वैद्यकीय ,शिक्षण ,वीज वितरण ,ग्रामपंचायत कामगार ,पाणीपुरवठा ,स्वच्छता कामगार ,आशा सेविका तसेच पोलीस पाटील यांना सन्मानित करण्यात आल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस देवकातेपाटील यांनी दिली…
भिगवण वार्ताहर .दि.२८
राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसाच्या निम्मिताने कोरोनाच्या काळात रुग्ण सेवा देत योध्याची भूमिका पार पाडणाऱ्या आरोग्य सेवक ग्रामपंचायत तसेच शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचार्यांना मानपत्र देवून सन्मानित करण्यात आले.मदनवाडी येथील विठ्ठल रुक्मिणी कार्यालयात हा सन्मान सोहळा पार पडला.
भाजपा युवा मोर्चा आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील मित्र मंडळीच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,कोरोना सारख्या महामारीत आपल्या जीवाची बाजी लावीत अनेकांनी रुग्ण सेवा बजावली आहे.प्रत्यक्षात रुग्णांची सेवा करण्या बरोबरच जन जागृती स्वच्छता ,ग्रामपंचायत पाणीपुरवठा,आशा सेविका ,पोलीस पाटील आणि लसीकरणाच्या कार्यक्रमात सहभाग असणाऱ्या सर्व कर्मचारी सेवक यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपा महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष कांचन कुल ,जि.प सदस्या अंकिता पाटील ,पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे, भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे ,इंदापूर बाजार समितीचे माजी उपसभापती पराग जाधव ,भाजपा युवा मोर्चाचे तेजस देवकातेपाटील ,गजानन वाकसे ,महेंद्र रेडके ,गटनेते संपत बंडगर उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन तेजस देवकाते यांनी तर आभार मानण्याचे काम महादेव बंडगर यांनी केले.