भिगवण स्टेशन येथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना ; पंचशील सेवा संघाचा उपक्रम
भिगवण वार्ताहर.दि.२
भिगवण रेल्वे स्टेशन येथे पंचशील सेवाभावी संस्थेच्या माधयामातून भगवान गौतम बुद्धांची ६ फुट उंचीची अष्टधातुची मूर्ती स्थापना करण्यात आली. भिक्कू संघाचे भंतीजींच्या उपासनेतून रविवारी सकाळी या प्रसन्न मूर्तीची स्थापना करण्यात आली.
जगाला शांततेच्या मार्गावर नेत हिंसा न करणे चोरी व्यभिचार तसेच खोटे आणि नशा न करणे या पंचशील तत्वाचे...
भिगवण येथील एकात्मिक बालविकास केंद्र इंदापूरला स्थलांतर करण्यास पालक आणि अंगणवाडी सेविकांचा विरोध ; आंदोलन करत कार्यालयाला ठोकले टाळे
भिगवण वार्ताहर.दि.२१
भिगवण येथील एकात्मिक बालविकास सेवा केंद्राचे कार्यालय इंदापूर येथे स्थलांतरित करण्याला पालक आणि अंगणवाडी सेविकांनी विरोध करीत आंदोलन केले.तर भिगवण साठी मंजुरी असताना इंदापूर येथे स्थलांतर करण्याचा आदेश कार्यकारी अधिकारी यांनी दिलाच कसा असा सवाल येथे उपस्थित असणाऱ्या महिलांनी केला.
एकात्मिक बालविकास सेवा केंद्राचा मुख्य उद्देश प्रकल्पातील सर्व लाभधारकांना...
भिगवण गावच्या उपसरपंचपदी मुमताज शेख यांची बिनविरोध निवड ; गावच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लीम समाजाला संधी
भिगवण वार्ताहर.दि.७
भिगवण गावच्या उपसरपंचपदी मुमताज जावेद शेख यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामसेवक सतीश बोरावके यांनी दिली. शेख यांच्या निवडीमुळे भिगवण गावच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लीम समाजाला न्याय मिळाला असल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी पुरस्कृत पक्षाची सत्ता उलथवून बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपा पुरस्कृत कार्यकारिणीने आपल्या उपसरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण होताच शीतल शिंदे...
भिगवणमध्ये दुकानचा पत्रा कापून किराणा मालाची चोरी ;
भिगवण वार्ताहर.दि.२४
किराणा मालाच्या दुकानाचा पाठीमागे असणारा पत्रा कापून ५८ हजार ४८० रुपयाचा किराणा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना भिगवण येथे घडली.तर पाठीमागे याच दुकानदाराला ५० हजार रुपयाचा चुना लावून भामट्याने किराणा नेला त्याचाच तपास लागला नसतानाच हि घरफोडी घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत अजिनाथ वसंत कवितके या...
रस्त्याच्या विकासकामांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी ; आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वातावरण अजून तापणार .
भिगवण वार्ताहर.दि. १९
भिगवण येथे १५ व्या वित्त आयोगातील मंजूर रस्त्याच्या कामावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बरीच हमरीतुमरी झाल्याची घटना घडली.तर यावेळी विरोधकांनी विकासकामे अडवून सदस्यांना शिवीगाळ केल्याची माहिती सत्ताधारी पार्टीच्या सदस्य प्रतिनिधी तुषार क्षीरसागर यांनी दिली .तर स्थानिक नागरिकाच्या मागणीनुसार रुंदी वाढविण्याची मागणी केली यात वादविवाद करण्याचे कारणच नसल्याचे राष्ट्रवादीचे सचिन बोगावत यांनी...
भिगवण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य तुषार क्षीरसागर यांची निवड ; तर सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी सागर जगदाळे
भिगवण वार्ताहर.दि.१५
भिगवण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा.तुषार क्षीरसागर तर मराठी पत्रकार सोशल मिडिया सेल च्या अध्यक्षपदी सागर जगदाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्योती व्हेज या सुप्रसिद्ध हॉटेल येथील हॉल मध्ये नवजीवन एजन्सीच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
आखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न भिगवण मराठी...
विहिरीच्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या घराला तडे ; पोंधवडी गावातील प्रकार
भिगवण वार्ताहर.दि.१३
पोंधवडी ग्रामपंचायत माध्यमातून खोदण्यात येणाऱ्या विहिरीच्या ब्लास्टिंग मुळे नागरिकांच्या घराला तडे जात असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.तर गावाला लागुनच होत असलेल्या विहिरीवर कोणतीही सुरक्षित उपाय योजना केल्या जात नसल्याचे बोलले जात आहे.
पोंधवडी गावातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा जलजीवन मिशन अंतर्गत...
पुणे सोलापूर महामार्गावर स्वच्छता करणाऱ्या महिलेचा अपघात ;उपचार खर्च देण्यास हायवे प्रशासन तसेच कंत्राटदार यांची टाळाटाळ
भिगवण वार्ताहर.दि.१०
पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण परिसरात सकुंडेवस्ती येथे मेंटेनन्सच्या कंत्राटी कामात असणाऱ्या महिलेचा अज्ञात दुचाकीस्वार धडकून झालेल्या अपघातात हि महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.मात्र अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेची जबाबदारी हायवे प्रशासन आणि सबंधित कंत्राटदार घेताना दिसून येत नसल्यामुळे दवाखान्याचा खर्च भागवायचा कसा असा सवाल कुटुंबापुढे निर्माण झालेला आहे.
भिगवण ग्रामपंचायतच्या वतीने आदर्शवत मिरवणूक ;टाळ मृदुंगाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
भिगवण वार्ताहर.दि.९
भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत टाळ मृदुंगाच्या नादात भजने गावून गणपती बाप्पाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. डीजे गुलाल आणि बीभत्स अंगविक्षेप नृत्याला फाटा देत अनेक गणेश मंडळासमोर हा आदर्श ठेवल्याचे या मिरवणुकीतून दिसून आले.
भिगवण ग्रामपंचायत दरवर्षी गणपती विराजमान करीत असतात.मागील दोन वर्ष मात्र हा आनंद उत्सव शासनाच्या निर्बंधांमुळे...
भिगवण पोलिसांचा उत्साही वातावरणात गणपती बाप्पाला निरोप ;विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांचा सहभाग
भिगवण वार्ताहर.दि.९
भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने विराजमान केलेल्या गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.यावेळी सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलिसांनी बेन्झोच्या ठेक्यावर थिरकत आनंदी वातावरणात बाप्पाला निरोप दिला.
भिगवण पोलीस ठाण्यात प्रत्येक वर्षी गणपती विराजमान केले जातात.मात्र मागील दोन वर्षात आलेल्या जागतिक महामारी मुळे हा उत्सव साजरा...