भिगवण वार्ताहर.दि.१०
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर शासनाने ग्रामपंचायतीला विना मास्क आणि दुचाकीवर सोबत असणाऱ्या व्यक्तीसाठी २०० रुपयाचा दंड वसूल करण्यासाठी परवानगी दिली होती.
या दंडातून भिगवण आणि परिसरातील ग्रामपंचायत कडे लाखो रुपयाचा दंड वसूल करण्यात आला हि रक्कम ग्रामपंचायत खात्यावर पडून असून या निधीचा वापर भिगवण येथील कोरोना सेंटर वर केला जावा अशी मागणी इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
भिगवण कोरोना सेंटर मध्ये भिगवण रोटरी क्लब तसेच दत्तकाला स्कूल आणि भिगवण ग्रामपंचायत सदस्य तुषार क्षीरसागर यांच्या माध्यमातून बेड आणि गाद्याची व्यवस्था करण्यात आली आहे.तर रोजच्या खर्चाची जबाबदारी महसूल विभाग आणि भिगवण ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे.
तरीही अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाहीत.त्यामुळे नागरिकांकडून विना मास्क साठी केलेला दंडाची रक्कम भिगवण कोविड सेंटर साठी वापरण्यात यावा अशी मागणी देहाडे यांनी केली आहे.तसेच भिगवण कोविड सेंटर मध्ये आयसी यु बेडची संख्या वाढविण्यात यावी आणि अम्बुलंस सेवा उपलब्ध करावी अशी मागणी केली आहे.
भिगवण कोविड सेन्टरमध्ये उपचार घेण्यासाठी डिकसळ ,कुंभारगाव ,अकोले ,पोंधवडी ,तक्रारवाडी ,पिंपळे मदनवाडी ,मसोबावाडी ,शेटफळ येथील रुग्ण येत असतात तर या ग्रामपंचायती कडे लाखो रुपयाचा खात्यावर पडून आहे.
तर १५ वा वित्त आयोगातील रक्कम हि ग्रामपंचायत खात्यावर वर्ग करण्याची तयारी शासनाकडून चालू आहे.त्यामुळे कोरोना काळात जमा झालेली दंडाची रक्कम कोरोना सेंटर वर वापरण्यात यावा अशी मागणी देहाडे यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे केली आहे.