ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अपघात ; अपघातात वाहनांनी पेट घेतल्याने चालकाचा होरपळून मृत्यू

0
1297

ऊस हंगामातील चौथा बळी. परिवहन विभाग आणि कारखाना प्रशासन यांनी चालकांना प्रशिक्षण देण्याची मागणी.

भिगवण वार्ताहर.दि.७

भिगवण बारामती रोडवरील पिंपळे गावच्या हद्दीत उस वाहतूक करणारा ट्रक आणि ट्रॅकटर यांच्यात अपघात होवून झालेल्या अपघातात दोन्ही वाहनाने पेट घेतल्यामुळे ट्रॅकटर ड्रायव्हरचा जागीच जळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली .ऊस हंगाम सुरु झाल्यापासून परिसरातील हा चौथा बळी असून अपघातानंतर मृत ड्रायव्हरचा जळून अगदी कोळसा झाल्याचे पहावयाला मिळाले .त्यामुळे आतातरी कारखाना प्रशासन आणि परिवहन विभागाने मोकाट उस वाहतुकीवर अंकुश लावून निष्पाप नागरिकांच्या जीवाचा विचार करावा अशी मागणी समोर येत आहे.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात अमोल राजू कुराडे रा.नातेपुते असे मृत ड्रायव्हरचे नाव आहे.हा अपघात रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडला असून उसाने भरलेला ट्रक भिगवण बाजूने बारामती बाजूकडे जात असताना भिगवण बाजूला मोकळा असणारा ट्रॅकटर आणि ट्रोली यांच्यात जोराची धडक झाली.यात ट्रॅकटरची डीझेल टाकी फुटल्याने आग लागली असावी .यामुळे दोन्ही वाहनाने जोरदार पेट घेतला यात ट्रॅकटर ड्रायव्हर अडकल्यामुळे त्याला बाहेर पडणे शक्य झाले नाही.दोन्ही वाहनाने पेट घेतल्यामुळे कोणालाही मदत करणे शक्य झाले नाही त्यामुळे जवळपास दोन तास वाहतूक थांबली होती.भिगवण पोलिसांनी तातडीने घटना स्थळी भेट घेवून मदत कार्याला सुरवात केली.आग विझविण्यासाठी बिल्ट पेपर कारखान्याची एक आणि शेटफळ अग्रो कारखान्याच्या दोन अग्निशमन वाहने पाचारण करण्यात आली.अग्निशमन यंत्रणा पोलीस जवान आणि नागरिकांच्या मदतीने हि आग आटोक्यात आणली गेली.यावेळी वाहतूक पूर्णपणे थांबली होती.पोलिसांनी मदत करीत वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले.आगीमुळे ट्रॅकटर ड्रायव्हरचा जळून कोळसा झाल्याचे तर दोन्ही वाहनाचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे दिसून आले.

या अपघातामुळे उस वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला असून अजून किती नागरिकांचा जीव गेल्यावर कारखाना प्रशासन आणि परिवहन विभाग जागा होणार असा सवाल नागरिक करीत आहेत .तर अपघातात जीव गेल्यास याची जबाबदारी सबंधित कारखाना प्रशासनावर निश्चित झाल्यावर निष्पाप नागरिकांचे जीव वाचतील अशी मागणी नागरिक करीत आहेत.

…..उस वाहतूक करणारी ट्रॅकटर यंत्रणा धोकेदायक आणि अगदी बेफिकीर वागत असून या मार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेवून रस्त्यावर यावे लागत असल्याचे तसेच कारखाना प्रशासन आणि परिवहन विभागाने तातडीने लक्ष देवून ट्रॅकटर चालकांना योग्य प्रशिक्षण देण्याची मागणी नागरिक प्रामुख्याने करीत आहेत.दारू पिवून वाहने चालविणे ,परवाना नसणे ,कर्णकर्कश आवाजात गाणी लावणे ,प्रमाणापेक्षा जास्तीचा लोड वाहने ,मदनवाडी घाटात भरलेली वाहने यांची लागलेली शर्यत सर्वसामान्य नागरिकांना दिसते मात्र कारखाना प्रशांसन आणि परिवहन विभागाला दिसत नाही का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here