Friday, July 4, 2025

इंदापूर

On each category you can set a Category template style, a Top post style (grids) and a module type for article listing. Also each top post style (grids) have 5 different look style. You can mix them to create a beautiful and unique category page.

तक्रारवाडी येथील पिरसाहेब मंदिरातील दानपेटी चोरट्यानी पळवली ; चोरीची घटना सी.सी.टी.व्ही मध्ये कैद

भिगवण वार्ताहर.दि.३० तक्रारवाडी येथील पीरसाहेब मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्यामुळे गावात खळबळ माजली आहे.चोरीचा हा प्रकार सी.सी.टी.व्ही मध्ये टिपला गेला असून भिगवण पोलिसांनी याबाबतची खबर मिळताच तातडीने तपास सुरु केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांनी दिली. तक्रारवाडी गावातील नवसाला पावणारा पीर अशी ख्याती असणाऱ्या मंदिरातील हि दानपेटी आहे.नुकताच या पिरसाहेबाचा...

बांधिलकी नारी सन्मानाची विशेष अंकाचे वितरण ; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या संकल्पनेतील योजना

भिगवण वार्ताहर.दि.९ लोकशाही समाजात सरकारच्या पोलीस यंत्रणेइतकी दुसरी कोणतीही संस्था नागरिकाच्या जवळ नसते .त्यामुळे पोलीस यंत्रणेतील अधिकारी यांनी महिला आणि मुलीच्या मनात विश्वासार्ह परिस्थिती निर्माण केली तर यातून अमुलाग्र बदल घडू शकतात याच उद्देशाने कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी चंद्रशेखर पवार...

मदनवाडी राशीन रोडवर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकटरने ठोकरल्याने एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

भिगवण वार्ताहर.दि.१५ भिगवण राशीन राज्यमार्गावर उस वाहतूक करणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर एक जन गंभीर जखमी झाला.मदनवाडी गावच्या हद्दीत तुळजाभवानी हॉटेल समोर हा अपघात घडला असून नागरिकांनी ड्रायव्हरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात मोहम्मद आबिद अन्सारी वय .२४...

भिगवण स्टेशन येथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना ; पंचशील सेवा संघाचा उपक्रम

भिगवण वार्ताहर.दि.२ भिगवण रेल्वे स्टेशन येथे पंचशील सेवाभावी संस्थेच्या माधयामातून भगवान गौतम बुद्धांची ६ फुट उंचीची अष्टधातुची मूर्ती स्थापना करण्यात आली. भिक्कू संघाचे भंतीजींच्या उपासनेतून रविवारी सकाळी या प्रसन्न मूर्तीची स्थापना करण्यात आली. जगाला शांततेच्या मार्गावर नेत हिंसा न करणे चोरी व्यभिचार तसेच खोटे आणि नशा न करणे या पंचशील तत्वाचे...

भिगवण येथील एकात्मिक बालविकास केंद्र इंदापूरला स्थलांतर करण्यास पालक आणि अंगणवाडी सेविकांचा विरोध ; आंदोलन करत कार्यालयाला ठोकले टाळे

भिगवण वार्ताहर.दि.२१ भिगवण येथील एकात्मिक बालविकास सेवा केंद्राचे कार्यालय इंदापूर येथे स्थलांतरित करण्याला पालक आणि अंगणवाडी सेविकांनी विरोध करीत आंदोलन केले.तर भिगवण साठी मंजुरी असताना इंदापूर येथे स्थलांतर करण्याचा आदेश कार्यकारी अधिकारी यांनी दिलाच कसा असा सवाल येथे उपस्थित असणाऱ्या महिलांनी केला. एकात्मिक बालविकास सेवा केंद्राचा मुख्य उद्देश प्रकल्पातील सर्व लाभधारकांना...

भिगवण गावच्या उपसरपंचपदी मुमताज शेख यांची बिनविरोध निवड ; गावच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लीम समाजाला संधी

भिगवण वार्ताहर.दि.७ भिगवण गावच्या उपसरपंचपदी मुमताज जावेद शेख यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामसेवक सतीश बोरावके यांनी दिली. शेख यांच्या निवडीमुळे भिगवण गावच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लीम समाजाला न्याय मिळाला असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादी पुरस्कृत पक्षाची सत्ता उलथवून बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपा पुरस्कृत कार्यकारिणीने आपल्या उपसरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण होताच शीतल शिंदे...

भिगवण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्राचार्य तुषार क्षीरसागर यांची निवड ; तर सोशल मीडिया सेलच्या अध्यक्षपदी सागर जगदाळे

भिगवण वार्ताहर.दि.१५ भिगवण मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रा.तुषार क्षीरसागर तर मराठी पत्रकार सोशल मिडिया सेल च्या अध्यक्षपदी सागर जगदाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्योती व्हेज या सुप्रसिद्ध हॉटेल येथील हॉल मध्ये नवजीवन एजन्सीच्या बक्षीस वितरण समारंभासाठी आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न भिगवण मराठी...

विहिरीच्या ब्लास्टिंगमुळे नागरिकांच्या घराला तडे ; पोंधवडी गावातील प्रकार

भिगवण वार्ताहर.दि.१३ पोंधवडी ग्रामपंचायत माध्यमातून खोदण्यात येणाऱ्या विहिरीच्या ब्लास्टिंग मुळे नागरिकांच्या घराला तडे जात असून यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या तक्रारी गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत.तर गावाला लागुनच होत असलेल्या विहिरीवर कोणतीही सुरक्षित उपाय योजना केल्या जात नसल्याचे बोलले जात आहे. पोंधवडी गावातील नागरिकांना पाणीपुरवठा व्हावा जलजीवन मिशन अंतर्गत...

पुणे सोलापूर महामार्गावर स्वच्छता करणाऱ्या महिलेचा अपघात ;उपचार खर्च देण्यास हायवे प्रशासन तसेच कंत्राटदार यांची टाळाटाळ

भिगवण वार्ताहर.दि.१० पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण परिसरात सकुंडेवस्ती येथे मेंटेनन्सच्या कंत्राटी कामात असणाऱ्या महिलेचा अज्ञात दुचाकीस्वार धडकून झालेल्या अपघातात हि महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.मात्र अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेची जबाबदारी हायवे प्रशासन आणि सबंधित कंत्राटदार घेताना दिसून येत नसल्यामुळे दवाखान्याचा खर्च भागवायचा कसा असा सवाल कुटुंबापुढे निर्माण झालेला आहे.

भिगवण ग्रामपंचायतच्या वतीने आदर्शवत मिरवणूक ;टाळ मृदुंगाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप

भिगवण वार्ताहर.दि.९ भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन मिरवणुकीत टाळ मृदुंगाच्या नादात भजने गावून गणपती बाप्पाला भक्तिभावाने निरोप देण्यात आला. डीजे गुलाल आणि बीभत्स अंगविक्षेप नृत्याला फाटा देत अनेक गणेश मंडळासमोर हा आदर्श ठेवल्याचे या मिरवणुकीतून दिसून आले. भिगवण ग्रामपंचायत दरवर्षी गणपती विराजमान करीत असतात.मागील दोन वर्ष मात्र हा आनंद उत्सव शासनाच्या निर्बंधांमुळे...