भिगवण पोलीसांची धाडसी कारवाई ; मदनवाडी ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने आरोपी गजाआड

0
1086

भिगवण वार्ताहर.दि.१९

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतीपंपाची तसेच मंदिरातील दानपेटीची चोरी करणारे दोन चोरटे मदन वाडी ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने पकडण्यात भिगवण पोलिसांना यश आले.गेल्या बऱ्याच दिवसापासून शेती पंपाची चोरी होत असल्यामुळे या आरोपीकडून अनेक गुन्हे उकल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी दिलेल्या प्रेसनोट नुसार १७ तारखेच्या रात्री ८ वाजता डाळज आणि भादलवाडी तलावातील शेती पंपाच्या मोटारीतून तांबे चोरून नेल्याची तक्रार देण्यात आली होती.तक्रारीच्या आधारे पोलीस पथकाची नियुक्ती करीत तातडीने तपास केला असता पोलिसांना तसेच मदन वाडी ग्रामसुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना सोलापूर महामार्गावर एक संशयित आढळून आला. मात्र या आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता ग्रामसुरकशा दलाच्या कार्यकर्त्यानी पाठलाग करून पोलिसांच्या ताब्यात देत झडती घेतली असता पोत्याच्या पिशवीत वजनदार वस्तू असल्याचे आढळून आले.पिशवी उघडून पाहिले असता मोटारीत वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या तारा आणि मंदिरातील दानपेटी आढळून आली. सदर दानपेटी हि पुणे सोलापूर मार्गावरील सकुंडे वस्ती वरील महादेव मंदिरातून चोरी झाल्याची तक्रार दाखल होती. तक्रार दाखल होताच तातडीने तपास केल्यामुळे तसेच ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीमुळे काही वेळातच आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश मिळाले.पकडलेल्या आरोपी राजेंद्र तुकाराम मोटे वय २४ रा.मेखळी असे आरोपीचे नाव असून त्याच्या सोबत विधी संघर्ष ग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी सदरचे आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून नातेपुते ,फलटण ,बारामती या भागात गुन्हे केल्याची माहिती देत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,विभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनायक दडसपाटील ,पोलीस अंमलदार समीर करे ,विजय लोडी, अंतुल पठाण ,नाना वीर ,सचिन पवार ,महेश उगले ,अंकुश माने ,आण्णा भांडवलकर मदनवाडी ग्राम सुरक्षा दलाचे कार्यकर्ते पोलीस मित्र अशोक सोळके रवी देवकाते यांनी केली
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here