भिगवण वार्ता .१९
बारामती आणि इंदापूर तालुक्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बारामती आणि इंदापूर शहरांपाठोपाठ ग्रामीण भागात ही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे.
पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समिती यांच्यावतीने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण शेटफळगडे जिल्हा परिषद गटांमधील भिगवणमध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यास आज (दि.१९) पासून सुरुवात करण्यात आली आहे.
आज (दि.१९) भिगवण येथे ३६ पथकांद्वारे आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आरोग्य सेविका यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ऑक्सीमीटर, पल्समीटर व थर्मामीटर च्या साह्याने नागरिकांची आरोग्य तपासणी करायला सुरुवात केली आहे. जे नागरिक तपासणीवेळी ज्या- ज्या नागरिकांना कोरोनाची लक्षणे आढळून येतील, त्या नागरिकांची स्वॅब टेस्टिंग करण्यात येणार आहे.
कोरोना रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या आणि ज्यांना आपली टेस्ट करून घ्यावी वाटते अशाची अँटी जेन टेस्ट भैरवनाथ हायस्कुल भिगवण येथे सुरवात करण्यात आली आहे. जेणेकरून भविष्यात वाढणार धोका टळेल व कोरोणा नियंत्रणात येण्यास मदत होईल.
यावेळी तहसीलदार सोनाली मेटकरी ,जि.प सदस्य हनुमंत बंडगर, सरपंच प्रतिनिधी संतोष धवडे , सचिन बोगावत, अजिंक्य माडगे, मनोज राक्षे, गाव कामगार तलाठी गाडेकर,आरोग्य अधिकारी दिलीप जगताप , डॉ. मृदुला जगताप ,आरोग्य सेवक झगडे आदी उपस्थित होते