डिकसळ प्रतिनिधी ( विजयकुमार गायकवाड)
दि.२
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मोफत डिजिटल ७/१२ देण्याची विशेष मोहीम शासनाने सुरू केली आहे .या योजनेचा शुभारंभ आज डिकसळ ता. इंदापुर येथे 2 ऑक्टोबर गांधी जयंती च्या निमित्ताने आयोजन करण्यात आले .
यावेळी शेतकऱ्यांना त्यांच्या घरपोच मोफत डिजिटल सातबारा वाटप करण्यात आले .
या मोहिमे अंतर्गत २१ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.यामध्ये ज्येष्ठ शेतकऱ्यांचा विशेष सहभाग जाणवला .
शासनाच्या या योजनेचे शेतकऱ्यांनी स्वागत केले . या योजनेतून सातबारा मिळवण्यासाठी तलाठी कार्यालयाची उंबरडे झिजवण्याची वेळ येणार नसुन वेळेची फार मोठी बचत होणार असल्याचे शेतकऱ्यांनी बोलुन दाखवले.
यावेळी डिकसळ सरपंच सुर्यकांत सवाने, सर्कल भाऊसाहेब डी.एस. कोकरे, गाव कामगार तलाठी आर.पी.देवरे, पोलीस पाटील संदीप पवार, ग्रामसेवक डी.बी. परदेशी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भास्कर काळे आदी.पदाधिकाऱ्यांची हस्ते प्राथमिक स्वरूपात काही शेतकऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात डिजिटल सातबारे देण्यात आले.
यावेळी सरपंच सुर्यकांत सवाने,डिकसळ सोसायटी चेअरमन रावसाहेब गवळी ,मा.सरपंच ज्ञानदेव पवार, प्रभाकर गायकवाड ,प्रताप गवळी सोसायटी संचालक संजय काळे, सतीश काळे युवा शेतकरी सुनील काळे, कैलास कुंभार, बापु भोंग नवनाथ पवार, निलेश काळे ,ग्रामपंचायत कर्मचारी अमोल भोंग, कोतवाल शिवाजी शेलार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते .