राज्यात सर्वच ठिकाणी शव दाहिनीला मंजुरी देण्यात आल्या असल्याने ग्रामपंचायत विभागाने पत्र देत मागणी केली……सरपंच तानाजी वायसे
राज्य मंत्री दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून ही मंजुरी मिळाली आहे.या साठी आम्ही राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी मंत्री महोदय यांच्याकडे मागणी केली होती …… राष्ट्रवादी इंदापूर तालुका कोषाध्यक्ष सचिन बोगावत
भिगवण वार्ताहर.दि.२२
भिगवण स्टेशन येथे राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या शवदाहिनीच्या श्रेय वादावरून राजकारण तापले असल्याचे दिसून येत आहे.सार्वजनिक बांधकाम खात्याकडे ग्रामपंचायत मागणीतून माध्यमातून केली असताना काही कार्यकर्ते आपली पाठ थोपटून घेत आपणच पाठपुरावा केल्याने मंजूर झाल्याची प्रसिद्धी मिळवत असल्याचे सरपंच तानाजी वायसे यांनी सांगितले.
राज्यात ज्या ठिकाणी कोरोना सेंटर आहेत आणि उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू होतो.अशावेळी त्यांचा अंत्यविधी करताना प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.तसेच अंत्यविधी साठी मोठ्या प्रमाणावर लाकडाचा उपयोग केला जात होता.याचाच विचार करून या सेन्टरच्या ठिकाणी गॅस वर चालणाऱ्या शव दाहिनी मंजूर करण्यात आल्या आहेत.
या साठी भिगवण ग्रामपंचायतीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याकडे मागणी करण्यात आली होती.मात्र याचे श्रेय घेण्यावरून ग्रामपंचायत प्रशासन आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात राजकारण सुरु झाल्याचे पहावयास मिळत आहे.
याबाबत बोलताना सरपंच तानाजी वायसे यांनी कोरोना सेन्टरच्या ठिकाणी शव दाहिनी राज्यसरकार च्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्या आहेत त्याबाबत ग्रामपंचायत विभागाने पत्रव्यवहार करीत जागेची उपलब्धता करून दिलेली आहे.मात्र काही कार्यकर्ते भिगवण गावात होणाऱ्या विकास कामात राजकारण आणून श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
याबाबत इंदापूर तालुका राष्ट्रवादी कोषाध्यक्ष सचिन बोगावत यांनी राज्याचे मंत्री दतात्रय भरणे यांच्या माध्यमातून ही शव दाहिनी मंजूर करण्यात आली आहे.आणि त्याबाबत आम्ही मंत्री महोदय यांना मागणी केल्यामुळे त्याला मंजुरी मिळाली आहे.२४ /०५/२०२१ रोजी मंत्री भरणे यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम खाते आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत मागणी करण्यात आली होती .ग्रामपंचायत विभागाचे पत्राची तारीख पाहिल्यास राजकारण कोण करत आहे हे उघड होईल.