भिगवण वार्ताहर . दि.२१
भिगवण व परिसरातील कोरोना रुग्नांची वाढती गरज विचारात घेऊन भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटर इमारतीमध्ये सुरु असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आय़ुष प्रसाद, प्रभारी तहसलिदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परिट, जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रताप पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस सचिन बोगावत, ,तुषार क्षीरसागर, डॉ. चंद्रकांत खानावरे,सरपंच तानाजी वायसे, भिगवन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने ,मदनवाडीचे उपसरपंच तेजस देवकाते उपस्थित होते. १० बेडच्या ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी ना. भरणे यांनी येथील सेंटरची पाहणी केली व उपलब्ध सुविधाबाबत माहिती घेतली.
यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे इंदापुर तालुक्यामध्ये सध्या १६६३ सक्रिय कोरोना रुग्न असल्याची माहिती पत्रकार यांना दिली. रुग्नांना योग्य ते उपचार मिळावे यासाठी तालुक्यामध्ये आवश्यकतेनुसार कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. भिगवण येथे ६६ आयसोलेशन बेड सुविधा आहे त्यामध्ये आत्ता १० ऑक्सिजन बेडची भर पडलेली आहे. भिगवण येथे टप्प्याटप्प्याने येथे ,२० ऑक्सिजनयुक्त बेडची सोय उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. येथील कोविड सेंटरमध्ये आवश्यक डॉक्टर इतर स्टाफचीही नेमणुक केली आहे. सध्याचा काळ अतिशय कठीण आहे नागरिकांनी शासनाच्या वतीने वेळोवेळी लागु केलेल्या निर्बंधाचे पालन केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी पोझितिव रुग्णाची माहिती ज्याप्रमाणे अपडेट केली जात त्याचं प्रमाणे निगेटिव्ह रुग्णाची माहिती अपडेट करण्याच्या सूचना दिल्या.तसेच ऑक्सिजन बेड साठी आवश्यक डॉक्टरची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती दिली.
राज्यमंत्री भरणे यांनी गेल्या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत भिगवण कोविड सेंटर येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध करणार असल्याची ग्वाही दिली होती.त्याची पूर्तता करून आपण फक्त बोलतच नाही तर काम ही करतो हे दाखवून दिले आहे. ऑक्सिजन बेड मुळे भिगवण कर नागरिकांना याचा निश्चतच फायदा होणार आहे.