भादलवाडी तलावातील माती उपशाला मनसेचा विरोध ; शासनाने परवानगी दिल्यास आमरण उपोषणाचा मनसे तालुका अध्यक्षाचा इशारा

0
255

डाळज वार्ताहर .दी. १८

पत्रकार इरफान तांबोळी …. डाळज

भादलवाडी येथील ब्रिटिश कालीन तलावात माती उपसा परवानगी शासनाने देऊ नये यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी आघाडी चे इंदापूर तालुकाअध्यक्ष हनुमंत जाधव यांनी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांना निवेदन दिले आहे.

भादलवाडी येथील हा तलाव विदेशी पक्षी फ्लेमिंगो तसेच विविध प्रकारचे देशी पक्षी या तलावात दिसून येतात.तर उजनी धरणात येणारे पक्षी आपल्या विणीसाठी या तलावात घरटी केलेली दिसून येतात. तसेच या तलावावर मासेमारी करून अनेक कुंटुंब आपले उदरनिर्वाह करत आहेत.परंतु गेल्या काही काळात नजीकच्या परिसरातील गावगुंडाने अवैधरित्या रात्री अपरात्री माती व वाळूउपसा केला जातो, गाळपेर क्षेत्रातील माती उचलून जास्त दराने राज्यातील अनेक ठिकाणच्या वीटभट्टी साठी विकली जाते. तसेच भरलेल्या रॉयल्टी पेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात माती उचलली जाते त्यामुळे महसूल विभागाचा महसूल मोठया प्रमाणात बुडाला जातो,

मागील काळात या माती उपसा वरून दोन गटामध्ये मारामारी होवून येथील माती रक्त रंजीत झालेली आहे. या प्रकरणी गंभीर गुन्हे भिगवण पोलीस दप्तरी दाखल झाले आहेत.या तलाव परिसरातील भादलवाडी , डाळज या भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील गावातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहावी यासाठी परवानगी देण्यात येवू नये.तसेच भविष्यात यातून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या तलावातील माती उपशाला परवानगी देऊ नये असे निवेदन इंदापूर जिल्हाधिकारी कार्यालय ,विभागीय कार्यालय बारामती तहसीलदार कार्यालय इंदापूर तसेच जलसिंचन विभाग पळसदेव यांना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी संघटनेच्या वतीने दिले आहे.

याबाबत सबंधित कार्यालयाने माती उपसापरवानगी दिली तर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा तालुका अध्यक्ष हनुमंत जाधव यांनी निवेदनात दिला आहे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here