कुंभारगावमध्ये बनावट शिक्के वापरून दाखले ;टोळी कार्यरत असण्याचा सरपंच उज्ज्वला परदेशी यांचा संशय
भिगवण वार्ताहर .दि.७कुंभारगांव(ता.इंदापुर) येथील ग्रामपंचायत व ग्रामसेवकांचा बनावट शिक्का बनवुन त्याचा गैरवापर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामसेवकांच्या सजगतेमुळे उघड झाला आहे. याबाबत कुंभारगांव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी येथील भिगवण पोलिस ठाण्यामध्ये सही व शिक्याचा गैरवापर झाल्याचा तक्रार अर्ज दाखल केला आहे.याबाबत कुंभारगावचे ग्रामसेवक सतीश बोरावके यांनी येथील पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार मिळालेली माहिती अशी की, संजय शिवाजी...
अपघाताचा बनाव फसला अन् पचलेला खुनाचे गूढ उकललं ; भिगवण पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाची दमदार कामगिरी
भिगवण वार्ताहर.दि.२
शेतातील ट्रोलीच्या लोखंडी प्लेट चोरल्याच्या संशयातून अनोळखी इसमास लोखंडी टौमीने तोंडावर कपाळावर मारहाण करीत त्याचा खून करीत पुणे सोलापूर महामार्गावरील पोंधवडी गावच्या हद्दीत अपघात झाल्याचा बनाव करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या भिगवण पोलिसांनी आवळल्या. भिगवण पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याबाबत...
साईंनाथ शिक्षण संस्थेच्या आदर्श शाळेचे रौप्य महोत्सवात पदार्पण ;राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोहळा
भिगवण वार्ताहर .दि .२७शिक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तींच्या जीवनांमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती होते.असे मनोगत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले .भिगवण येथील आदर्श शाळेतील रौप्य महोत्सव कार्यक्रम वेळी भरणे बोलत होते .
डॉ खानावरे यांच्या मार्गदर्शनाखाली साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाने पंचवीस वर्षापुर्वी प्रतिकुल परिस्थितींमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना करुन या भागातील विदयार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली...
उजनीच्या पुलाखाली आढळला पोत्यात भरलेला मृतदेह ; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे आवाहन
भिगवण वार्ताहर .दि.२५
भिगवण पोलीस ठाणे हद्दीत उजनी धरणाच्या पाण्यात पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली.भिगवण पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मदनवाडी गावाच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्ग सर्विस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या पुलाखाली पोत्यात भरलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आला.यावेळी...
उजनीच्या पुलाखाली आढळला पोत्यात भरलेला मृतदेह ; मदनवाडी हद्दीतील खळबळ जनक प्रकार
अनोळखी ४० ते४५ वयाच्या पुरुषाचा सडलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिसांचे प्रसिद्धी पत्रका द्वारे आवाहन
भिगवण वार्ताहर .दि.२५
भिगवण पोलीस ठाणे हद्दीत उजनी धरणाच्या पाण्यात पोत्यात भरलेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली.भिगवण पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी ससून रुग्णालयात पाठविले आहे.
भिगवण ग्रामपंचायतीने थकीत कर वसुलीसाठी महा पारेषण कार्यालया ठोकले टाळे ; २ कोटी १७ लाखाची थकबाकी
भिगवण वार्ताहर .दि.७
ग्रामपंचायत कराच्या थकबाकीमुळे भिगवण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कार्यालयाला ग्रामपंचायत विभागाकडून टाळे ठोकण्यात आले. वीज बिल थकल्यावर ग्राहकाची वीज कापणाऱ्या विभागाला ग्रामपंचायत विभागाने घरपट्टी आणि कर न भरल्यामुळे टाळे लाऊन दणका दिला असल्याचे दिसून आले.
याबाबत भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेल्या माहिती...
प्लास्टिक विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोड मध्ये ; ९ दुकानावर कारवाई करत १८ हजाराचा दंड वसूल
भिगवण वार्ताहर .दि.२५
प्लास्टिक वापरा विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोडमध्ये आली असून एका दिवसात १८ हजार रुपयाचा दंड व्यापारी वर्गाकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे हनुमंत चांदगुडे यांनी दिली .ग्रामपंचायतीने घेतलेल्या या कडक भूमिकेच अनेक पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले असून व्यापारी वर्गातून मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यभरात...
अकोले पोटनिवडणूक पहिल्याच दिवशी पाच उमेदवारी अर्ज दाखल ; निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता
सत्यवार्ता अकोले प्रतिनिधी :विजय गायकवाडअकोले ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून आज अखेर पर्यंत पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गावातील प्रभाग दोन मधील एका रिक्त जागेसाठी निवडणूक होत असून आतापर्यंत पाच जणांनी शक्ती प्रदर्शन करीत इंदापूर येथे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी दीपक कोकरे व सहाय्यक निवडणूक अधिकरी शिवाजी खोसे यांच्याकडे...
रोटरीच्या मदतीतून विरवाडी गावच्या दिव्यांग तरुणाला व्हीलचेअर ; भिगवण रोटरीचा स्तुत्य उपक्रम
भिगवण वार्ताहर .दि . २७रोटरी क्लब ऑफ भिगवन तसेच रोटरी क्लब ऑफ बिबेवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भिगवण येथील दिव्यांग युवक पप्पू जाधव यास व्हीलचेअर भेट देण्यात आली. यावेळी रोटरी अध्यक्ष संजय खाडे तसेच इतर रोटरीचे सदस्य उपस्थित होते .
भिगवण विरवाडी येथील जाधव यास दिव्यांग असलेल्या कारणामुळे दैनंदिन जीवनामध्ये खुप अडचणीचा सामना करावा...
रेल्वे खाली उडी घेत दिला तरुण व्यावसायिकाने दिला जीव ; भिगवण येथील धक्कादायक बातमी
भिगवण वार्ताहर.दि.२७
भिगवण व्यापारी पेठेतील तरुण व्यावसायिकाने रेल्वेखाली उडी घेत जीव दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली.घरगुती वाद कि पैशाचे तणाव याचे कारण समजू शकले नाही मात्र या घटनेमुळे व्यापारी वर्गात दुखाचे सावट पसरले असल्याचे दिसून आले.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार सुनील पांडुरंग कुचेकर वय २२ असे तरुण व्यावसायिकाचे नाव आहे.सुनील...