Friday, July 4, 2025

इंदापूर

On each category you can set a Category template style, a Top post style (grids) and a module type for article listing. Also each top post style (grids) have 5 different look style. You can mix them to create a beautiful and unique category page.

अकोले पोटनिवडणूक पहिल्याच दिवशी पाच उमेदवारी अर्ज दाखल ; निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता

सत्यवार्ता अकोले प्रतिनिधी :विजय गायकवाडअकोले ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून आज अखेर पर्यंत पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गावातील प्रभाग दोन मधील एका रिक्त जागेसाठी निवडणूक होत असून आतापर्यंत पाच जणांनी शक्ती प्रदर्शन करीत इंदापूर येथे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी दीपक कोकरे व सहाय्यक निवडणूक अधिकरी शिवाजी खोसे यांच्याकडे...

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस महेश देवकातेपाटील यांना मातृशोक

भिगवण वार्ताहर.दि.२ राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अॅड. महेश मारुतराव देवकातेपाटील यांच्या मातोश्री कै.सौ सुप्रिया मारुतराव देवकाते यांचे वयाच्या ६५ वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.अतिशय प्रेमळ स्वभावाच्या सुप्रिया काकुच्या निधनामुळे भिगवण आणि परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि आपल्या बाणेदारवाणीने गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला कायद्याच्या प्रकरणी...

रोटरीच्या मदतीतून विरवाडी गावच्या दिव्यांग तरुणाला व्हीलचेअर ; भिगवण रोटरीचा स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि . २७रोटरी क्लब ऑफ भिगवन तसेच रोटरी क्लब ऑफ बिबेवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भिगवण येथील दिव्यांग युवक पप्पू जाधव यास व्हीलचेअर भेट देण्यात आली. यावेळी रोटरी अध्यक्ष संजय खाडे तसेच इतर रोटरीचे सदस्य उपस्थित होते . भिगवण विरवाडी येथील जाधव यास दिव्यांग असलेल्या कारणामुळे दैनंदिन जीवनामध्ये खुप अडचणीचा सामना करावा...

रेल्वे खाली उडी घेत दिला तरुण व्यावसायिकाने दिला जीव ; भिगवण येथील धक्कादायक बातमी

भिगवण वार्ताहर.दि.२७ भिगवण व्यापारी पेठेतील तरुण व्यावसायिकाने रेल्वेखाली उडी घेत जीव दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली.घरगुती वाद कि पैशाचे तणाव याचे कारण समजू शकले नाही मात्र या घटनेमुळे व्यापारी वर्गात दुखाचे सावट पसरले असल्याचे दिसून आले. याबाबत मिळालेल्या माहिती नुसार सुनील पांडुरंग कुचेकर वय २२ असे तरुण व्यावसायिकाचे नाव आहे.सुनील...

भिगवण पोलिसांची दबंग कारवाई ; ३५ किलो गांजासह आरोपीच्या आवळल्या मूसक्या

भिगवण वार्ताहर.दि.१८ भिगवण पोलिसांनी नाकाबंदी कारवाई दरम्यान ३५ किलो गांजा सह एका दुचाकीस्वार आरोपीच्या मुसक्या आवळल्या.या दमदार कारवाईत ६ लाख १६ हजार २८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी प्रेसनोट मध्ये देण्यात आलेल्या माहिती नुसार भिगवण...

माजी जिल्हा परिषद सदस्य विलास बंडगर यांचे अल्पशा आजाराने निधन

भिगवण वार्ताहर . दि .१३इंदापुर तालुक्यातील भिगवण-शेटफळगढे जिल्हा परिषद गटांचे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास श्रीरंग बंडगर(५४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या विलास बंडगर यांच्या निधनाची बातमी समजताच मदनवाडी व परिसरांवर शोककळा पसरली.माजी जिल्हा परिषद सदस्य विलास बंडगर यांचा १२ वर्षापुर्वी पुणे सोलापूर महामार्गावर कुरकुंभ गावच्या हद्दीत ...

मुस्लिम बांधवाना दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम ; भिगवण रोटरीचा बंधुभावाचा स्तुत्य उपक्रम

भिगवण वार्ताहर .दि .८ भिगवण येथील रोटरी क्लबने जामा मज्जिद येथे मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. यामध्ये हिंदू-मुस्लीम भाई -भाई हा ऐक्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.रमजान च्या पवित्र महिन्यात ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव आपल्या हिंदू बांधवांना शीरखुर्मा खाण्यासाठी बोलवत असतात.यातून बंधुभावाचा संदेश देण्यात...

मदनवाडी गावच्या उपसरपंच पदी सौ .संगीता सतीशराव बंडगर यांची बिनविरोध निवड

भिगवण वार्ताहर .दि.३ मदनवाडी ता.इंदापूर ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ .संगीता सतीश बंडगर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.एस.गाताडे यांनी दिली. भिगवण शहराच्या शेजारी मोठ्या लोकसंखेचे गाव म्हणून मदनवाडी गावाची ओळख आहे.गावच्या उपसरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण होताच विद्यमान उपसरपंच रणजीत निकम यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर हि निवडणूक...

तक्रारवाडी सोसायटीच्या सभासदांना १० टक्के लाभांश वाटप ; सभासदांची दिवाळी होणार गोड

भिगवण वार्ताहर. दि.३१ तक्रारवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्थेने शेतकरी सभासदांना १० टक्के लाभांश वाटप करीत सभासदांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला.संस्थेच्या ३६५ सभासदांना १० टक्के प्रमाणे जवळपास २ लाख २७ हजार रुपयाचे वाटप करण्यात आल्याची माहिती चेअरमन विकासराव वाघ यांनी दिली. इंदापूर तालुक्यातील अग्रगण्य असणाऱ्या संस्थेचा वसूल...

पोंधवडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते नारायण बंडगर यांची बिनविरोध निवड .

भिगवण वार्ताहर.दि.२९ पोंधवडी गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदावर सामाजिक कार्यकर्ते नारायण माहादेव बंडगर याची निवड सर्वानुमते करण्यात आली.गावचे सरपंच लक्ष्मण पवार यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पोंधवडी गाव हे गेल्या काही दिवसात तक्रारीचा वाढता आलेख असणारे गाव म्हणून ओळख निर्माण करीत आहे.त्यातच राजकीय सत्ताबदलाच्या वाऱ्यामुळे गावातील वातवरण गरम...