भिगवण सत्यवार्ता न्यूज नेटवर्क.
इंदापूर तालुक्यातील म्हसोबाची वाडी या ठिकाणी शेतातील विहिरीचे संरक्षण कठड्याचे काम सुरु असताना त्यातील काही भाग कोसळून त्या खाली काम करणारे 4 मजूर गाडले गेल्याची घटना घडली. गाडले गेलेले चारही मजूर बेलवाडी गावाचे असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.या ठिकाणी एन डी आर एफ पथक आले असून ढासळलेला भाग पोकलंड मशीनाच्या सहायाने काढून मजुरांचा शोध घेतला जात आहे.
गाडले गेलेल्या चारही कामगारां च्या नावाची खात्री केली जात आहे.अतिशय गंभीर प्रकरण असल्यामुळे या ठिकाणी एन डी आर एफ च्या पथकाला बोलाविण्यात आले असून पथकाने तातडीने मलबा हटाविण्याचे काम सुरु केले आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार म्हसोबाची वाडी येथील विजय क्षीरसागर यांच्या शेतात नव्याने बांधण्यात येत असलेल्या विहिरीची रिंग चे काम सुरु असताना सदर प्रकार घडला आहे. रिंगचे काम करणारे कामगार रात्री उशिरा पर्यंत घरी न आल्याने घरच्या नातेवाईकांनि शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला.
घटनास्थळी माजी मंत्री आणी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मध्यरात्री भेट देत प्रशासनाला शोध कार्यासाठी सूचना करित मदत केली.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग, पुणे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती बारामती विभाग पुणे ग्रामीण, श्रीकांत पाटील तहसीलदार इंदापूर हे हजर आहेत.
घटनास्थळी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.घटनास्थळी लाईट ची व्यवस्था करण्यात आली आहे. पोकलेन मशीन लावून विहिरीचे डासाळलेला मुरूम काढण्याचे काम चालू आहे. मुरूम काढून कामगार बाहेर काढण्याचे काम चालू आहे.