Friday, July 4, 2025

प्लास्टिक विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोड मध्ये ; ९ दुकानावर कारवाई करत १८ हजाराचा दंड वसूल

भिगवण वार्ताहर .दि.२५ प्लास्टिक वापरा विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोडमध्ये आली असून एका दिवसात १८  हजार रुपयाचा दंड व्यापारी वर्गाकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे हनुमंत चांदगुडे यांनी दिली .ग्रामपंचायतीने घेतलेल्या या कडक भूमिकेच अनेक पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले असून व्यापारी वर्गातून मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. राज्यभरात...

सामाजिक प्रबोधन करण्यासाठी कीर्तन कारांची गरज असल्याचे ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मत

सत्यवार्ता अकोले वार्ताहर ….विजय गायकवाडवारकरी संप्रदाय हा कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करून समाजाची सेवा करीत असतात.अशी सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी समाजात कीर्तनकार तयार होण्याची गरज असल्याचे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले. धायगुडेवाडी(अकोले ) येथील वैष्णवी बहुउद्देशीय वारकरी शैक्षणिक संस्थेच्या उदघाटन ते प्रसंगी बोलत होते. धायगुडे वाडी येथे प्रसिद्ध कीर्तनकार वैष्णवी धायगुडे यांनी...

अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाई तात्काळ देणार ; पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सत्यवार्ता बातमी : अवकाळी पावसामुळे राज्यात पशुधनाची फार मोठे नुकसान झाले आहे .राज्यामध्ये १ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडले आहेत .बारामती तालुक्यातील सुपा कुतवळवाडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली राज्यभरात याचा फटका बसला असून पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे २००० जनावरांची...

अकोले पोटनिवडणूक पहिल्याच दिवशी पाच उमेदवारी अर्ज दाखल ; निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता

सत्यवार्ता अकोले प्रतिनिधी :विजय गायकवाडअकोले ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून आज अखेर पर्यंत पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गावातील प्रभाग दोन मधील एका रिक्त जागेसाठी निवडणूक होत असून आतापर्यंत पाच जणांनी शक्ती प्रदर्शन करीत इंदापूर येथे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी दीपक कोकरे व सहाय्यक निवडणूक अधिकरी शिवाजी खोसे यांच्याकडे...

भादलवाडी गावात काळभैरवनाथ जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा

सत्यवार्ता प्रतिनिधी : शैलेश परकाळे (भादलवाडी ) भादलवाडी गावात सालाबाद प्रमाणे साजरी करण्यात येत असलेली काळ भैरवनाथ जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . गावातील ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी यावेळी उत्सवात सहभाग घेत देवाची मनोभावे पूजा केली . गेल्या २ वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्यामुळे हा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता .मात्र...

पुणे सोलापूर महामार्ग अपघातात कर्मयोगी संचालकाच्या मुलाचा मृत्यू ; ट्रॉलीचा टायर बदलताना झाला दुर्दैवी अपघात

भिगवण वार्ताहर.दि.१९ पुणे सोलापूर महामार्गावरील गागरगावच्या हद्दीत उस वाहतूक करणाऱ्या वाहनाचे टायर बदलत असताना खासगी प्रवाशी बसने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात आदित्य विश्वास देवकाते या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.तर या अपघातात कर्मयोगी साखर कारखान्याचे नूतन संचालक विश्वास देवकाते गंभीर जखमी झाले आहेत. कर्मयोगी साखर कारखान्याचा ऊस वाहतून करत असताना सदर...

तक्रारवाडी सोसायटीच्या सभासदांना १० टक्के लाभांश वाटप ; सभासदांची दिवाळी होणार गोड

भिगवण वार्ताहर. दि.३१ तक्रारवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने शेतकरी सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करीत सभासदांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.संस्थेच्या ३६५ सभासदांना १० टक्के प्रमाणे जवळपास २ लाख २७ हजार रुपयाचे वाटप करण्यात आल्याची माहिती चेअरमन विकासराव वाघ यांनी दिली. इंदापूर तालुक्यातील अग्रगण्य असणाऱ्या संस्थेचा वसूल...

डिकसळ येथे महिला किसानदिन साजरा : कृषी विभागाच्या वतीने कार्यक्रम

भिगवण वार्ताहर.दि.२९ महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत डिकसळ येथे महिला किसान दिन साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन मंडल कृषी अधिकारी बाळासाहेब कोकणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांना रब्बी हंगामाचे नियोजन करणे ,प्रधानमंत्री कृषी योजना बाबत माहिती देणे तसेच ई पिक पाहणी बद्दल माहिती होण्यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी...

शालेय समिती अध्यक्ष यांचे खर्चाने जिल्हा परिषद शाळेला प्रवेशद्वार ;पोंधवडी गावातील स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि.१६ पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले. पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात...

भिगवण परिसरात समाधान कारक पाऊस ; लवकरच गाठणार सरासरी

भिगवण वार्ताहर .दि.२ भिगवण परिसरात अनेक दिवसापासून केली जाणारी पावसाची  प्रतीक्षा काही प्रमाणात पूर्ण झाली असल्याचे शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे दिसून आले.जवळपास दोन तास पडणाऱ्या पावसाने बळीराजा सुखावला असल्याचे दिसून आले. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या या पावसाची ६६ मिलीमीटर नोंद झाल्याची माहिती ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहायक देविदास फलफले यांनी दिली. राज्यात अनेक ठिकाणी...