भिगवण वार्ता.दि.२४
भिगवण पोलिसांनी चोरट्या वाळू उपशावरील कारवाईत जप्त केलेल्या वाळू साठा सांभाळण्याची जबाबदारी महसूल विभागाने तक्रारवाडी गावच्या पोलीस पाटील यांच्यावर टाकल्याची माहिती पत्राद्वारे देण्यात आली आहे.
कोरोनाच्या कामामुळे आधीच त्रासून गेलेल्या पोलीस पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली असून “ घरचे झाले थोड आणि व्याह्याने धाडले घोडे ”असे म्हणायची वेळ आल्याचे दिसून येत आहे..
भिगवण पोलिसांनी गुरवारी पहाटे धाडसी कारवाई करीत जवळपास १२ लाख रुपयाच्या बोटी आणि फायबर ताब्यात घेतले.यावेळी याची माहिती महसूल विभागाला देत या जप्त केलेल्या बोटी आणि फायबर जिलेटीन च्या सहायाने उडवून देण्यात आल्या.तर या कारवाईत जवळपास २८ ब्रास वाळू जप्त करण्यात आली.या वाळूची किमत जवळपास १ लाख ५० हजार रुपयाच्या घरात आहे .
हे साठे उजनी जलाशयाच्या किनारी असून ते महसूल विभागाने ताब्यात घेत पंचनामा केला आहे.तसेच या वाळू साठ्याचे रक्षण करण्याची जबाबदारी महसूल विभागाने तक्रारवाडी गावचे पोलीस पाटील अमर सुरेंद्रकुमार धुमाळपाटील यांच्याकडे दिली आहे.या संदर्भात धुमाळपाटील यांना गावकामगार तलाठी महादेव श्रीराम भारती यांनी पत्राद्वारे ताबा दिला आहे.
पुढील आदेश होई पर्यंत वाळू साठा सांभाळण्याची जबाबदारी पोलीस पाटील यांची असून यामुळे पोलीस पाटील यांच्या डोकेदुखीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
याबाबत पोलीस पाटील अमर धुमाळ यांनी महसूल विभागाने जप्त केलेली मालमत्ता सांभाळण्याची जबाबदारी आपल्यावर टाकली असून ती योग्य रीतीने पार पाडणार असल्याचे सांगितले.
तर सोशल मिडिया वर या मालमत्ता चोरी केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे आवाहन धुमाळपाटील यांनी परिसरातील नागरिकांना केले आहे .