भिगवण गावच्या विद्यमान महिला सदस्या तसलीम शेख यांची आत्महत्या नसून खूनच ; जन्मदात्रीचा गळा आवळणारा मुलगा पोलिसांच्या ताब्यात.
अभ्यास करताना मोबाईल पाहिल्या मुळे आईने गालावर चापट मारली म्हणून गळा आवळल्याची कबुली
जन्मदात्रीचा जीव घेऊन आत्महत्येचा बनाव पडला उघड .आई आणी मुलाच्या नात्याला कलंक......
भिगवण वार्ताहर.दि.१७
भिगवण गावच्या ग्रामपंचायत...
तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेतील १७ विद्यार्थी शिष्यवृती परीक्षेत उत्तीर्ण
भिगवण वार्ताहर.दि.१०
तक्रारवाडी येथील पुणे जिल्हा प्राथमिक शाळेतील १७ विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक राजेश नाचण यांनी दिली.इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळात तक्रारवाडी या एकमेव शाळेने हे घवघवीत यश संपादन केले आहे.
आजकाल खासगी शाळाकडे कल असणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारी हि गोष्ट...
भिगवण येथील एकात्मिक बालविकास केंद्र इंदापूरला स्थलांतर करण्यास पालक आणि अंगणवाडी सेविकांचा विरोध ; आंदोलन करत कार्यालयाला ठोकले टाळे
भिगवण वार्ताहर.दि.२१
भिगवण येथील एकात्मिक बालविकास सेवा केंद्राचे कार्यालय इंदापूर येथे स्थलांतरित करण्याला पालक आणि अंगणवाडी सेविकांनी विरोध करीत आंदोलन केले.तर भिगवण साठी मंजुरी असताना इंदापूर येथे स्थलांतर करण्याचा आदेश कार्यकारी अधिकारी यांनी दिलाच कसा असा सवाल येथे उपस्थित असणाऱ्या महिलांनी केला.
एकात्मिक बालविकास सेवा केंद्राचा मुख्य उद्देश प्रकल्पातील सर्व लाभधारकांना...
भिगवणमध्ये दुकानचा पत्रा कापून किराणा मालाची चोरी ;
भिगवण वार्ताहर.दि.२४
किराणा मालाच्या दुकानाचा पाठीमागे असणारा पत्रा कापून ५८ हजार ४८० रुपयाचा किराणा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना भिगवण येथे घडली.तर पाठीमागे याच दुकानदाराला ५० हजार रुपयाचा चुना लावून भामट्याने किराणा नेला त्याचाच तपास लागला नसतानाच हि घरफोडी घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत अजिनाथ वसंत कवितके या...
रस्त्याच्या विकासकामांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी ; आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर वातावरण अजून तापणार .
भिगवण वार्ताहर.दि. १९
भिगवण येथे १५ व्या वित्त आयोगातील मंजूर रस्त्याच्या कामावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बरीच हमरीतुमरी झाल्याची घटना घडली.तर यावेळी विरोधकांनी विकासकामे अडवून सदस्यांना शिवीगाळ केल्याची माहिती सत्ताधारी पार्टीच्या सदस्य प्रतिनिधी तुषार क्षीरसागर यांनी दिली .तर स्थानिक नागरिकाच्या मागणीनुसार रुंदी वाढविण्याची मागणी केली यात वादविवाद करण्याचे कारणच नसल्याचे राष्ट्रवादीचे सचिन बोगावत यांनी...
विहिरीच्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या घराला तडे ; पोंधवडी गावातील प्रकार
भिगवण वार्ताहर.दि.१३
पोंधवडी ग्रामपंचायत माध्यमातून खोदण्यात येणाऱ्या विहिरीच्या ब्लास्टिंग मुळे नागरिकांच्या घराला तडे जात असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.तर गावाला लागुनच होत असलेल्या विहिरीवर कोणतीही सुरक्षित उपाय योजना केल्या जात नसल्याचे बोलले जात आहे.
पोंधवडी गावातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा जलजीवन मिशन अंतर्गत...
पुणे सोलापूर महामार्गावर स्वच्छता करणाऱ्या महिलेचा अपघात ;उपचार खर्च देण्यास हायवे प्रशासन तसेच कंत्राटदार यांची टाळाटाळ
भिगवण वार्ताहर.दि.१०
पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण परिसरात सकुंडेवस्ती येथे मेंटेनन्सच्या कंत्राटी कामात असणाऱ्या महिलेचा अज्ञात दुचाकीस्वार धडकून झालेल्या अपघातात हि महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.मात्र अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेची जबाबदारी हायवे प्रशासन आणि सबंधित कंत्राटदार घेताना दिसून येत नसल्यामुळे दवाखान्याचा खर्च भागवायचा कसा असा सवाल कुटुंबापुढे निर्माण झालेला आहे.
पोलिस पाटील यांच्याविरोधात ठराव घेणं पडल महागात ; तत्कालीन सरपंचासह तिघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी गावातील प्रकार ; सरपंच पदाचा गैरवापर करत घेतला होता ग्रामसभेत ठराव .
भिगवण वार्ताहर.दि.२७
भादलवाडी गावच्या महिला पोलीस पाटील तनुजा कुताळ यांच्या विरोधात गर्दी जमवून त्यांचे पद रद्द करण्याची मागणी करणाऱ्या तत्कालीन सरपंच राणी कन्हेरकर आणि इतर दोघांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे पदाचा...
अपघाताचा बनाव फसला अन् पचलेला खुनाचे गूढ उकललं ; भिगवण पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाची दमदार कामगिरी
भिगवण वार्ताहर.दि.२
शेतातील ट्रोलीच्या लोखंडी प्लेट चोरल्याच्या संशयातून अनोळखी इसमास लोखंडी टौमीने तोंडावर कपाळावर मारहाण करीत त्याचा खून करीत पुणे सोलापूर महामार्गावरील पोंधवडी गावच्या हद्दीत अपघात झाल्याचा बनाव करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या भिगवण पोलिसांनी आवळल्या. भिगवण पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या कौतुकास्पद कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याबाबत...
भिगवण स्टेशन येथील क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात अकरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल ;
भिगवण वार्ताहर.दि.१९
भिगवण रेल्वे स्टेशन येथे क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या भांडणात परस्परविरोधी तक्रारी भिगवण पोलीस स्टेशन येथे करण्यात आल्या .यात एका गटाच्या ५ जणांवर तर दुसऱ्या गटाच्या ६ असे ११ जणांवर एट्रासिटी मारामारी आणि दरोड्याच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तर क्रिकेट सारख्या शुल्लक...