भिगवण वार्ता.13
इंदापूर बाजार समिती चे संचालक आणि मदनवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आबासाहेब देवकाते यांच्यावर काही अज्ञात इसमाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवे वरील असणारे आबासाहेब देवकाते यांचे घराशेजारील हॉटेलवर हा प्रकार घडला रात्री उशिरा जेवणासाठी आलेल्या या सहा अज्ञात इसमानी काही कारणावरून हॉटेलचे मालक संतोष देवकाते यांच्याशी वाद करीत त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी हॉटेलमधील असणाऱ्या कामगारांनी याची माहिती आबासाहेब देवकाते यांना दिली यावेळी आबासाहेब देवकाते यांनी नक्की झालेला प्रकार काय आहे याची माहिती घेण्यासाठी घटनास्थळी गेले असता अज्ञात इसमांनी त्यांच्यावर लाकडी दांडके घेऊन हल्ला केला यातील एक हल्ला आबासाहेब देवकते यांच्यावर मी झाले ते गंभीर जखमी झाले.
चॉकलेट कलरच्या चे एम जी हेक्टर वाहनातून आलेले सदर अज्ञात इसम सोलापूरच्या बाजूने येऊन पुन्हा त्याच दिशेने निघून गेले. जखमी अवस्थेत देवकाते यांना भिगवण येथील भिगवन आयसीयू सेंटर प्राथमिक उपचार करून पुणे येथील रुबी हॉल येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
वर्मी घाव बसल्यामुळे जखमी झालेले देवकाते यांचेवर पुणे येथील रूबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत माहिती मिळताच भिगवण पोलिस स्टेशनचे एक पथक घटनास्थळी जाऊन हल्ला करणाऱ्या आरोपींचा शोध घेतला तसेच या ठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली.