भिगवण वार्ता .दि.३०
भिगवण पोलीस ठाण्यात वाहन चालक असणाऱ्या शेख मामुचा सेवानिवृती सोहळा मोठ्या दिमाखात आणि पुष्पवृष्टी करीत साजरा करण्यात आला.अगदीसर्वसामान्य नागरीका पासून ज्यांचे सारथ्य म्हणून काम केले अशा वरिष्ठ अधिकार्याने सलामी देत हा सेंड ऑफ चा कार्यक्रम पार पडल्याने पोलिसांत सुद्धा माणुसकी खचून भरलेली असल्याची जाण दिसून आली.

सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने सेवानिवृत्त ए एस आई शेख यांचा सपत्नीक सन्मान करीत असताना
सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने सेवानिवृत्त ए एस आई शेख यांचा सपत्नीक सन्मान करीत असताना


भिगवण पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या महमदअली याशिन भाई शेख यांचा भिगवण पोलीस ठाण्यातील आजचा शेवटचा दिवस .गेली ३८ वर्ष विना अपघात गाडी चालवीत आपल्या बरोबरच आपल्या सोबत असणाऱ्या वरिष्ठ अधिकारी यांच्या जीवाची काळजी घेत त्यांनी पोलीस गाडी चालवली.शेख मामू या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या पोलिसाचा आज सेंड ऑफ म्हणजे निरोप समारंभ ,त्यांचे सहकारी आणि भिगवण पोलिसांनी हा निरोप समारंभ मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा केला.

शेख दाम्पत्यावर पुष्पवृष्टी करताना त्यांचे सहकारी अधिकारी
शेख दाम्पत्यावर पुष्पवृष्टी करताना त्यांचे सहकारी अधिकारी

डोक्यावर ऐटबाज फेटा बांधून शेख या दाम्पत्यावर दोन्ही बाजूने पोलीस पुष्पाची बरसात करीत होते.तर ज्या सारथ्याने आपले सारथ्य केले या साठी स्वतः प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी गाडीचा दरवाजा उघडून बसण्याची विनंती केली.अगदी भावपूर्ण आणि डोळ्यात पाणी आणतील अशा पद्धतीने निरोप समारंभ करण्यात आला.

यावेळी पोलिसांत सुद्धा माणुसकी आणि जिव्हाळा किती भरलेला असतो याची जाणीव उपस्थित नागरिकांना झाली.यावेळी पोलीस हवालदार वीर नाना ,संजय काळभोर ,विलास मोरे ,रमेश भोसले,केशव चौधर ,रतीलाल चौधर ,केशव जगताप, महिला पोलीस शिपाई भारती खंडागळे यांनी आपल्या सहकारी सोबत्याला पुढील जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here