शाळेत मारलेल्या झापडीचा बदला घेण्यासाठी खुनाचा प्रयत्न ; भाईगिरी साठी सरसावली तरुण पिढी

0
2274

भिगवण वार्ताहर.दि.१४

पाच वर्षापूर्वी शाळेतील भांडणात गालावर मारलेल्या झापडीचा बदला घेण्यासाठी एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची कबुली अटक करण्यात आलेल्या हल्लेखोर तरुणाने दिली.तर एका झापडीसाठी एखाद्या मृत्युच्या दारात पोहोचविन्यामागे गुंडगिरीची मानसिकता असल्याचे दिसून येते.

अगदी सिनेमात दाखविला जातो असाच सीन भिगवण मधील दोन दिवसापूर्वी झालेल्या हल्ल्यात वापरला गेला.अकरावीच्या वर्गात शिकत असताना मित्रासाठी केलेल भांडण हल्ल्याचे कारण असल्याचे समोर आले आहे.याबाबत भिगवण पोलिसांनी जयपाल रसिक पाटील रा.कात्रज ता.करमाळा ,विक्रम बाळासो माडगे ,रवींद्र उर्फ राजू भगवान बदर दोघे रा.भिगवण ,विशाल घोलप रा.बोरीबेल ता.दौंड यांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करीत यातील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार शनिवारी तक्रारवाडी गावच्या वैष्णव अनपट या तरुणावर या चार आरोपींनी लोखंडी रॉड ,लाकडी बॅट ने जीवघेणा हल्ला केला होता.या हल्ल्यात वैष्णवला डोक्याला आणि छातीवर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक झाली होती.पोलिसांनी तातडीने आरोपींचा शोध लावीत मुख्य आरोपी असणाऱ्या जयपाल पाटील याच्या मुसक्या आवळल्या होत्या.अजूनही दोन आरोपींचा शोध पोलीस घेत असून याचा तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.

भिगवण गावाची शहरी करनाकडे वाटचाल सुरु झाल्याने या परिसरात भाईगिरी करण्याच्या प्रकारालाही वाढ झाली आहे.दोन चार गुन्हे नावावर दाखल झाल्याशिवाय आपली ओळख होणार नाही अशी मानसिकता तरुणांत वाढ होताना दिसून येते.तर नाव झाल्यावर वाळू तस्करी पासून मांडवली करण्याच्या प्रकरणात पैसा कमविता असा समज करून घेतला जात आहे.

भिगवण पोलिसांनी अशा गुंडगिरी चा लागलीच बिमोड करणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे .कारण अशी भाईगिरी वाढू लागली तर सर्वसामान्यांना याचा त्रास होतो आणि सामाजिक वातावरणात दूषितपणा निर्माण होतो तो शांत आणि संयमी भिगवण साठी योग्य न ठरणारा आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here