Thursday, April 9, 2026

जुगार अड्ड्यावर छापा घालीत राजकीय पक्षाच्या अध्यक्ष आणि नामंकित वस्तादासह २६ जुगाऱ्या वर कारवाई ; भिगवण पोलिसांची सिंघम कारवाई .

रिमझिम पडणाऱ्या पावसात पोलिसांनी केली सिनेमा स्टाईल एंट्री... ६ तालुक्यातील २६ व्हाईट कॉलर खेळाडू सह शासकीय नोकर आणि गाव पुढारी जागेवरच पकडले.. भिगवण वार्ताहर.दि.१३ भिगवण वार्ताहर.दि.१३ भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत निंबोडी रस्त्यावरील जुगार अड्यावर भिगवण पोलिसांनी छापा मारीत एका राजकीय पक्षाच्या अध्यक्षासह २६ जुगारी नागरिकांना...

उजनी धरणातील पाणी प्रश्न पेटला ;इंदापूर तालुक्यातील २२ गावातील शेतकरी पाण्यासाठी रस्त्यावर

आंदोलन चिघळण्याची शक्यता . सोलापूर लोकप्रतिनिधींना जिल्हा बंदी केली जाणार असल्याचे आंदोलकांचा इशारा भिगवण वार्ताहर. दि.२१ इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी पुणे व पिंपरी- चिंचवड शहरातील उजनी जलाशयामध्ये येणारे ५ टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुका साठी देण्याचे मंजूर करण्यात आले होते . सोलापूर भागातील लोक प्रतिनिधी यांनी घातलेल्या खोड्या मुळे जयंत पाटील यांनी...

इंदापूर तालुक्याचा कारभार प्रभारी ; नगरपालिका मुख्याधिकारी ,तहसीलदार तसेच तालुका आरोग्य अधिकारी ही महत्वाची पदे प्रभारी

तातडीने सक्षम अधिकारी यांची नियुक्ती करण्याची राज्य ग्राहक संघटना सदस्य तुषार झेंडे पाटील यांची महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे मागणी भिगवण वार्ताहर.दि.१३ कोरोना सारख्या महाभयंकर आपत्तीच्या काळात इंदापूर तालुक्याचा कारभार प्रभारी असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन करताना अनेक अडचणी निर्माण होत असून सक्षम अधिकाऱ्यांच्या तातडीने नियुक्त्या करण्याची मागणी राज्य ग्राहक संघटनेचे...

भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रात लसी करणासाठी नागरिकांची गर्दी ; आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती

आरोग्य कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याने नागरिकांची मोठी गर्दी..सोशल डीस्टनसिंगचा फज्जा ....गर्दी मुळे जेष्ठ नागरिकांत कोरो ना संसर्ग पसरण्याची भीती... माहिती देण्यासाठी फोन करणाऱ्या पत्रकारांना जबाबदार अधिकारी गट विकास अधिकारी यांची उर्मट उत्तरे.. भिगवण वार्ताहर. ५ भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षापुढील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्यामुळे सोशल केल्यामुळे...

दिलेला शब्द पाळला ; भिगवणकरांसाठी नवीन पाईप लाईन

जुने भिगवण पासून मंगलदृष्टी पर्यंत नवीन पाईप लाईन.. वार्ड २ ,३ आणि ४ या वार्डचया नागरिकांना होणार फायदा पाणी प्रश्न काही अंशी सुटण्यास होणार मदत... भिगवण वार्ताहर . दि.२ भिगवणकरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जुने भिगवण गाव ते मंगलदृष्टी इथपर्यंतची पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले...

छत्रपती साखर कारखान्याचे संचालक अनिल बागल यांच्यावर जीवघेणा हल्ला ; कोयताने केलेल्या हल्ल्यात बागल गंभीर जखमी

बिग ब्रेकिंग न्यूज ......भिगवण वार्ताहर.दि.१ छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि पिंपळे गावचे माजी सरपंच अनिल बागल यांच्या वर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. कोयत्याने केलेल्या हल्ल्यात बागल यांच्या डोक्यावर छातीवर आणि हाताच्या बोटावर सपासप वार करण्यात आल्याची माहिती.४ ते ६ अज्ञात हल्लेखोरांनी हा हल्ला केला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पूर्ववैमनस्य...

४५ वर्षाच्या वरील ८० टक्के नागरिकांचे लसीकरण ;तक्रारवाडी उपकेंद्रातील यशस्वी लसीकरण मोहीम

भिगवण वार्ताहर.दि.३० भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या तक्रारवाडी उपकेंद्रात ४५ वर्षाच्या पुढील २३३३ नागरिकांपैकी १८४८ नागरिकांचे लसीकरण पहिल्या टप्प्यात झाल्याचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप यांनी सांगितले.तर १५० च्या आसपास नागरिकांना दुसरा डोस हि देण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तक्रारवाडी उपकेंद्रात मदनवाडी आणि पोंधवडी अशी तीन गावे येतात.यात ४५ वर्षाच्या...

तहसीलदार पोलीस अधिकारी पथकाची भिगवण खासगी कोवीड सेंटरला भेट; भेट देत रुग्णाच्या सुविधा बाबत घेतली माहिती

भिगवण वार्ताहर . दि.२४ इंदापूर तालुक्यामध्ये सध्या कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले असून, अनेक रुग्ण हे खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या खाजगी हॉस्पिटल कडून रुग्णांची जादा बिले आकारली जाऊ नयेत व ज्या प्रमाणात मोबदला घेतला जातो त्याच प्रमाणात सोयी दिल्या जातात का नाही हे पाहण्यासाठी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे व भिगवण पोलीस स्टेशनचे...

राज्यमंत्री भरणे यांनी दिलेला शब्द पाळला ; कोवीड सेंटर मध्ये ऑक्सिजन बेड ची केली सोय

भिगवण वार्ताहर . दि.२१ भिगवण व परिसरातील कोरोना रुग्नांची वाढती गरज विचारात घेऊन भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटर इमारतीमध्ये सुरु असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १० बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर सुरु करण्यात आले आहे. ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटरचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते करण्यात...

कोवीड आढावा बैठकीला मंडल अधिकारी अनुपस्थित ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नाराजी

भिगवण वार्ताहर.दि.१८ इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोना आजाराच्या आढावा घेण्यासाठी भिगवण कोविड सेंटर येथे आयोजित केलेल्या बैठकीसाठी भिगवण मंडल अधिकारी अनुपस्थित दिसून आल्याने राज्यमंत्री भरणे यांचा पारा चढल्याचे दिसून आले.शांत आणि संयमी नेत्याचे हे रौद्र रूप पाहून बारामती विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सबंधित मंडलअधिकारी यांच्या अनुपस्थितितीची दखल घेतली जाईल असा शब्द दिल्याने वातावरण निवळण्यास...