सामाजिक संदेश देणाऱ्या टेटस चे स्वागत मात्र कुणाच्या भावना दुखविणाऱ्या विरोधात कारवाई केली जाणार ….स.पोलीस निरीक्षक जीवन हिंदुराव माने ..
भिगवण वार्ताहर.दि.१६
ओ शेठ ..तुम्ही नादच केलाय थेट … या सोशल मिडिया वरील टेटस ने ग्रामीण भागातील तरुणांना भुरळ घातली असून दोन दिवसात जवळपास ८० टक्के तरुणांच्या सोशल मिडिया टेटस वर हेच स्लोगन ऐकण्यास मिळत आहे.
आजकालची ग्रामीण भागातील तरुणाई कशाची दिवाणी होईल हे सांगता येत नाही.एखादा चित्रपट आला कि त्यातील हिरोची नक्कल करणे असो अथवा तीन चार टोळके जमवून चौकात अथवा मुख्य रस्त्याच्या मध्येच तलवारीने केक कापून बर्थडे बॉय ला अंडी आणि केक ने भरवून देणे असो.आजकाल रोज हटके आणि मित्रांनी हमखास पाहावे यासाठी सोशल मिडीयावर टेटस ठेवणे या प्रकाराची चलती झालेली पहावयास मिळते.आता पर्यंत सैराट पासून मै हु डॉन ,आमच्याशी वाकड नदीला लाकड ,वावर आहे म्हणून पावर आहे असे अनेक प्रकारचे टेटस पहावयास मिळत होते.तर काहीना इशारा देण्यासाठी आणि धमकी देण्यासाठीही याचा वापर केला जात होता.मात्र काही दिवसापासून पोलिसांनी आपला तिसरा डोळा उघडून दिलदार पणाचे दर्शन देत अशा टेटस वाल्याला प्रसादाचे वाटप केले होते.
गेल्या दोन दिवसापासून ओ शेठ ….ने अवघ्या तरुणाईत धुमाकूळ घातला असून जवळपास ८० टक्के तरुणांनी हेच टेटस ठेवल्याचे दिसून येत आहे.यासाठी अनेक प्रकारे शुटींग करून आपला टेटस सर्वात चांगला कसा होईल यासाठी प्रयत्न केले जात आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी बोलताना समाजातील अनेक तरुण समाजाला संदेश देणारे आणि सामाजिक सलोखा वाढविण्याचा प्रयत्न करणारे टेटस ठेवत असतात.मात्र काही तरुण भरकटत जावून चुकीच्या प्रकारें टेटस ठेवून समाजात वाद निर्माण होणारे ,दुसर्याच्या भावना दुखावणारे संदेश टाकत असतात अशा विरोधात तक्रार झाल्यास सदर इसमावर कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले..