Friday, July 4, 2025

महाराष्ट्र

On each category you can set a Category template style, a Top post style (grids) and a module type for article listing. Also each top post style (grids) have 5 different look style. You can mix them to create a beautiful and unique category page.

शालेय व्यवस्थापन अध्यक्षपदी निवड होताच शाळेला मिळाले प्रवेशद्वार ; पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळेतील स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि.१६ पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले. पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या परस्परविरोधी तक्रारी...

पंजाबची तरुणी झाली भिगवण करांची सून ; स्वर्गाने नाही सोशल मीडियाने बांधल्या गाठी

जात पात धर्म प्रांत भाषांचा अडथळा पार करीत तरुणी आली प्रियकराच्या घरात ...... या संपूर्ण प्रकरणात भिगवण पोलिसांनी कायदेशीर बाबींची पडताळणी करीत न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करीत मुलीच्या म्हणण्याप्रमाणे प्रियकराच्या बरोबर राहण्यासाठी प्रकिया पूर्ण केली भिगवण वार्ताहर.दि.१४ लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात अशे मानले जाते मात्र मंडळी सोशल मिडीयाच्या...

भिगवण येथे दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्याची मागणी

राज्यमंत्री ना .दत्तात्रय भरणे यांना निवेदनाद्वारे केली मागणी . कार्यालय सुरू झाल्यास नागरिकांचा पैसा आणि वेळ वाचणार ......पांडुरंग जगताप (वकील) भिगवण वार्ताहर .दि.३०इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण शहरात दुय्यम निबंधक कार्यालय मंजूर करण्याची आग्रही मागणी आता जोर धरू लागली असुन याबाबत नागरिकांनी गोविंद डी.कराड ( नोंदणी उपमहानिरीक्षक मुख्यालय महाराष्ट्र...

‘ एक युवक एक पोस्ट कार्ड ‘ मोहीम राबवित मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची मागणी ; भिगवण येथील मुस्लिम युवकांचे अनोखे आंदोलन

आघाडी सरकारच्या काळात मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते.आताच्या महविकास आघाडीत यातील दोन मित्र पक्ष एकत्र असूनही मुस्लिम आरक्षण बाबत उदासीनता .... रियाज शेख एक युवक एक कार्ड मोहिमेचे सदस्य भिगवण वार्ताहर.दि.२२ महाराष्टात मराठा , धनगर ,ओबीसी समाजाचा आरक्षणाचा लढा सुरु असतानाच आता मुस्लीम समाजानेही आरक्षणाच्या लढ्यात उडी घेतली आहे.मुस्लीम...

ना रेमडीसिविर ना फेबी फ्ल्यू ; भिगवण ट्रॉमा कोवीड सेंटर मधील अवस्था

गंभीर रुग्णाच्या नातेवाईकांना करावी लागते इंजेक्शन मिळविण्यासाठी धावाधाव ... कोवीड सेंटरमध्ये कोणाचाच कोणाला मेळ लागत नसल्याचे दिसत आहे वास्तव.. भिगवण वार्ताहर .दि.२६ भिगवण कोविड सेंटर मध्ये आवश्यकता असणाऱ्या रुग्णांना रेमडीसिवीर इंजेक्शन आणि फेबी फ्ल्यू गोळ्या मिळत नसल्यामुळे १५ ऑक्सिजन बेडची सुविधा कशासाठी देण्यात आली असा सवाल येथील रुग्ण...

राज्यमंत्री भरणे यांनी दिलेला शब्द पाळला ; कोवीड सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड ची केली सोय

भिगवण वार्ताहर . दि.२१ भिगवण व परिसरातील कोरोना रुग्नांची वाढती गरज विचारात घेऊन भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटर इमारतीमध्ये सुरु असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात...

कोवीड आढावा बैठकीला मंडल अधिकारी अनुपस्थित ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नाराजी

भिगवण वार्ताहर.दि.१८ इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोना आजाराच्या आढावा घेण्यासाठी भिगवण कोविड सेंटर येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी भिगवण मंडल अधिकारी अनुपस्थित दिसून आल्याने राज्यमंत्री भरणे यांचा पारा चढल्याचे दिसून आले.शांत आणि संयमी नेत्याचे हे रौद्र रूप पाहून बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सबंधित मंडलअधिकारी यांच्या अनुपस्थितितीची दखल घेतली जाईल असा शब्द दिल्याने वातावरण निवळण्यास...

जिल्हा पालक सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची तुषार झेंडेपाटील यांची मागणी

भिगवण वार्ताहर.दि.४जिल्हा पालक सचिव (मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे प्रमुख )शासन निर्णयाचे परिपत्रकाचे उलंघन करून लोकशाहीची चेष्टा करीत असल्याने त्यांचेवर विधान सभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडेपाटील यांनी केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,मुख्य सचिव संजय कुमार ,विधानसभा अध्यक्ष नाना पटोले तसेच विरोधी पक्षनेता यांना निवेदन पाठवून...

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिगवण ग्रामपंचायत आणि रोहित पवार मित्रमंडळाचे कार्यकर्ते महेश शेंडगे यांच्यावतीने गरजू नागरिकांना वाफेच्या मशीनचे वाटप

भिगवन वार्ता. दिनांक ,४कर्जत तालुक्याचे आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भिगवण ग्रामपंचायत आणि रोहित पवार मित्रमंडळाचे कार्यकर्ते महेश शेंडगे यांच्यावतीने गरजू नागरिकांना वाफेच्या मशीनचे वाटप विनामोबदला करण्यात आले. सध्या देशात आणि राज्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. या आजाराला थांबवण्यासाठी अनेक प्रकारची उपाययोजना केली जात आहे त्यातीलच एक...

इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने भिगवण येथे रस्ता रोको

भिगवण वार्ता .४ इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्यावतीने भिगवण येथे शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळेस मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मोर्चा समन्वयक समितीच्या वतीने शासनाचे प्रतिनिधी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर व मंडलाधिकारी मकरंद तांबडे यांना देण्यात आले. पुणे सोलापूर राष्ट्रीय...