भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी दिलीप पवार यांना बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानित
भिगवण वार्ताहर.दि.३
भिगवण पोलीस ठाण्याचे सिंघम पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना बहिर्जी नाईक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख तसेच अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. भिगवणकर नागरिकांनी पवार यांना मिळालेल्या मानाच्या पुरस्काराबद्दल कौतुक करीत अभिनंदनाचा वर्षाव केला .
भिगवण ग्रामपंचायतीने थकीत कर वसुलीसाठी महा पारेषण कार्यालया ठोकले टाळे ; २ कोटी १७ लाखाची थकबाकी
भिगवण वार्ताहर .दि.७
ग्रामपंचायत कराच्या थकबाकीमुळे भिगवण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कार्यालयाला ग्रामपंचायत विभागाकडून टाळे ठोकण्यात आले. वीज बिल थकल्यावर ग्राहकाची वीज कापणाऱ्या विभागाला ग्रामपंचायत विभागाने घरपट्टी आणि कर न भरल्यामुळे टाळे लाऊन दणका दिला असल्याचे दिसून आले.
याबाबत भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेल्या माहिती...
प्लास्टिक विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोड मध्ये ; ९ दुकानावर कारवाई करत १८ हजाराचा दंड वसूल
भिगवण वार्ताहर .दि.२५
प्लास्टिक वापरा विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोडमध्ये आली असून एका दिवसात १८ हजार रुपयाचा दंड व्यापारी वर्गाकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे हनुमंत चांदगुडे यांनी दिली .ग्रामपंचायतीने घेतलेल्या या कडक भूमिकेच अनेक पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले असून व्यापारी वर्गातून मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
राज्यभरात...
अकोले पोटनिवडणूक पहिल्याच दिवशी पाच उमेदवारी अर्ज दाखल ; निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता
सत्यवार्ता अकोले प्रतिनिधी :विजय गायकवाडअकोले ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून आज अखेर पर्यंत पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गावातील प्रभाग दोन मधील एका रिक्त जागेसाठी निवडणूक होत असून आतापर्यंत पाच जणांनी शक्ती प्रदर्शन करीत इंदापूर येथे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी दीपक कोकरे व सहाय्यक निवडणूक अधिकरी शिवाजी खोसे यांच्याकडे...
रोटरीच्या मदतीतून विरवाडी गावच्या दिव्यांग तरुणाला व्हीलचेअर ; भिगवण रोटरीचा स्तुत्य उपक्रम
भिगवण वार्ताहर .दि . २७रोटरी क्लब ऑफ भिगवन तसेच रोटरी क्लब ऑफ बिबेवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भिगवण येथील दिव्यांग युवक पप्पू जाधव यास व्हीलचेअर भेट देण्यात आली. यावेळी रोटरी अध्यक्ष संजय खाडे तसेच इतर रोटरीचे सदस्य उपस्थित होते .
भिगवण विरवाडी येथील जाधव यास दिव्यांग असलेल्या कारणामुळे दैनंदिन जीवनामध्ये खुप अडचणीचा सामना करावा...
माजी जिल्हा परिषद सदस्य विलास बंडगर यांचे अल्पशा आजाराने निधन
भिगवण वार्ताहर . दि .१३इंदापुर तालुक्यातील भिगवण-शेटफळगढे जिल्हा परिषद गटांचे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास श्रीरंग बंडगर(५४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या विलास बंडगर यांच्या निधनाची बातमी समजताच मदनवाडी व परिसरांवर शोककळा पसरली.माजी जिल्हा परिषद सदस्य विलास बंडगर यांचा १२ वर्षापुर्वी पुणे सोलापूर महामार्गावर कुरकुंभ गावच्या हद्दीत ...
मुस्लिम बांधवाना दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम ; भिगवण रोटरीचा बंधुभावाचा स्तुत्य उपक्रम
भिगवण वार्ताहर .दि .८
भिगवण येथील रोटरी क्लबने जामा मज्जिद येथे मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. यामध्ये हिंदू-मुस्लीम भाई -भाई हा ऐक्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.रमजान च्या पवित्र महिन्यात ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव आपल्या हिंदू बांधवांना शीरखुर्मा खाण्यासाठी बोलवत असतात.यातून बंधुभावाचा संदेश देण्यात...
मदनवाडी गावच्या उपसरपंच पदी सौ .संगीता सतीशराव बंडगर यांची बिनविरोध निवड
भिगवण वार्ताहर .दि.३
मदनवाडी ता.इंदापूर ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ .संगीता सतीश बंडगर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.एस.गाताडे यांनी दिली.
भिगवण शहराच्या शेजारी मोठ्या लोकसंखेचे गाव म्हणून मदनवाडी गावाची ओळख आहे.गावच्या उपसरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण होताच विद्यमान उपसरपंच रणजीत निकम यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर हि निवडणूक...
शालेय समिती अध्यक्ष यांचे खर्चाने जिल्हा परिषद शाळेला प्रवेशद्वार ;पोंधवडी गावातील स्तुत्य उपक्रम
भिगवण वार्ताहर .दि.१६
पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले.
पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात...
शालेय व्यवस्थापन अध्यक्षपदी निवड होताच शाळेला मिळाले प्रवेशद्वार ; पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळेतील स्तुत्य उपक्रम
भिगवण वार्ताहर .दि.१६
पोंधवडी जिल्हा प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच नवनिर्वाचित अध्यक्षांनी शाळेला कंपाउंड गेट देत दातृत्वाचा आदर्श नागरीका समोर मांडला. आज या प्रवेशद्वाराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांच्या हस्ते करण्यात आले.
पोंधवडी गाव म्हटल कि लक्षात येत राजकीय कुरघोड्या आणि पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या परस्परविरोधी तक्रारी...