भिगवण वार्ताहर.दि.११
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे ओचीत्य साधून भिगवण येथील क्षीरसागर विद्यालयातील विद्यार्थ्यांना विविध कायदे तसेच ग्राहक जागृती बाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी एडव्होकेट तुषार झेंडेपाटील अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत पुणे जिल्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार याविषयी ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाला माहिती व्हावी राष्ट्रीय आयोग त्यातील विविध कायदे सर्वसामान्यांना माहिती व्हावेत या उद्देशाने हा कार्यक्रम क्षीरसागर विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.यावेळी मानवाचे हक्क आणि अधिकार तसेच मुलभूत कर्तव्य याबाबत झेंडेपाटील यांनी विवेचन करीत विद्यार्थांना उदाहरणासह महत्व पटवून दिले.यावेळी रायरेश्वर ते कुंभारगाव ३७ दिवस पायी प्रवास करणाऱ्या घनशाम केळकर यांच्या जनजागृती यात्रेचे स्वागत करण्यात आले.यावेळी दिलावर तांबोळी उपाध्यक्ष अ.भा.ग्रा.प .पुणे ,गणेश गुप्ते सचिव इंदापूर ,अर्चना गोरे पर्यावरण विभाग प्रमुख इंदापूर ,नाझिया सय्यद सदस्य पुणे जिल्हा यांच्या उपस्थितीत हा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी सर्व विद्यार्थी वर्गाने चौकस बुद्धीने कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.यावेळी झेंडेपाटील यांनी बोलताना विद्यार्थी हीच देशाची खरी ताकद असून त्यांना मानवाधिकार आयोग त्याचे कार्य आणि त्याची सार्वजनिक जीवनात असणारी आवश्यकता हि विद्यार्थ्यावर बिंबवणे गरजेचे असल्याचे सांगितले.


















