान्य नागरिकांना दिसते मात्र कारखाना प्रशांसन आणि परिवहन विभागाला दिसत नाही का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

भिगवण ग्रामीण रुग्णालयाला उपसंचालक डॉ. भगवान पवार यांची सरप्राईज व्हिजिट ; परिमंडळस्तरीय पथकाने घेतली कामकाज माहिती.

0

भिगवण वार्ताहर .दि.२९

भिगवण ग्रामीण रुग्णालयाला परिमंडळस्तरीय पथकाने अचानक सरप्राईज भेट दिली. आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ.भगवान पवार यांच्या सोबत वैदकीय अधिकारी पुणे डॉ.अभिराज सूर्यवंशी,डॉ.आनंद साबणे स्त्रीरोग तद्न्य भोर ,गणेश औटी कार्यालयीन अधीक्षक ,गणेश जगताप परिमंडळ कार्यक्रम व्यवस्थापक ,धनाजी कोलगे मूल्य व सनियंत्रक अधिकारी ,सागर शेळके फॅसिलीटी मॅनेजर पुणे या पथकाने अचानक भेट दिली .

भिगवण ट्रोमा केअर सेंटर ‘कोमात’ आणि ग्रामीण रुग्णालयही आजारी असा मथळा असणाऱ्या बातम्या काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या या अनुषंगाने उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी रुग्णालयाला दिली असावी .यावेळी डॉ .पवार आणि सोबत आलेल्या पथकाने रुग्णालयाच्या प्रत्येक विभागाची पाहणी करीत कामकाजाची माहिती घेतली.तसेच या रुग्णालयात असणाऱ्या अस्वच्छतेबाबत पथकाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करीत कर्मचारी यांना सूचना केल्या.या भेटी दरम्यान भिगवण ग्रामीण रुग्णालयात १ स्त्रीरोग तद्न्य ,२ वैदकीय अधिकारी ,सहाय्यक अधीक्षक ,कनिष्ठ लिपिक इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते .

यावेळी पथकाला काही त्रुटी आढळून आल्या यात कंत्राटी पद्धतीने ९ कर्मचारी कार्यरत असताना रुग्णालयातील विविध कक्ष आणि उपकरणावर अत्यंत अस्वच्छता आढळून आली.रुग्णालयात अपेक्षेप्रमाणे प्रसूती होत नसल्याचे आढळून आले.मार्गदर्शक सूचनानुसार ओपीडीची वेळ ,वैदकीय अधिकारी यांचे नावे व उपलब्धता तसेच विविध कार्यक्रमाचे जनजागृती साहित्य दर्शनी भागात लावल्याचे दिसून आले नाही.कंत्राटी पद्धतीच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ व सहायक कार्यरत असताना अपेक्षित चाचण्या होत नसल्याचे तसेच पुरुषकक्ष व महिला कक्षामध्ये मार्गदर्शक सूचनानुसार खाटांचे बेडशीट बदलण्यात येत नसल्याचे आढळून आले.

याची गंभीर दखल उपसंचालक डॉ.पवार यांनी पुढील काळात रुग्णसेवेत मार्गदर्शक सूचनानुसार आवश्यक सुधारणा न झाल्यास कारवाई करण्याचे संकेत दिले .तसेच रुग्ण त्यांचे नातेवाईक ,नागरिक आणि पत्रकार यांच्याशी समन्वय ठेवून रुग्णालयातील सेवा सुविधांची जास्तीत जास्त जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या .