Friday, July 4, 2025

सकल मराठा समाजाने रोखला पुणे सोलापूर महामार्ग ; जालना येथील लाठीमाराचा भिगवण येथे निषेध

भिगवण वार्ताहर.दि.३ जालना येथील मराठा आंदोलकांवर पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचा निषेध करण्यासाठी भिगवण येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरण्यात आला.यावेळी आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची डोकी फोडणाऱ्या पोलिसांना तातडीने निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली. एक मराठा लाख मराठा ,आर कोण म्हणत देणार नाही आरक्षण घेतल्या...

भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी दिलीप पवार यांना ग्रीन वर्ल्ड चा सन्मान

भिगवण वार्ताहर.दि.१५ भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी दिलीप पवार यांचा ग्रीन वल्र्ड प्राईड ऑफ इंडिया २०२३ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.या पुरस्काराने भिगवण पोलीस ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. सहायक पोलीस निरीक्षक म्हणून भिगवण पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर दिलीप पवार यांनी कायदा सुव्यवस्था ,गुन्हेगारीचे उच्चाटन ,वाहतूक कोंडी सारख्या...

वाद एकाशी जिवघेना हल्ला दुसऱ्यावरच ; हॉटेल व्यावसायिक धुमाळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कोडे उलघडले

जीवाघेना हल्ला करणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ; चार अनोळखी साथीदार फरार भिगवण वार्ताहर .दि.१० सत्यवार्ता न्यूज नेटवर्क बातमी. दुचाकीला कट मारल्याच्या वादातून झालेल्या किरकिरीची माफी मागण्याचा बहाना करून बदला घेण्यासाठी आलेल्या टोळक्याने धारदार शश्त्राने दुसऱ्याच तरुणावर वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना दौंड पोलीस ठाणे हद्दीतील...

भिगवण येथील प्रसिद्ध हॉटेल मालकावर जीवघेणा हल्ला ; कोयत्याने केले सपासप वर

जीवाघेण्या हल्यात हॉटेल व्यवसायिक गंभीर जखमी ; उपचारासाठी बारामती येथे दाखल भिगवण वार्ताहर.दि. 9 भिगवण येथील हॉटेल व्यवसायिकावर धारदार शस्त्राने वार झाल्याची घटना सायंकाळी घडली.हल्लेखोर तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळाली नाही.याबाबत मिळालेल्या माहिती नुसार भिगवण येथील प्रसिध्द मासे खानावळीचे मालकांवर हे...

म्हसोबावाडी विहीर दुर्घटना प्रकरणी विहीर मालक आणी ठेकेदार या दोघांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल ;

भिगवण वार्ताहर.दि.५ सत्यवार्ता न्यूज नेटवर्क भिगवण म्हसोबावाडी येथील विहीर दुर्घटना घडून झालेल्या मजुरांच्या मृत्यू बाबत विहीर मालक गिरीश विजय क्षीरसागर तसेच कंत्राटदार विश्वास गायकवाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. या प्रकरणी विहीर मालक गिरीश क्षीरसागर याला अटक करण्यात आले आहे.

म्हसोबावाडीतील विहिरीत गाडल्या गेलेल्या 4 मजुरांचे मृतदेह शोधण्यात एन डी आर एफ पथकाला यश ; 70 तासाच्या अविरत प्रयत्नातून मृतदेह मिळाले

भिगवण वार्ताहर.दि.४ सत्यवार्ता न्यूज नेटवर्क भिगवण म्हसोबावाडी ता.इंदापूर येथील विहिरीची रिंग तयार करत असताना मातीचा ढिगारा ढासळून त्याखाली गाडले गेलेल्या ४ मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात एन डी आर एफ पथकाला ७० तासांनंतर यश मिळाले. ७० तास उलटून गेल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत मजूर मिळण्याची आशा मावळली होती आणि प्रत्यक्षात तेच वास्तव समोर...

तक्रारवाडी येथील नवसाला पावणाऱ्या पिरसाहेबांचा उरूस सोमवारी पासून ; ग्रामपंचायत प्रशासनची जय्यत तयारी

भिगवण वार्ताहर .दि.११   तक्रारवाडी येथील हिंदू मुस्लीम एकात्मतेच प्रतिक असणाऱ्या राजबाग सवार पीरसाहेब उरसाला सोमवार पासून सुरवात होत असून मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस उरूस चालणार आहे अशी माहिती तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांनी दिली.नवसाला पावणारा पीर अशी याची ख्याती असल्याने पुणे मुंबई पासून राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने उरसात उपस्थित राहतात.

साईंनाथ शिक्षण संस्थेच्या आदर्श शाळेचे रौप्य महोत्सवात पदार्पण ;राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोहळा

भिगवण वार्ताहर .दि .२७शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनांमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती होते.असे मनोगत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले .भिगवण येथील आदर्श शाळेतील रौप्य महोत्सव कार्यक्रम वेळी भरणे बोलत होते . डॉ खानावरे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाने पंचवीस वर्षापुर्वी प्रतिकुल परिस्थितींमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना करुन या भागातील विदयार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली...

भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी दिलीप पवार यांना बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानित

भिगवण वार्ताहर.दि.३ भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. भिगवणकर नागरिकांनी पवार यांना मिळालेल्या मानाच्या पुरस्काराबद्दल कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव केला .

अकोले पोटनिवडणूकीसाठी ८७ टक्के मतदान ;दोन गटाची प्रतिष्ठा पणाला

सत्यवार्ता अकोले पत्रकार विजय गायकवाड- इंदापूर तालुक्यात ८ पैकी ७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीच्या जागा बिनविरोध होऊन केवळ एकमेव निवडणूक लागलेल्या अकोले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज ८७ टक्के मतदान झाले.पोटनिवडणूकीच्या झालेल्या मतदानातून उद्या उमेदवारांचे निकालातून भवितव्य ठरणार आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत स्थानिक पातळीवर गटातटाच्या राजकारणातुन एकमेकांची प्रतिष्ठा पणाला...