तक्रारवाडी गावाचे सरपंच पद गेल्या दीड महिन्यापासून रिक्त असताना उपसरपंच यांना सहीचा अधिकार का नाही ? कोण उप सरपंच यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवत आहे.

0
563

सरपंच पद रिक्त असेल तर उप सरपंच यांना सहीचा आणी कार्यभार सांभाळण्याचा अधिकार .

महिला उपसरपंच असल्यामुळे अधिकार डावलला जात आहे का ?

कोणाच्या राजकीय दबावा पोटी दिला जात नाही सहीचा अधिकार ? नागरिकांत चर्चा

भिगवण वार्ताहर.दि.२१

तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश विनायक वाघ यांनी पदाचा राजीनामा देवून दीड महिना उलटूनही विद्यमान उपसरपंच यांना सहीचा अधिकार दिला नसल्यामुळे कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली.तर सत्ताधारी पार्टीचे विद्यमान उपसरपंच असतानाही कदाचित विश्वास नसल्यामुळे सहीचा अधिकार दिला गेला नाही काय ? अशी कुजबुज गावातील नागरिक करीत आहेत.

तक्रारवाडी गावच्या विद्यमान सरपंच वाघ यांनी दिलेल्या शब्दाचे पालन करीत आपल्या सहकारी सदस्याला पदभार मिळावा म्हणून ठरलेल्या वेळात राजीनामा सादर केला. शासनाच्या ठरलेल्या पद्धतीने तो गटविकास अधिकारी यांनी छाननी करून ग्रामपंचायत सदस्याकडे पडताळणीसाठी योग्य वेळेत पाठविला.पडताळणी होवून माननीय जिल्हा अधिकारी यांच्याकडे जावून तो मंजूर होवून प्रोग्राम लागणार आहे.या सर्व बाबी पार पाडण्यासाठी जवळपास दीड महिना कालावधी लोटला आहे.या काळात ग्रामपंचायत विभागाचे कर्मचारी यांचा पगार दिवाबत्ती तसेच आवश्यक पत्रव्यवहार पाहण्यासाठी उपसरपंच यांना सहीचा अधिकार मिळणे क्रमप्राप्त होते.मात्र सहीचा अधिकार मिळाला नसल्यामुळे सर्व कामाचा खेळ खंडोबा होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांकडून केला जात आहे.तर उपसरपंच आपल्याच विचाराचा असताना सहीचा अधिकार विश्वास नसल्यामुळे दिला जात नाही काय असा संशय एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर वृत्तवाहिनी प्रतिनिधीकडे व्यक्त केला.

तक्रारवाडी गावासाठी ‘ हर घर नल हर घर जल ’ योजने अंतर्गत जवळपास १ कोटी ५० लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे.हि योजना विद्यमान सरपंच सतीश वाघ यांच्या कार्यकाळात सुरु होणे अपेक्षित होते.मात्र सरपंच वाघ यांचा राजीनामा झाल्यावर या कामाला प्रत्यक्षात सुरवात करण्यात आली. त्यामुळे उपसरपंच यांना सरपंच यांच्या अनुपस्थितीत कामकाज करण्याचा आणि सहीचा अधिकार असणे गरजेचे होते.मात्र राजकीयदृष्ट्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता ग्राह्य धरून अधिकार देण्यात आला नाही काय असा सवाल उपस्थित होत आहे.

याबाबत ग्रामसेवक दीपक बोरावके यांच्याशी संपर्क साधला ग्रामपंचायत कारभार व्यवस्थितपणे चालू असून उपसरपंच सहीचा अधिकार विषयी सदस्यांची मिटिंग बोलावली आहे.या बैठकीत सहीचा अधिकार उपसरपंच यांना देण्यात येण्याविषयी ठराव घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here