भिगवण ग्रामीण रुग्णालयाला उपसंचालक डॉ. भगवान पवार यांची सरप्राईज व्हिजिट ; परिमंडळस्तरीय पथकाने घेतली कामकाज माहिती.

0
326

भिगवण वार्ताहर .दि.२९

भिगवण ग्रामीण रुग्णालयाला परिमंडळस्तरीय पथकाने अचानक सरप्राईज भेट दिली. आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ.भगवान पवार यांच्या सोबत वैदकीय अधिकारी पुणे डॉ.अभिराज सूर्यवंशी,डॉ.आनंद साबणे स्त्रीरोग तद्न्य भोर ,गणेश औटी कार्यालयीन अधीक्षक ,गणेश जगताप परिमंडळ कार्यक्रम व्यवस्थापक ,धनाजी कोलगे मूल्य व सनियंत्रक अधिकारी ,सागर शेळके फॅसिलीटी मॅनेजर पुणे या पथकाने अचानक भेट दिली .

भिगवण ट्रोमा केअर सेंटर ‘कोमात’ आणि ग्रामीण रुग्णालयही आजारी असा मथळा असणाऱ्या बातम्या काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या या अनुषंगाने उपसंचालक डॉ. भगवान पवार यांनी रुग्णालयाला दिली असावी .यावेळी डॉ .पवार आणि सोबत आलेल्या पथकाने रुग्णालयाच्या प्रत्येक विभागाची पाहणी करीत कामकाजाची माहिती घेतली.तसेच या रुग्णालयात असणाऱ्या अस्वच्छतेबाबत पथकाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त करीत कर्मचारी यांना सूचना केल्या.या भेटी दरम्यान भिगवण ग्रामीण रुग्णालयात १ स्त्रीरोग तद्न्य ,२ वैदकीय अधिकारी ,सहाय्यक अधीक्षक ,कनिष्ठ लिपिक इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते .

यावेळी पथकाला काही त्रुटी आढळून आल्या यात कंत्राटी पद्धतीने ९ कर्मचारी कार्यरत असताना रुग्णालयातील विविध कक्ष आणि उपकरणावर अत्यंत अस्वच्छता आढळून आली.रुग्णालयात अपेक्षेप्रमाणे प्रसूती होत नसल्याचे आढळून आले.मार्गदर्शक सूचनानुसार ओपीडीची वेळ ,वैदकीय अधिकारी यांचे नावे व उपलब्धता तसेच विविध कार्यक्रमाचे जनजागृती साहित्य दर्शनी भागात लावल्याचे दिसून आले नाही.कंत्राटी पद्धतीच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ व सहायक कार्यरत असताना अपेक्षित चाचण्या होत नसल्याचे तसेच पुरुषकक्ष व महिला कक्षामध्ये मार्गदर्शक सूचनानुसार खाटांचे बेडशीट बदलण्यात येत नसल्याचे आढळून आले.

याची गंभीर दखल उपसंचालक डॉ.पवार यांनी पुढील काळात रुग्णसेवेत मार्गदर्शक सूचनानुसार आवश्यक सुधारणा न झाल्यास कारवाई करण्याचे संकेत दिले .तसेच रुग्ण त्यांचे नातेवाईक ,नागरिक आणि पत्रकार यांच्याशी समन्वय ठेवून रुग्णालयातील सेवा सुविधांची जास्तीत जास्त जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here