भिगवण वार्ताहर .दि. १२
भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर रात्रीच्या वेळेस अडवून लुटमार करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात भिगवण पोलिसांना यश आले.९२ हजार रुपयाच्या मुद्देमालासह दोन आरोपींना अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी दिली.
शुभम प्रकाश जाधव वय २१ , वैभव व्यंकट संगुळे वय २१ रा.काळेगाव ता.अहमदपूर लातूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. २६ /०५ /२०२२ रोजी डाळज गावाच्या हद्दीत रात्री ३ वाजण्याच्या सुमारास एका प्रवाशाला अडवून त्याला मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि ४० हजार रुपयाची रोख रक्कम लुटण्यात आली होती.याबाबत फिर्यादीने तक्रार दाखल केली होती.तर ३१ तारखेला भिगवण बाजारपेठेतील सराफ व्यावसायिकाची दुचाकी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पळवून नेली होती.यावेळी दोन चोरटे सी सी टी व्ही मध्ये दिसून आले होते.भिगवण पोलिसांनी या दोनही चोरीच्या घटनाचा तपास करीत तांत्रिक विश्लेषणाचा वापर करीत आरोपींचा शोध सुरु केला होता.याच अनुश्न्घाने तपास करीत असता लातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने लातूर पोलिसांशी संयुक्त रित्या तपास करीत संशयित आरोपींना ताब्यात घेतले.यावेळी आरोपी कडून दोन दुचाकी सह मोबाईल आणि रोख रक्कम असा ९२ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ .अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार ,पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम ,विनायक दडसपाटील ,पोलीस अंमलदार विजय लोडी ,सचिन पवार ,अंकुश माने ,महेश उगले ,हसीम मुलानी या पोलीस पथकाने केली.