भिगवण पोलिसांचा उत्साही वातावरणात गणपती बाप्पाला निरोप ;विभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांचा सहभाग
भिगवण वार्ताहर.दि.९
भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीने विराजमान केलेल्या गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.यावेळी सर्व अधिकारी पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलिसांनी बेन्झोच्या ठेक्यावर थिरकत आनंदी वातावरणात बाप्पाला निरोप दिला.
भिगवण पोलीस ठाण्यात प्रत्येक वर्षी गणपती विराजमान केले जातात.मात्र मागील दोन वर्षात आलेल्या जागतिक महामारी मुळे हा उत्सव साजरा...
मदनवाडी गावासाठी १५ कोटीची जलजीवन मिशन अंतर्गत योजना ; मा.राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून उतरणार महिलांच्या डोक्यावरचा हंडा
भिगवण वार्ताहर.दि.२३
मदनवाडी गावासाठी जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत १४ कोटी ९८ लक्ष १६ हजार रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास आणि आराखड्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.जिल्हा परिषद सदस्य हनुमंतराव बंडगर तसेच सरपंच आम्रपाली बंडगर यांच्या पाठपुराव्यातून माजी राज्यमंत्री दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या या योजनेमुळे मदनवाडी गावच्या महिलांच्या डोक्यावरून कायमस्वरूपी हंडा उतरला जाणार आहे.
भिगवण येथील बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा जलदगती न्यायालयात वर्ग करण्यासाठी प्रयत्न करणार ; खासदार सुप्रियाताई सुळे यांची ग्वाही
भिगवण वार्ताहर .दि.२१
भिगवण परिसरातील शाळेत घडलेल्या बाललैंगिक अत्याचार प्रकरणी माहिती घेण्यासाठी तसेच निर्भया पथकाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी सबंधित शाळेला भेट दिली.यावेळी सुळे यांनी शिक्षणविभाग, पोलीस यंत्रणा आणि पालक यांच्याशी विभागवार संवाद साधित सूचना केल्या.
यावेळी बोलताना सुळे यांनी भिगवण सारख्या शहरात शाळेसारख्या पवित्र मंदिरात घडलेला प्रकार...
भिगवण रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात साजरा .
भिगवण वार्ताहर दि.३१
स्वातंत्र्यपूर्व काळापासून आलेल्या सामाजिक विषमतेमुळे निर्माण झालेली सामाजिक असुरक्षितता अजूनही गेलेली सामाजिक विषम सामाजिक विषमते मधून निर्माण होणारी असुरक्षितता व त्यातून गमावलेली संवेदनशीलता यामुळे संचय करण्याची वृत्ती वाढत आहे आणि ती सामाजिक असुरक्षितते मुळे निर्माण झाली आहे.आज मी माझे घर माझेच अशी वृत्तीमुळे संयुक्त कुटुंब पद्धतीतून विभक्त कुटुंब मोठ्या प्रमाणावर निर्माण...
पुणे सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळी लुटणारी टोळी जेरबंद ;भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी
भिगवण वार्ताहर .दि. १२
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळेस अडवून लुटमार करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात भिगवण पोलिसांना यश आले.९२ हजार रुपयाच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी दिली.
शुभम प्रकाश जाधव वय २१ , वैभव व्यंकट संगुळे वय २१ रा.काळेगाव...
कुंभारगाव पोंधवडी पिंपळे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे ; सार्वजनिक बांधकाम खात्याची कंत्राटदारावर मेहरबानी का ?नागरिकांचा सवाल
रस्ता बटराप्रमाणे फुगणार कि कोंबडीच्या कातडे सारखं सोलटवून डांबर निघणार हे काळच ठरवणार
भिगवण वार्ताहर.दि.३
कुंभारगाव पोंधवडी पिंपळे रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून हि याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे कंत्राटदारावर एवढी मेहेरबानी का ? असा सवाल नागरिक करीत आहेत. तर राज्यमंत्री भरणे यांनी आणलेला...
डम्परखाली चिरडून मृत्यू झालेल्या तरूणाच्या पत्नीने गळफास लावत दिला जीव ; भिगवण येथील दुर्दैवी घटना
भिगवण वार्ताहर.दि.१४
डंपरखाली चिरडून जीव गेलेल्या तरुणाच्या पत्नीने नवऱ्याच्या अंत्यविधीच्या दुसर्या दिवशीच गळफास घेत आपला जीव दिल्याची मनाला सुन्न करणारी घटना भिगवण येथे घडली.या दुर्दैवी घटनेने भिगवण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
साक्षी उर्फ पियुषा ज्ञानेश्वर बिबे वय २० रा.विवेकानंद नगर भिगवण असे गळफास लावून जीव दिलेल्या...
कुंभारगाव येथील लक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवार पासुन सुरु ; सरपंच उज्वला परदेशी यांची माहिती
भिगवण वार्ताहर .दि.२१
कुंभारगाव येथील जागृत देवी अशी ओळख असणाऱ्या लक्ष्मी देवीची यात्रा शुक्रवार पासून सुरु होणार असल्याची माहिती सरपंच उज्वला परदेशी यांनी दिली. दोन दिवस चालणाऱ्या या जत्रेला परिसरातील नागरिक तसेच पुणे आणि मुंबई भागात राहणारे चाकरमाने मोठ्या प्रमाणात देवीचे दर्शन घेण्यासाठी उपस्थिती लावतात.
उजनी धरणाच्या किनारी वसलेल्या आणि पर्यटनासाठी...
अभिनेत्री पल्लवी सोनोने यांचा राज्यमंत्री भरणे यांच्या हस्ते सन्मान ; तावशी येथील कार्यक्रमात केला सन्मान .
भिगवण वार्ताहर .दि .२१भिगवण (ता इंदापूर) येथील पल्लवी सोनोने यांचा अभिनय क्षेत्रातील मानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.अभिनेत्री सोनोने यांना महिला दिनानिमित्त भारत इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल च्या वतीने वूमन सिनेमा अँड आर्टस इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने तावशी येथील जाहीर कार्यक्रमात सोनोने यांना भरणे यांच्या...
भिगवण बाजारपेठ वाहतूक कोंडी पासून घेणार मोकळा श्वास ; पोलिसांनी उचलले कारवाई साठी पाऊल
भिगवण वार्ताहर .दि.१९
भिगवण पोलिसांनी मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कार्यवाहीला सुरवात करीत दुकानाबाहेर माल लावणाऱ्या व्यापार्यांना सूचना करीत आपला माल दुकानात ठेवण्यास सांगितले.तर पहिल्या टप्यात व्यावसायिकांना सामंजस्याने जनजागृती करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांसाठी कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी दिला .
भिगवण बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या वाढत असून...