भिगवण च्या नवनिर्वाचित सिंघम अधिकारी दिलीप पवार आणि त्यांच्या पथकाचे सर्व स्तरातून कौतुक
भादलवाडी(ता.इंदापुर) येथे धारदार शस्त्राने गळा चिरून झालेल्या युवकांचा खुन हा विवाहबाह्य प्रेमसंबधातुन झाला असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असुन पोलिसांनी चोवीस तासातच या खुनाचा तपास केला आहे. भिगवण पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली असुन आरोपींना खुनाची कबुली दिली असल्याची माहिती भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली आहे. भिगवण पोलिसांनी खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचा तपास चोवीस तासातच लावल्याबद्दल भिगवण पोलिसांचे कौतुक होत आहे.
भिगवण पोलीस ठाणे हद्दीत महेश दत्तात्रय चव्हाण(वय. ३४ रा. रावणगांव,ता.दौंड) या युवकाचा भादलवाडी(ता.इंदापुर) येथे मंगळवारी(ता.२४) धारदार कोयत्याने गळा कापुन अत्यंत निर्घृणपणे खुन करण्यात आला होता. या प्रकरणी मयत महेश चव्हाण यांचा बंधु नितीन चव्हाण यांनी भिगवण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी वेगवान हालचाली करत खुनाच्या तपासासाठी पथके रवाना केली होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मयत महेश चव्हाण याचे पत्नीचे अकोले(ता.इंदापुर) येथील युवकाशी लग्नाआधी प्रेमसंबध असल्याची बाब तपासात समोर आली होती. पोलिसांनी अकोले येथे छापा टाकुन अनिकेत उर्फ बबलु विकास शिंदे(वय.२१ रा. अकोले,ता.इंदापुर) यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर अनिकेत शिंदे यांने प्रेमसबंधामध्ये अडथळा आणणाऱ्या महिलेच्या पतीचा खुन केला असल्याची कबुली दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः अनिकेत शिंदे यांचे सदर महिलेसोबत प्रेमसंबध होते. पतीमुळे प्रेयसीला भेटता येत नव्हते. अनिकेत याचा बंधु गणेश शिंदे याचा त्याच्या घटस्फोटास सदर महिलेचा पती कारणीभुत असल्याचा समज झाला होता. त्यामुळे गणेश शिंदे हाही महिलेच्या पतीवर चिडुन होता. अनिकेत शिंदे व महेश शिंदे यांनी नियोजन करुन महेश चव्हाण यास बोलावुन घेऊन भादलवाडी(ता.इंदापुर) येथील निरा-भिमा जोड कालव्याच्या बोगदयाच्या डंम्पिग यार्डजवळ नेऊन धारदार कोयत्याने गळा कापुन खुन केला. आरोपींनी खुनाची कबुली दिली असुन आरोपींना इंदापुर येथील न्यायालयांमध्ये हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
भिगवण पोलिसांनी भादलवाडी येथील खुनाचा चोवीस तासातच तपास केला. ही कामगिरी पोलिस ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख,अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष रुपनवर, विनायक दडस, पोलिस अंमलदार नाना वीर, केशव चौधऱ तसेच गुन्हे शाखेचे अंमलदार अभिजित एकशींगे अनिल काळे रविराज कोकरे या पथकाने छडा लावला . अधिकचा तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार करीत आहेत