“माझे कुटुंब माझी जबाबदारी” अभियानात इंदापुर तालुक्याने आघाडी घेतली असुन डाळज नं १ येथे सर्वेक्षण
डाळज वार्ता .१७
"माझे कुटुंब माझी जबाबदारी" अभियानात इंदापुर तालुक्याने आघाडी घेतली असुन डाळज नं १ येथे सर्वेक्षण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी सर्वेक्षणात सहभाग घेत स्वतः नागरिकांची तपासणी केली आणि लक्षण असणाऱ्या नागरिकांनी रॅपीड ॲंटिजन टेस्टसाठी पुढे येण्याचे आवाहन केले.
...
विना मास्क आणि दुचाकीवर सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी २०० रुपयाचा दंड वसूल करून त्याचा वापर भिगवण येथील कोरोना सेंटर वर केला जावा
भिगवण वार्ताहर.दि.१०
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शासनाने ग्रामपंचायतीला विना मास्क आणि दुचाकीवर सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी २०० रुपयाचा दंड वसूल करण्यासाठी परवानगी दिली होती.
या दंडातून भिगवण आणि परिसरातील ग्रामपंचायत कडे लाखो रुपयाचा दंड वसूल करण्यात आला हि रक्कम ग्रामपंचायत खात्यावर पडून असून या निधीचा वापर भिगवण येथील कोरोना सेंटर वर केला जावा...
निसर्गातील ‘इंजिनिअर’ साकारतोय सुबक कलाकृतीसुगरणीच्या खोप्यांची ‘कारागिरी’ मनावर भुरळ घालणारी!
खेड:विजय सोनवणे
'अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला'
निसर्गकन्या,कवयित्री बहिणाबाई यांनी सुगरणीच्या कौशल्याचे वर्णन या कवितेतून केलेले आहे.
इवलीशी चोच आणि पायाची दोन बोटं...इंजिनियरलाही लाजवेल एवढं टॅलेंट मोठं... खरोखरच मनाला अचंबा वाटावा अशी गोष्ट आहे...
वैश्विक महामारीच्या संकटाला संधी समजून काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने लाखो रुपयांचे केळीचे उत्पन्न
भिगवण वार्ताहर .दि .18
संधी समजून काम केलं पाहिजे नेहमी म्हटल जात मात्र कोरोणा सारख्या वैश्विक महामारीच्या संकटाला संधी समजून काम करणाऱ्या एका शेतकऱ्याने लाखो रुपयांचे केळीचे उत्पन्न घेऊन प्रत्यक्षात आणले आणि इतर शेतकऱ्यांच्या समोर देखील एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
इंदापुर तालुक्यातील मदनवाडी गावच्या तुकाराम बंडगर...
पुण्याच्या बाजूकडे जाणारा मालवाहतूक कंटेनर ताब्यात घेत यातील अवैध गुटखा जप्त
भिगवण वार्ताहर.दि.५
भिगवण पोलिसांच्या पथकाने पुणे सोलापूर महामार्गावर भादलवाडी गावच्या हद्दीत सोलापूर हून पुण्याच्या बाजूकडे जाणारा मालवाहतूक कंटेनर ताब्यात घेत यातील अवैध गुटखा जप्त केला.
हायवे पेट्रोलिंग दरम्यान केलेल्या या कारवाईत जवळपास वाहनासह ७६ लाख २४ हजार रुपयाचा ऐवज ताब्यात घेतला.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे...
कोरोना काळात फटाक्याची आतिषबाजी करणे पडले महागात
भिगवण वार्ताहर.दि.१०
कोरोना काळात फटाक्याची आतिषबाजी करणे पडले महागात, कोरोना सारख्या महामारीमुळे सर्वसामान्य जनता त्रासून गेली असताना स्वताचा वाढदिवस फटाक्यांची आतिषबाजी करीत साजरा करणाऱ्या महाभागाला भिगवण पोलिसांनी चाप लावण्याचे काम केले.
वाढदिवस असणाऱ्या बर्थडे बॉय आणि हॉटेल चालकाच्या विरोधात भा.द.वि कलम १८८ प्रमाणे गुन्हा नोंद करीत याबाबत भिगवण पोलीस ठाण्याकडून...