भिगवण वार्ताहर . दि.२४
इंदापूर तालुक्यामध्ये सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून, अनेक रुग्ण हे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या खाजगी हॉस्पिटल कडून रुग्णांची जादा बिले आकारली जाऊ नयेत व ज्या प्रमाणात मोबदला घेतला जातो त्याच प्रमाणात सोयी दिल्या जातात का नाही हे पाहण्यासाठी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे व भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने गोपनीय विभाग पोलीस नाना विर यांनी आज दि. २३ रोजी भिगवण येथील खाजगी कोविड सेंटर मध्ये जाऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी भिगवण मध्ये असलेल्या यशोधरा हॉस्पिटल तसेच भिगवण आय सी यू कोविड सेंटरमध्ये जाऊन दाखल असलेल्या रुग्णांची विचारपूस करत त्या ठिकाणी एकूण रुग्ण संख्या किती आयसी बेड किती व्हेंटीलेटर संख्या हॉस्पिटल परवाना स्वच्छ्ता याची पाहणी केली .तसेच दाखल रुग्णांच्या बिलांची ज्यादा आकारणी केली जाते का? तसेच ऑक्सीजन वर रुग्ण किती आहेत, रेमडेसिवरची मागणी किती ? व पुरवठा किती होत आहे. त्या ठिकाणी मिळणारी सोयी सुविधा व नागरिकांच्या बिला संदर्भात काही तक्रारी आहेत का? हे देखील जाणून घेतले.
यावेळी यशोधरा हॉस्पिटलचे संचालक डॉ.ज्ञानेश्वर रेनुकर तसेच डॉ.महेश गाढवे यांनी माहिती दिली तर ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी तहसील दार ठोंबरे यांच्याकडे मागणी केली.तसेच रेमडीशिविर इंजेक्शन मागणी प्रमाणात उपलब्धता होत नसल्याची माहिती दिली.
भिगवण आय सी यू सेंटरचे संचालक डॉ.मिथुन यादव यांनी शासनाने खासगी कोवीड सेंटरच्या डॉकटरची शासकीय कोवीड सेंटरला लावलेल्या ड्यूटी बाबत नाराजी व्यक्त केली.दिवसभर खासगी दवाखानयात रुग्णांना सेवा देण्यास वेळ अपुरा पडत असून ६ तास वेळ काढणे शक्य नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याबाबत आपण लेखी स्वरूपात म्हणणे शासन दरबारी पोहोचविनार असल्याचे भिगवण आय सी यू संचालक डॉ.वल्लभ वेद पाठक यांनी सांगितले .