शिव फाउंडेशनने फुलविले जिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू ; भिगवण स्टेशनच्या 200 विद्यार्थ्यांना पाण्याची बॉटल आणि खाऊ वाटप

0
190

भिगवण वार्ताहर. दि. 29

आपले समाजाविषयी काही देणे लागते, या उदात्त भावनेने समाजातील उपेक्षित घटक, वनवासी यांना यथाशक्ती मदत करण्याची मनात खूणगाठ बांधून शिव फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संपत बंडगर यांनी जिल्हा परिषद पुणे यांच्या एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भिगवन स्टेशन येथे विद्यार्थ्यांना सुमारे 200 वॉटर बॅग व खाऊचे वाटप करून लहानग्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले.

शिव फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात.याच अनुषंगाने भिगवन स्टेशन येथील शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची बॉटल आवश्यकता आहे याची जाणीव फाउंडेशन च्या काही सदस्यांच्या लक्षात आली. याबाबत फाउंडेशन चे संस्थापक संपत बंडगर यांच्याकडे माहिती देण्यात आली लागलीच सदस्यांची मागणी आणि विद्यार्थ्यांची गरज याला तातडीने प्राधान्य देत 200 बॉटल खरेदी करण्यात आल्या. मात्र फक्त बॉटल देण्या ऐवजी त्याच सोबत खाऊ दिला तर आणखीन लहानग्याना आप्रूप वाटेल म्हणून बॉटल सोबत खाऊ चे वितरण यावेळी करण्यात आल्याची माहिती शिव फॉउंडेशन चे अध्यक्ष संपतरावं बंडगर यांनी बोलताना दिली ,तर गरजू विद्यार्थ्यांना भविष्यात देखील शिव फॉउंडेशन च्या माध्यमातून इतर आवश्यक गोष्टी देऊ असे आश्वासन देखील यावेळी दिले.

यावेळी कार्यक्रम प्रसंगी भिगवण ग्रामपंचायत सदस्य कपिल भाकरे,रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष संजय खाडे,दिनेश मारणे,किरण रायसोनी,अरविंद देवकाते, संतोष आब्बड,आकाश वनवे, निलेश गायकवाड तसेच दीपक गुणवरे- अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शाळा भिगवण स्टेशन, महेंद्र मदने, पुनम शेळके, हसीना बारसकर, कोमल मराळे – सदस्य शाळा व्यवस्थापन समिती भिगवन स्टेशन प्रास्ताविक -मुख्याध्यापक भारत गायकवाड उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ वनवे तर आभार राहुल लंबाते यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here